स्वकष्टार्जीत मालमत्ता मृत्युपत्राने दिल्यास ज्याला ती मिळाली त्याच्यी ती स्वकष्टार्जीत मालमत्ता ठरते का? कि ती वडिलोपार्जीत मालमत्ता बनते? या महत्वाच्या प्रश्नाला सर्वोच्च न्यायालयाने एका निकालाद्वारे उत्तर दिलेले आहे, त्याची थोडक्यात आणि महत्वाची माहिती जाणून घेऊ !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

मालकीचा प्रकारानुसार मालमत्ताच्या मालकीचे अनेक प्रकार आहेत. मात्र यापैकी दोन महत्त्वाचे प्रकार म्हणजे स्वकष्टार्जित मालमत्ता अणि वडिलोपार्जित मालमत्ता. स्वकष्टार्जित मालमत्ता म्हणजे अशी मालमत्ता जी एखाद्या व्यक्तीने स्वतः चा पैशाने स्वतः विकत घेतलेली आहे.

आणि वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे अशी मालमत्ता जी मालमत्ता एखाद्या व्यक्तीला वारसाहक्काने प्राप्त झालेली आहे. मात्र जेव्हा एखाद्या व्यक्तीची स्वकष्टार्जित मालमत्ता असेल त्या मालमत्तेच मृत्युपत्र केलेल असेल अणि ते मृत्युपत्र ज्याचा लाभात केलेल आहे

त्या व्यक्तीने ती मालमत्ता पुढे जर बक्षीस पत्रात दिलेली असेल तर हे स्वकष्टार्जित मालमत्ता मग मृत्युपत्र अणि मग बक्षीसपत्र एवढ्या प्रवासात त्या मालमत्तेच नक्की दर्जा काय असतो ती मालमत्ता स्वकष्टार्जित धरली जाते का वडिलोपार्जित धरली जाते हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयासमोर याचिका क्रमांक 75282019 या द्वारे उपस्थित झाला होता.

आता या याचिकेची किंवा या प्रकरणाची थोडक्यात वस्तू स्थिती सांगायची झाली तर एका व्यक्तीने एक मालमत्ता विकत घेतली होती ती मालमत्ता त्या व्यक्तीने मृत्युपत्राद्वारे आपल्या वारसापैकी एकाला ती लिहून दिली किंवा मृत्युपत्रातून त्याचा नावे केली त्या व्यक्तीचा निधनानंतर मृत्युपत्रा नुसार जो लाभार्थी होता त्याला ती मालमत्ता मिळाली

आणि त्या व्यक्तीनी मालमत्तेच पुढे बक्षीस पत्र केल तर हा जो प्रवास होता म्हणजे मृत्युपत्र अणि बक्षीसपत्र या मध्ये बाकी वारसांनी हरकत घेतली अणि त्यांच म्हणणं असं होता की ही जी विल किंवा मृत्युपत्राद्वारे मालमत्ता देण्यात आलेली आहे ती स्वकष्टार्जित मालमत्ता जरी असली,

तरी विलने मिळाल्यामुळे आणि ते विल जे होत ते सगळ्या कुटुंबाचा भल्यासाठी केलेल असल्याने त्या मृत्यु पत्राचा जो लाभार्थी आहे त्याचा अनुशंगाने ती मालमत्ता स्वकष्टार्जित न राहता वडिलोपार्जित झालेली आहे. सहाजिकच त्या व्यक्तीचे त्या मालमत्ते मधले अधिकार हे काही अंशी मर्यादित आहेत.

मात्र या प्रकरणावर निकाल देताना एक जुन्या प्रकरणाचा दाखला देण्यात आला तो होता मुद्लियार केसचा. मुद्लियार केस काय म्हणतेय तर मृत्युपत्रामध्ये जर कोणाला एखाद्या मालमत्तेची पूर्णपणे मालकी देण्यात आलेली असेल आणि त्यात कोणतीही अट, शर्त किंवा परंतु नसेल,

तर जेव्हा अशी मालमत्ता मृत्युपत्राद्वारे देण्यात येते किंवा मालमत्तेची संपूर्ण मालकी मृत्युपत्राद्वारे एखाद्या व्यक्तीला देण्यात येते तेव्हा त्या मृत्युपत्राचा जो लाभार्थी आहे त्या करता ही मालमत्ता ही स्वकष्टार्जित मालमत्ता ठरते या प्रकरणामध्ये विरोधीपक्षाच जे म्हणण होता,

की हे मृत्युपत्र केलेल आहे त्या मृत्युपत्रामधील लाभार्थी ला सगळ्या कुटुंबाचा भल्याकरता ती मालमत्ता वापरावी अशा उद्देशाने ती दिलेली आहे हे म्हणण मृत्युपत्रा मधील एकंदर सगळ लेखन किंवा मृत्युपत्रा मधील अटी अणि शर्ती अणि बाकी परिस्थिती चा पुरावा याचा आधारे सिद्ध होऊ शकलेल नाही.

म्हणजे झाल काय ज्या माणसाने मालमत्ता स्वतः विकत घेतली होती त्यांनी स्वकष्टार्जित मालमत्ता मृत्युपत्राद्वारे एका व्यक्तीला दिली सहाजिकच मुद्लियार केस प्रमाणे ती जी मालमत्ता आहे ती मृत्यु पत्राने मिळाली असल्याने ती ज्याला मिळाली त्याच्या करता सुद्धा ती स्वकष्टार्जित मालमत्ता ठरली.

