चुक दुरुस्तीने जुन्या करारात बदल होतो का ?।। चुक दुरुस्ती पत्राने मुळ दस्तातला, मुळ करारातला मजकूर बदलतो का? ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

आपल्याला चूक दुरुस्ती कारण जेव्हा आपल्या कोणत्याही नोंदणीकृत करारामध्ये काही तांत्रिक किंवा स्पेलिंगच्या चुका होतात, तेव्हा अशा चुका दुरुस्त करण्याकरता आपल्याला चूक दुरुस्ती पत्र करणं अत्यंत आवश्यक असतं. हे चूक दुरुस्ती पत्र करून त्याची नोंदणी करणे बंधनकारक आहे. हि नोंदणी करतांना आपल्याला ओल्ड करार ज्यामध्ये आपल्याला दुरुस्ती करायची आहे ते ज्या कार्यालयात नोंदवलेला आहे,

त्याच कार्यालयामध्ये चूक दुरुस्ती पत्राची नोंदणी करणे हे आवश्यक असा प्रश्‍न आहे. आता असा प्रश्न येतो की चुक दुरुस्ती पात्रांनी मुळ दस्तातला, मुळ करारातला मजकूर बदलतो का? किंवा त्याच्यात बदल होतो का? हा प्रश्न आपण प्रत्यक्ष आणि कायदेशीर अशा दोन्ही अंगांनी बघू.

आता प्रत्यक्ष जुन्या करारामध्ये बदल होतो का? तर नाही. जुना करार आहे तसाच राहतो. जुन्या कराराची जर कोणी सर्टिफाइड कॉपी घेतली तर त्यामध्ये त्या चुका जशाच्या तशाच राहतील. कारण कराराची नोंदणी झाली आणि त्याचे स्कॅनिंग तो सर्व्हरवर गेला की त्यामध्ये बदल करणं हे जवळपास अशक्य आहे.

मात्र जेव्हा आपण चूक दुरुस्ती पत्राची नोंदणी करून, जुन्या करारात आपल्या चुकांची दुरुस्ती करतो तेव्हा कायद्यानुसार आपल्या मूळ करारात झालेल्या चुका दुरुस्त झाल्यात असं म्हणता येतं. मात्र हे कळण्याकरिता मूळ करार आणि चूक दुरुस्ती पत्र या दोन्हीचा आपल्याला एकत्रितपणे अभ्यास करणे आवश्यक आहे.

जर आपण नुसतं मुळ कराराची प्रत पाहिली आणि त्यामध्ये जर काही चूक दुरुस्ती झाला आहे किंवा नाही झालंय, याची जर आपल्याला माहितीच नसेल तर त्या मूळ करारामध्ये नक्की काय चुकलं ? काय चूक दुरुस्ती झाली आहे? चूक दुरुस्ती झाली आहे का नाही झाली. हे आपल्याला लक्षात येऊ शकणार नाही.

म्हणून हे जर आपल्याला शोधायचं असेल तर एखाद्या करारामध्ये चूक झाली आहे का? तर पुढे चूक दुरुस्ती पत्र झाल का? हे शोधण्याकरता आपल्याला नोंदणी कार्यालयामध्ये सर्च घेण आवश्यक आहे. जेव्हा आपण एखाद्या मालमत्तेचा सर्च घेतो, तेव्हा त्या सर्चमध्ये त्या मालमत्ते संदर्भात नोंदणीकृत करारांची सगळी माहिती आपल्याला मिळते.

या माहितीमध्ये तेव्हा आपल्याला मुळ करार आणि चूक दुरुस्ती पत्र या दोन्हीची माहिती होईल. आणि या दोन्ही करायची आपल्याला माहिती झाली तर आपल्याला त्यांची एकमेकांशी सांगड घालता येईल. आणि मुळ करारात काय चुकलं होतं? त्याची काय चूक दुरुस्ती झाली? आणि चूक दुरुस्तीनंतर कायद्याने तो करार कसा वाटला पाहिजे.

याचा आपल्याला बोध होईल. थोडक्यात काय तर मुळ करार आणि चूक दुरुस्ती पत्र याचा एकत्रित पणे जर आपण विचार केला तर आणि तरच चूक दुरुस्ती पत्रानुसार काय सुधारणा झाली आहे, ते आपल्याला कळू शकते. आपल्याला जर नुसत्या मूळ कराराची प्रत दिली तर त्याच्या वर्णन याच्यात काही चुकलंय का? किंवा चूक दुरुस्त झाले का? हे आपल्याला सांगता येणार नाही. तसं करणं हे जवळपास अशक्य आहे.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.