दोन पत्नी आणि कायदेशीर हक्क.. जाणून घ्या!!

कायदा

एका पुरुषाने एकापेक्षा अधिक महिलांशी विवाह करणं अशी उदाहरणं सध्या फार घडत नाहीत. अर्थात काही तुरळक अशी उदाहरणं आजही घडतात आणि अजून एक प्रश्न महत्त्वाचा येतो तो म्हणजे जेव्हा एखाद्या कुटुंबाच्या मालमत्तेच्या वाटपाचा वाद असतो त्याचा दावा असतो तर काही वेळेला हिंदू विवाह कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी त्याच्या घरांमधल्या पुरुषांनी एक किंवा दोन लग्न केलेली असतात आणि तेव्हा ती रूढी होत

त्याला फार कायदेशीर, बेकायदेशीर असं मांडलं जात नव्हतं. मग प्रश्न असा येतो की, जर एखाद्या पुरुषाच्या दोन पत्नी असतील पण एकाचं दोन पत्नी असल्यास तर वारसाहक्क कसं काय होतं? हा जटील प्रश्न आहे आणि याचं ठोस कायदेशीर उत्तर आजही आपल्या कायद्याकडे नाही.

मात्र हिंदू विवाह कायदा आणि हिंदू उत्तराधिकार कायदा यांच्या काही कायदेशीर तरतुदींचा या अनुषंगाने आपण याचा उत्तर किंवा वारसाहक्काचा उत्तर शोधायचा प्रयत्न करू शकतो. आता हिंदू विवाह कायदा, हिंदू उत्तराधिकार कायदा हे कायदे अस्तित्वात आल्यापासून दुसरे लग्न पहिली पत्नी किंवा पहिला विवाह वैद असताना केलेला दुसर लग्न हे बेकायदेशीर धरण्यात आलेला आहे. पण ती पत्नी जर बेकायदेशीर आहे असं ठरलं तर तिला वारसा हक्क मिळणार नाही.

याशिवाय अनेक वेळा दुसरं लग्न होवून ते त्या दुसऱ्या पत्नीपासून मुलं होतात. कायदेशीर भाषेत ज्याला आपण अनवरसर संतती असं म्हणतो अशा सुद्धा काही जन्माला येतो. आता वास्तविक या दोघांच्या अनैतिक किंवा बेकायदेशीर संबंधातून जन्माला आलेल्या संततीला आपण अनवरसर जरी म्हणत असलो तरी वास्तविक या संततीची तशी काही चूक नसते.

हाच मुद्दा लक्षात घेऊन हिंदू विवाह कायदामध्ये अशी स्पष्ट कायदेशीर तरतूद आहे की, एखाद्या बेकायदेशीर लग्नापासून जर आपण त्याचा जन्म झाला असेल तर वारसा हक्क वगैरे सगळ्या बाबी करता त्या आपण त्याला कायदेशीर आपण त्याचाच दर्जा देण्यात येतो. ही झाली हिंदू विवाह कायदामधील कायदेशीर तरतूद.

त्याचप्रमाणे हिंदू उत्तराधिकार कायदा यामध्येसुद्धा वारसा हक्कासंदर्भात विशिष्ट तरतूद करण्यात आलेली आहे. एखाद्या पुरुषाचा जर निधन झालं तर वारसाहक्काने त्याची मालमत्ता कोणा-कोणाला मिळते याविषयी विस्तृत आणि सविस्तर तरतूद करण्यात आलेली आहे. या तरतुदीनुसार सगळ्या विधवांना मिळून एक हिस्सा मिळतो आणि जेवढी मुलं त्यावेळी अस्तित्वात असेल त्यावेळेस प्रत्येकाला एक-एक हिस्सा मिळतो.

म्हणजे जर एखाद्या पुरुषाला निधनाच्या वेळी दोन पत्नी आहेत आणि त्या दोन्ही पत्नीला 1-1 अपत्य असेल तर याचे कायदेशीर वारस 2 पत्नी आणि त्यांची 2 अपत्य असे 4 होतात. पण जेव्हा वारसाहक्काचा विषय येतो तेव्हा या दोन्ही पत्नी मिळून एक हक्क आणि एका मुलाला एक हक्क आणि एका मुलाला एक हक्क किंवा हिस्सा म्हणजे या चार जणांमध्ये 3 केले जातात. प्रत्येक मुलाला एक तृतीयांश आणि या दोन्ही पत्नींना मिळून एक तृतीयांश हिस्सा दिला जातो. अशाप्रकारे ते वारसा हक्काची वाटणी होत असते.

या दोन्ही कायदेशीर तरतुदी लक्षात घेता दुसऱ्या पत्नीचा किंवा तिच्या अपत्याचा वारसा हक्क नाकारण्याचा जो प्रयत्न केला जातो तो प्रयत्न जर प्रकरण न्यायालयामध्ये पोचलो, कायद्याच्या कसोटीवर तपासून त्याची वेळ आली तर त्याच्यामध्ये या यश शक्यता कमी आहे. जर एखादे लग्न अवैध ठरलेला आहे त्या पत्नीला समजा हक्क नाकारला जाऊ शकतो. मात्र, त्याच सुद्धा 1% शक्यता आहे. पण तिची मुलं आहेत त्यांना समान हिस्सा कायद्याने दिलेला आहे तो मिळणारच आहे.

त्यामुळे जेव्हा वाटपाचा किंवा वारसा हक्काचा प्रश्न येतो आणि कुटुंबांमध्ये मागच्या कोणत्यातरी दोन पत्नी झालेले असतात, त्यामुळे पहिली पत्नी, दुसरी पत्नी अश्या वारसांमध्ये भांडण होतं आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की, आपला हिस्सा बरोबर आहे बाकीच्यांना काही देता कामा नये किंवा त्यांना काही मिळणार नाही पण असं काही होत नसतं.

कायद्याने जो प्रत्येकाला हिस्सा दिलेला आहे तो आपण डावलू शकत नाही, म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला वाटप करायचं असेल आणि आपल्या घराण्यामध्ये अशा दोन पत्नी झालेले असतील तर त्यानुसार हक्क किंवा हिस्सा निश्चित करतांना ही माहिती नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल..