आयुष्यात यशस्वी, आर्थिक संपन्न होण्यासाठी ५ गोष्टी नक्की आत्मसात करा।। स्वतःची किंमत कशी वाढवायची? स्वतःची किंमत वाढून भरपूर पैसे कसे कमवायचे? कोणते असे स्किल शिकले पाहिजे? जेणेकरून आपली मार्केटमध्ये डिमांड वाढेल? जाणून घ्या या लेखात !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

स्वतःची किंमत कशी वाढवायची? स्वतःची किंमत वाढून भरपूर पैसे कसे कमवायचे? कोणते असे स्किल शिकले पाहिजे? जेणेकरून आपली मार्केटमध्ये डिमांड वाढेल. स्वतःची किंमत वाढवा. भरपूर पैसे कमवा. ज्या व्यक्तीकडे जास्त स्किल आहे, त्याची मार्केटमध्ये सर्वाधिक मागणी असते.

त्यामुळे सातत्याने आपण नवीन नवीन स्किल्स शिकत राहिले पाहिजे. आज मी तुम्हाला पाच अशा स्किल सांगणार आहे. ज्या तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात टॉपला जाण्यासाठी मदत करतील. प्रत्येक स्किल तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी आहे.

पहिली स्किल आहे. कम्युनिकेशन स्किल्स: म्हणजे संवाद कौशल्य. आजच्या घडीला तुम्ही मला विचाराल, यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाची स्किल कोणती आहे? माझे उत्तर असेल कमुनिकेशन स्किल्स. कारण तुम्ही कितीही हुशार असाल, टॅलेंटेड असाल, पण तुम्हाला लोकांबरोबर संवाद करता येत नसेल, तर त्या टॅलेंटचा काही उपयोग होणार नाही.

कारण जेवढे तुमचे सैंवाद कौशल्या चांगले असेल, तेवढा तुमचा यशाचा आलेख उंचावलेला असेल‌. चांगले संवाद कौशल्य म्हणजे तुमचे विचार तुम्ही लोकांसमोर किती प्रभावीपणे मांडू शकता. हे कौशल्य सर्वांमध्ये नसते. पण प्रत्येक व्यक्ती याचा सराव करून कम्युनिकेशन स्किल्स मध्ये एक्सपर्ट होऊ शकतो.

दुसरी स्किल आहे नेतृत्व गुण: म्हणजे लेडरशिप स्किल्स. मित्रांनो वाईट वाटून घेऊ नका. पण लोकांना आज मेंढरा प्रमाणे कोणाच्याही मागे लागायची सवय लागली आहे. आज अचूक मार्ग दाखवणारे, योग्य मार्गदर्शन करणारे, नेतृत्व दुर्मिळ झाले आहे.

त्यामुळे कुठल्याही क्षेत्रांमध्ये लिडरशीप हा गुण सर्वात महत्त्वाचा आहे. आज जगामध्ये अनेक चांगल्या लीडरची गरज आहे. जे लोकांना चांगले मार्गदर्शन करतील त्यांच्या आणि स्वतःच्या आयुष्यात पॉझिटिव्ह बदल घडवून आणतील. लीडरशिप स्किल ची सुरुवात एका महत्त्वाच्या गुणाने होते ती म्हणजे जबाबदारी घेणे.

जेव्हा माणूस नवीन नवीन जबाबदारी घ्यायला सुरुवात करतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने लिडर मध्ये रुपांतरीत होत असतो त्यामुळे तुम्ही कुठल्याही फिल्ड मध्ये असाल, त्या फिल्ड चे लीडर बनायचा प्रयत्न करा.

तिसरी स्किल आहे एन्टरप्रेनर्शिप स्किल्स: म्हणजे उद्योजक बनण्याचे गुण. मित्रांनो मला माहित नाही कारण काय आहे? पण आपल्या मराठी माणसांमध्ये हा उद्योजक बनण्याचा गुण फारच कमी दिसतो. आज आपल्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही मोठ्या शहरांमध्ये जा.

