कॅरेट म्हणजे काय ? ।। 24k, 22k, 18k व 14 k सोन्यामध्ये काय फरक आहे ? ।। 916 सोने काय असते ? जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय शेती शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो तुम्ही 24 कॅरेट, 22 कॅरेट, व 18 कॅरेट सोने बदल नक्कीच ऐकला असेल. तसेच नाईन वन सिक्स सोन्याबद्दल सुद्धा तुम्ही ऐकले असेल. परंतु बऱ्याच लोकांना कॅरेट म्हणजे काय असते? 24 कॅरेट सोने, 22 कॅरेट सोने, तसेच नाईन वन सिक्स काय असते याबद्दल माहित नसते.

तेव्हा आज आपण या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. सर्वात आधी जाणून घेऊ की कॅरेट म्हणजे काय? मित्रांनो कॅरेट हे सोन्याची शुद्धता मोजण्याचे एक माप आहे. जास्त कॅरेट म्हणजे अधिक शुद्ध सोने. व कमी कॅरेट म्हणजे कमी शुद्धतेचे सोने. कॅरेट वरून आपण दागिने मध्ये किती टक्के शुद्ध सोने आहे? ते कॅल्क्युलेट करू शकतो. ते कसे कॅलक्युलेट करायचे? ते पुढे आपण पाहणारच आहोत.

आता जाणून घेऊ 24 कॅरेट सोने काय असते?:  मित्रांनो 24के मध्ये के चा अर्थ कॅरेट असतो. चोवीस कॅरेट सोने ला शुद्ध सोने किंवा शंभर टक्के शुद्ध सोने म्हटले जाते. म्हणजेच अशा सोन्यामध्ये सर्व 24 भाग असतात. तरीही 100 टक्के शुद्ध असले तरी याला 99.99 टक्के शुद्ध सोने मानले जाते. कारण कोणत्याही वस्तू शंभर टक्के शुद्ध नसते.

जगामध्ये 24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध असते. याच्यापेक्षा जास्त कॅरेट सोने कधीच नसते. तरी सुद्धा काही दुकानदार 25 कॅरेट, 26 कॅरेट सोने सांगून लोकांची फसवणूक करतात. 24 कॅरेट सोने 22 कॅरेट व 18 कॅरेट सोन्याचा तुलनेत महाग असते. 24 कॅरेट सोने मृदू व लवचिक असते. त्यामुळे 24 कॅरेट सोने मध्ये जास्त दागिने बनवले जात नाहीत. अनेक दागिने 24 कॅरेट सोने मध्ये बनवले जातात. आणि हो 24 कॅरेट सोन्याचे दागिने लवकर झिजतात.

आता जाणून घेऊ 22 कॅरेट सोने काय असते: 22 कॅरेट सोन्यामध्ये फक्त 91.6 टक्के शुद्ध सोने असते. आपण पाहिले होते की 24 कॅरेट सोने मध्ये सर्व 24 भाग असतात. म्हणजेच ते शंभर टक्के शुद्ध सोने असते. तेव्हा 22 कॅरेट सोने म्हणजे 24 भाग 22 भाग शुद्ध सोने असते. 22 कॅरेट दागिन्यांमध्ये किती टक्के शुद्ध सोने आहे हे जाणून घ्यायचे असेल तर 22 लाख चोवीस ने भागावे लागेल.

व आलेल्या संख्येला शंभर ने गुणावे लागेल. अशा प्रकारे शेवटी आपल्याला 91.6 असतं उत्तर मिळेल. म्हणजे 22 कॅरेट सोन्यामध्ये 91 पॉईंट 67 टक्के शुद्ध सोने असते. मित्रांनो 22 कॅरेट सोन्याला नाईन वन सिक्स गोल्ड म्हटले जाते. 22 कॅरेट सोने मध्ये 91.6 टक्के शुद्ध सोने असते. या ठिकाणी 91.6 मधला पॉईंट काढून टाकला जातो

व 22 कॅरेट सोन्याला नाईन वन सिक्स गोल्ड म्हटले जाते. या 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के शुद्ध सोने व राहिलेले 8.33 टक्के चांदी, तांबे, निकेल धातू मिसळले जातात. मुख्यतः दागिने 22 कॅरेटचे बनवले जातात. कारण 22 कॅरेट सोन्यामध्ये इतर धातू मिसळलेले असल्याने सोने खडक असते. ज्यामुळे दागिने टिकाऊ बनतात.

916 सोने म्हणजे काय?: जेव्हा तुम्ही दुकानातून सोन्याचे दागिने खरेदी करता, तेव्हा अनेकदा तुम्ही दुकानदाराला हा शब्द बोलताना ऐकले असेल. ते दागिने 916 सोन्याचे शुद्ध असल्याचे सांगतात. या 916 चा अर्थ काय आहे हे तुमच्या लक्षात आले आहे का? ही संख्या सांगते की, सोन्याचे प्रमाण तुम्ही खरेदी करत असलेल्या दागिने किंवा नाण्यामध्ये आहे.

जर एखादे दागिने 916 म्हणून विकले गेले, तर याचा अर्थ असा की ते शुद्ध सोने 91.6% पर्यंत आहे. उर्वरित साहित्य इतर धातूचे आहे. येथे 916 ही संख्या सोन्याची शुद्धता दर्शवते. ही टक्केवारी दागिने किंवा दागिन्यांसाठी सर्वात शुद्ध मानली जाते. म्हणजेच दुकानदार 91.6 टक्के सोन्याचे दागिने देत आहेत, म्हणजे त्याच्या मते तुम्हाला शुद्ध दागिने मिळत आहेत.

आता जाणून घेऊ 18 कॅरेट सोने म्हणजे काय? : मित्रांनो 18 कॅरेट सोन्यामध्ये 75 टक्के शुद्ध सोने व 25 टक्के इतर धातू जसे चांदी, तांबे, जस्त किंवा निकेल मिसळलेले असते. 18 कॅरेट सोने अधिक कडत असल्याने मुख्यतः रत्नजडित दागिने 18 कॅरेट सोन्यामध्ये बनवले जातात. 18 कॅरेट सोन्याचा रंग 24 कॅरेट सोन्याचा तुलनेत फिका असतो. तसेच 18 कॅरेट सोने 22 कॅरेट सोन्याचा तुलनेत स्वस्त असते.

आता जाणून घेऊ 14 कॅरेट सोने म्हणजे काय? : मित्रांनो 14 कॅरेट सोन्यामध्ये 58.33 टक्के शुद्ध सोने व 41.६७ टक्के इतर धातू मिसळले जातात. या व्यतिरिक्त 12 कॅरेट व 10 कॅरेट सोने असते. 12 कॅरेट सोन्यामध्ये 50 टक्के सोने व दहा कॅरेट सोन्यामध्ये 41.7 टक्के सोने असते.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.