प्रथम या कार्डचे फायदे पाहूया ते खालील प्रमाणे: 1) PMFBY म्हणजेच प्रधानमंत्री सुरक्षा विमायोजना अंतर्गत विमा संरक्षण मिळते. 2) ज्यांच्याकडे हे युएन कार्ड असेल त्यांना येणाऱ्या सरकारी योजनांमध्ये सामील करून घेतले जाणार आहे. 3)ज्यांच्याकडे जे हे युएन कार्ड असेल त्यांना येणारी सरकारी कामे दिली जाणार आहेत.
शेतमजूर आणि भूमिहीन शेतकरी पात्र आहेत का?: दीर्घकाळातील विमा आणि त्याचे फायदे यामुळेच पोर्टलवरील नोंदणीची संख्या ही झपाट्याने वाढत आहे, पण शेतकरीही या पोर्टलवर नोंदणी करू शकतात का? ते ही ई-श्राम कार्ड बनवू शकतात? तर उत्तर आहे, नाही.
ई-श्राम पोर्टलवर केवळ शेतमजूर आणि भूमिहीन शेतकरी नोंदणीसाठी पात्र आहेत. भारत सरकार देशातील कोट्यवधी असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सर्वांगीण कल्याणासाठी राष्ट्रीय डेटाबेस तयार करीत आहे. त्यासाठी मोदी सरकारने एक ई-श्राम पोर्टल विकसित केले असून ते त्यांच्या आधार कार्डशी जोडले जाईल. ई-श्राम पोर्टलअंतर्गत नोंदणी पूर्णपणे मोफत आहे.
ई श्रमकार्ड काढाण्याची प्रक्रिया: ई श्रमकार्ड काढण्यासाठी प्रथम resister.eshram.gov.in या वेब साईट वर जायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील,पहिला आहे रजिस्ट्रेशन थ्रू सी ए सी ज्यांच्याकडे सी ए सी आयडी आहे त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे आणि ज्यांच्याकडे सी ए सी आयडी नाही त्यांच्यासाठी सेल्फ रजिस्ट्रेशन ऑपशन आहे.
दोन्हीकडे सेम प्रोसेस आहे त्यामुळे काही प्रोब्लेम होणार नाही. सी ए सी चा जो इंटर्फेस आहे ,त्यांच्यामध्ये रिजिस्टर यू डब्लू या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. सर्वात पहिल्यांदा तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तरी चालेल. किंवा अंगठा स्कॅन करून सुद्धा KYC करू शकता. नंतर कॅपचा टाकायचा आहे.
आणि तुम्ही ई पि ओ एफ चे मेंबर असाल तर तुम्ही पात्र नाही आणि इन्कम टॅक्स भरत असाल तरी सुद्धा पात्र नाही. आता सेंड ओटीपी वर क्लिक करायचे आहे. ओटीपी व्हेरीफाय करून घायचा आहे. आता आधार e-KYC करायचे आहे. आधारकार्ड नंबर टाकायचा आहे.
खाली ऑप्शन देण्यात येतील फिंगर स्कॅनर ने तुम्ही अंगठा वेरिफाय करू शकता, दुसरा आहे Iris स्कॅनर, आणि तिसरा ओटीपी आहे ज्यांचा मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक आहे ते ओटीपी ऑप्शन वापरू शकतात. त्या नंतर जो कॅपचा आहे तो टाकुन सबमिट करायचे आहे.
आधार कार्डवर जो नंबर लिंक आहे त्यावर एक ओटीपी येतो तिथे तो टाकुन सबमिट करायचे आहे. हे झाल्यावर तुमचे के व्हाय सी होईल आणि तुमची इन्फॉर्मेशन रजिस्ट्रेशनसाठी डिस्प्ले होईल. इथे KYC पूर्ण झाली आहे. तुम्हाला एकदा सगळी माहिती बघायची आहे की सगळी बरोबर आहे का नाही आणि नेक्स्ट करायचं आहे.
आता पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे. तुमचा मोबाईल नंबर,दुसरा मोबाईल नंबर, ईमेल आयडी ,तुमची वैवाहीक स्थिती, वडिलांचे नाव, जात, ब्लड ग्रुप, तुम्ही अपंग आहात का? असेल तर हो करा नाही तर नाही करा. आता खाली नॉमिनी ची महिती भरायची आहे, नॉमिनी नसेल लावायचा तर नो ऑप्शन वर क्लिक करा.
त्यानंतर तुम्ही कुठे राहता त्याबद्दलची माहिती भरायची आहे. सर्व माहिती भरून खाली आलात तर तुम्ही किती वर्ष तिथे राहत आहात ते वर्ष टाकायचे आहे. आता तुम्ही स्थलांतरित आहात का विचारले जाईल जर नसाल तर नो वर क्लिक करा आणि असाल तर येस वर क्लिक करून खाली स्थलांतराचे कारण स्पष्ट करा. आता खाली जर तुमचा आताच पत्ता जर कायमचा असेल तर तिथे टिक करा आणि नसेल तर टिक काढून तिथे कायमचा पत्ता भरून घ्या.
आता नेक्स्ट वर क्लिक करा. आता तुमच्या शिक्षणा बद्दलची माहिती इथे टाकायची आहे. नंतर तुमचा महिना पगार किती आहे ते टाकायचे आहे. नंतर इन्कम सर्टिफिकेट टाकायचं असेल तर टाकू शकता, नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालते. आता पुढे Occupation and skill टाकायचे आहे. तिथे तुम्हाला एक लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही कोणत काम करता ते तिथे टाकायचं आहे. तुम्ही जर शेतकरी असाल तर शेतकरी टाकू शकता.
ती पूर्ण लिस्ट तुम्ही पाहून घ्या आणि तुम्ही काय काम करता ते सिलेक्ट करा. तुम्ही तो व्यवसाय किती वर्षांपासून करता ते तिथे टाकायचं आहे. त्या नंतर तुम्हाला अजून काही काम येत असेल तर ते सिलेक्ट करू शकता. तुम्ही तुमचं काम कुठून शिकला ते टाकायचं असेल तर टाकू शकता. सेव्ह करून पुढे जायचं आहे,त्या मध्ये तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती तिथे टाकायची आहे.
तुमचं बँक अकाऊट आधार कार्डला लिंक असेल,तर तिथे येस ऑप्शन दाबू शकता. तुमचे जे पैसे येतील ते ह्या बँकमध्ये येतील. तुम्ही दुसरे कोणतेही अकाउंट तिथे जॉईन करू शकता. त्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती नीट भरायची आहे. तुम्ही जो फॉर्म भरला आहे त्याची प्रत इथे येणार आहे. तुमची सगळी माहिती एकदा तपासून पहा.
नंतर सेव्ह करून तुम्हाला एक ओटीपी येईल तो तिथे टाकायचा आहे आणि व्हेरिफीकेशन करायचे आहे व सबमिट करायचे आहे. तुमचे यू एम कार्ड तयार झाले आहे. तुम्हाला प्रत पाहिजे असेल तर डाऊनलोड करा. तुम्हाला एक एसएमएस येईल की तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे. त्याची प्रिंट काढून घायची आहे. अशा प्रकारे तुम्ही यू एन कार्ड काढू शकता.
सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती ही सध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी,
अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.