तुम्हाला बऱ्यापैकी दुकाने गुजराती मारवाड्याची दिसतील. आणि तिथे आपली मराठी पोर कामाला असतात. कधी कधी फार वाईट वाटते. माझा गुजराती-मारवाडी यांना विरोध नाहीये. पण ते करू शकतात तर आपण का नाही करू शकत. हा प्रश्न मला नेहमी पडत असतो.

आजच्या स्पर्धेच्या युगात तुम्हाला खरच मोठे व्हायचे असेल, यशस्वी व्हायचे असेल, तर नोकरीच्या मागे न लागता काहीतरी उद्योग करता येईल का हा विचार आपण केला पाहिजे. आणि त्यासाठी एन्टरप्रेनर्शिप स्किल्स आपण आत्मसात केले पाहिजे.

चौथे स्किल आहे गोल सेटींग स्किल्स: म्हणजे आयुष्यातील ध्येय ठरवायची कशी? प्राप्त कशी करायची? याची स्किल्स. मित्रांनो मी अनेक लोकांना जेव्हा विचारतो, की तुमच्या आयुष्यातले पुढच्या पाच वर्षाचे किंवा दहा वर्षाचे टॉप ५ गोल्स म्हणजे ध्येय काय आहे? त्यांना सांगताच येत नाही.

काही लोकांना तर आयुष्यात ध्येय ठेवायचे असतात, हेच माहिती नाही. विचार करा मित्रांनो एक व्यक्ती एका बसमध्ये बसले आहे. कंडक्टर त्या व्यक्तीला तिकीटासाठी विचारतो. तुम्हाला कुठे जायचे आहे? ती व्यक्ती उत्तर देते मला माहित नाही. जिथे बस जाईल तिथे मी जाईल.

आता त्या व्यक्तीला तुम्ही काय म्हणाल? मित्रांनो अशाच प्रकारे अनेक लोक या जगात दिशाहीन आयुष्य जगत आहे. त्यांना कुठे जायचे आहे माहित नाही. फक्त प्रवाहाबरोबर वाहत चालले आहेत. पण तुम्हाला प्रगती करायची असेल तर, गोल सेटिंग स्किल्स हे शिकले पाहिजे. ध्येय कशी ठेवायची? ते प्राप्त करण्यासाठी नियोजन कसे करायचे? स्ट्रॅटजीस कशा बनवायच्या? या सगळ्या गोष्टी गोल सेटिंग्स स्किलचा भाग आहे.

पाचवी स्किल आहे आर्थिक साक्षरता: म्हणजे पैशांचे व्यवस्थापन. मित्रांनो आतापर्यंत सांगितलेल्या स्किल्स जर तुम्ही आत्मसात केल्या. तर तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हायला सुरुवात होणार. म्हणजे तुमच्याकडे पैशाचा प्रवाह वाढत जाणार. पैसे येणे ही चांगली गोष्ट आहे.

पण पैशांचे व्यवस्थापन कसे करायचे? हे माहिती नसेल, तर ते पैसे जास्त दिवस टिकणार नाही. त्यासाठी तुम्हाला पैशांचे व्यवस्थापन कसे करायचे? याचे ज्ञान आत्मसात करावे लागेल. आलेल्या पैशांना कामाला कसे लावायचे? कुठे गुंतवणूक करायची? तेवढी बचत कशी करायची? हा सर्व पैशांच्या व्यवस्थापनाचा भाग झाला.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्याला ही आर्थिक साक्षरता, शाळेत शिकवले जात नाही. पण आपण पुस्तके वाचून, कोर्सेस करून, एक्सपर्ट ला भेटून, ते ज्ञान संपादन करू शकतो. आर्थिक साक्षरता संदर्भात आपण येणाऱ्या लेखांमध्ये आढावा घेऊच. मित्रांनो हे होते ते पाच स्किल्स जे आजच्या स्पर्धेच्या युगात तुम्ही आत्मसात केले पाहिजे.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.