देशात किंवा राज्यात दंगली घडवून आणल्यास कोणती शिक्षा होवू शकते?

कायदा

मित्रांनो जर एखादा व्यक्ती दंगलीमध्ये सहभागी झाला असेल, तर सरकारच्या आदेशाची उल्लंघन केले असेल किंवा सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड केली असेल किंवा दंगलीसाठी प्रोत्साहन देत असेल किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत असेल. तर असे करणाऱ्या व्यक्तीस भारतीय दंड संहितेतील कलम 353,427,188, 109,143 आणि 147 हे लावल्या जाते.
मग चला तर जाणून घेऊया की, भारतीय दंड संहितेतील कलम 353, 427, 188, 109, 143 आणि 147 हे काय सांगते?

◆भारतीय दंड संहिता 1860 कलम 353 सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल कोणते शिक्षा होते?

जो कोणी सार्वजनिक सेवक म्हणून किंवा लोकसेवक म्हणून आपले कर्तव्य बजावत असताना किंवा त्या लोकसेवकाला सार्वजनिक सेवक म्हणून आपले कर्तव्य बजावण्यापासून जो कोणी रोखण्याचा प्रयत्न करतो किंवा धमकावण्याचा प्रयत्न करतो किंवा हल्ला करतो किंवा फौजदारी बळाचा वापर करतो तर असे करणाऱ्या व्यक्तीस दोन वर्षापर्यंत करावासाची शिक्षा होऊ शकते आणि दंड हि लागू शकतो किंवा दोन्ही शिक्षा त्या व्यक्तीला होऊ शकतात.

याचबरोबर, तसेच कलम 427 नुसार जो कोणी 50 रुपये किंवा त्याहून अधिक रकमेपर्यंत जो कोणी नुकसान करीन किंवा हानी करीन तर असे करणाऱ्या व्यक्तीस दोन वर्षापर्यंत करावासाची शिक्षा होऊ शकते किंवा दंड लागू शकतो किंवा दोन्ही शिक्षा ठोठावल्या जाऊ शकतात.

तसेच कलम 109 नुसार जो कोणी चिथावणी दिल्यानंतर प्रत्यक्षात जर अपराध केला असेल आणि स्वतंत्र शिक्षेची तरतूद नसेल तर शिक्षा कशी द्यावयाची, त्याबद्दलची माहिती कलम 109 मध्ये दिलेली आहे. म्हणजे जो कोणी गुन्हा करण्याची चिथावणी देतो ज्यामुळे प्रत्यक्षात गुन्हा केला जातो आणि जर संहितेत शिक्षेची खास तरतूद नसेल तर मूळ अपराधाला जी शिक्षा आहे ती शिक्षा अशाच चिथावणी करिता दिली जाते.

◆उदा: जर A ने B यांना खोटा पुरावा देण्यास चेथावणी देतो. चेथावणीमुळे B हा गुन्हा करतो. त्या अपराधाची चेथावणी दिल्याबद्दल A हा दोषी असेल, तर खोटा पुरावा दिल्यामुळे A ला जी शिक्षा दिली तीचे शिक्षा B ला पण दिली जाऊ शकते.

याचबरोबर, कलम 188 लोकसेवकाने रितसर जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे. जो कोणी आदेशाचे उल्लंघन करतो तर असे करणाऱ्या व्यक्तीस एक महिन्याच्या करावासाची शिक्षा होऊ शकते किंवा 2000 रुपयांपर्यंत दंडही लागू शकतो किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकता. तसेच कलम 188 लोकसेवकाने रितसर जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे.

◆आदेशाचे उल्लंघन म्हणजे काय? तर जेव्हा दंगल होण्याची शक्यता असते किंवा दोन गटात मतभेदामुळे हिंसाचार होऊ शकतो, अशावेळी कलम 144 लावली जाते. म्हणजेच जमावबंदीचे आदेश विद्यमान न्यायदाधिकारी किंवा जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी हे देत असतात आणि त्या आदेशाचं जो कुणी उल्लंघन करतो. तर असे करणाऱ्या व्यक्तीस भारतीय दंड संहितेतील कलम 188 लावल्या जाते.

कलम 143 बेकायदेशीर जमावाचा सदस्य असणे. जो कोणी बेकायदेशीर जमावाचा सदस्य असेल किंवा त्यात सहभागी होतो तर असे करणाऱ्या व्यकीस 6 महिन्यापर्यंत करावासाचे शिक्षा होऊ शकते किंवा दंड लागू शकतो किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
कलम 147 दंगली बद्दल शिक्षा बोलायचे झाले तर जो कोणी दंगल घडून आणण्यास दोषी असेल तर त्या व्यक्तीस 2 वर्षापर्यंत करावासाची शिक्षा होऊ शकते किंवा दंड लागू शकतो किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.