सहाजिकच स्वकष्टार्जित मालमत्तेचे कोणताही निर्णय घ्यायची कोणताही करार व्यवहार किंवा कोणताही हस्तांतर करण्याची पूर्ण मुभा किंवा पूर्ण अधिकार त्या मालमत्तेचा मालकाला असतात. सहाजिकच या अनुशंगाने विरोधीपक्षाची जी याचिका आहे किंवा मागणी आहे ती ना मंजूर आणि या निकालाने सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केल की

जेव्हा एखादी स्वकष्टार्जित मालमत्ता मृत्युपत्राद्वारे विशेषता अश्या मृत्युपत्राद्वारे ज्या मध्ये कोणतीही परंतु किंवा कोणतेही अटी आणि शर्ती नाही अशा मृत्युपत्राद्वारे एखाद्या व्यक्तीला दिली जाते तेव्हा त्या मृत्युपत्रा मधला लाभार्थी त्याचा करता अशा मृत्युपत्र ने आलेली मालमत्ता ही स्वकष्टार्जित मालमत्ता ठरते आणि सहाजिकच त्या मालमत्तेचा उपभोग व्यवहार करार किंवा हस्तांतर असे काही करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य त्या मालमत्तेचा मालकाला असते.

हा एक अत्यंत महत्त्वाचा निकाल आहे मृत्युपत्रा ने मालमत्ता दिली केवळ या कारणामुळे स्वकष्टार्जित मालमत्तेचे स्वरूप बदलत नाही किंवा स्वकष्टार्जित मालमत्ता वडिलोपार्जित होत नाही हा अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष या निकालाने काढलेला आहे. तसेच जरी स्वकष्टार्जित मालमत्तेचे मृत्युपत्र हे अनेक वारसापैकी एकाच वारसाला केले असेल,

किंवा एकाच वारसाचा लाभत केल असेल तरी सुध्दा त्या मृत्युपत्रात काही विशिष्ट, सुस्पष्ट असं लिहिल नाही तोपर्यंत ती मालमत्ता त्याला एकट्यालाच दिलेली आहे असच गृहीत धरायला लागेल. अशी मालमत्ता कुटुंबाचा भल्याकरता एकाचा नावावर केलेली आहे असं म्हणण तथ्यहीन ठरेल किंवा कायद्याच्या कसोटीवर असा कोणता वाद टिकू शकणार नाही.

आपल्यापैकी अनेकांच्या मालमत्ता असतात काहींच्या स्वकष्टार्जित काही वडिलोपार्जित मिळतात बरेच लोक त्याच पुढे मृत्युपत्र करतात अणि मृत्युपत्रात जो लाभार्थी आहे तो त्याचा पुढे उपभोग तरी घेतो किंवा हस्तांतर तरी करतो. तर या सगळ्या एकंदर व्यवहाराच्या अनुशंगाने आपल्याला हे पक्कं माहिती असायला हव,

की जेव्हा स्वकष्टार्जित मालमत्ता असते अणि ती मृत्युपत्राने दिली जाते तेव्हा या निकालानुसार ती मालमत्ता स्वकष्टार्जितच राहते केवळ मृत्युपत्राने पुढे दिली म्हणून ही मालमत्ता वडिलोपार्जित निश्चितच होत नाही.

सहाजिकच आपल्या पूर्वजांनी किंवा आपण आपली स्वकष्टार्जित मालमत्ता एकाच वारसाला मृत्युपत्राने दिली तर त्यात काही कायदेशीर अडचण नाही किंवा अशा एखाद्या वारसाला स्वकष्टार्जित मालमत्ता मृत्युपत्रात मिळाली म्हणून ईतर वारसांनी उगाच वाद निर्माण करून त्याला यश येण्याची शक्यता सुद्धा फार कमी आहे

म्हणून जेव्हा आपला कोणताही मालमत्ते संदर्भात कोणताही वाद निर्माण होण्याची शक्यता असते तेव्हा त्या वादाचा परिस्थिती नुसार अणि विविध कायदे नियम अणि उच्च न्यायालयाचे विविध निकाल याचा अनुशंगाने याची जी मागणी आहे ती कायद्याचा कसोटीवर टिकणार आहे का?

आपण जर न्यायालयात दावा दाखल केला तर त्याला यश येण्याची शक्यता कितपत आहे याचा विचार केल्याशिवाय खटला दाखल करू नये. माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद. आपणास माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा

व अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

1 thought on “स्वकष्टार्जीत मालमत्ता मृत्युपत्राने दिल्यास ज्याला ती मिळाली त्याच्यी ती स्वकष्टार्जीत मालमत्ता ठरते का? कि ती वडिलोपार्जीत मालमत्ता बनते? या महत्वाच्या प्रश्नाला सर्वोच्च न्यायालयाने एका निकालाद्वारे उत्तर दिलेले आहे, त्याची थोडक्यात आणि महत्वाची माहिती जाणून घेऊ !

  1. वडिलोपार्जित प्रॉपर्टी चे इच्छापत्र किंवा मृत्युपत्र चालेल का जमिनीचे खाते फोड झालेले नाही जमीन एकत्रित आहे सावत्रआई ने इच्छापत्र मृत्युपत्र केलेला आहे सातबारा उताऱ्यावर तिचं नाव लागलेला आहे तिला कोणी वारस नाही मुलगा मुलगी

Comments are closed.