एक आर म्हणजे किती जमीन? आर चे गुंठा, एकर मध्ये रुपांतर कसे करायचं?।। आर आणि गुंठा यामध्ये काय फरक आहे? याबद्दल महत्वाची माहिती !

शेती शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक आर म्हणजे किती जमीन आरचे गुंठ्यात व एकर मध्ये रूपांतर कसे करायचे?: जर आपण पूर्वीचे सातबारा उतारे पाहिलेत किंवा जमीनीसंबंधीचे कोणताही दस्तऐवज असतील तर त्यामध्ये आपल्याला जमिनीचे मोजमाप हे फुटामध्ये पाहायला मिळायचं,

पण आज जर आपण सातबारा उतारे पाहिले, कोणताही दस्तऐवज असेल त्यामध्ये आपल्याला आर हा शब्द पाहायला मिळतो. मग हा आर म्हणजे किती आणि आर म्हणजे काय आहे, या आर च रूपांतर गुंठ्यामध्ये कसं करायचं? एकर मध्ये कसं करायचं किंवा चौरस फुटामध्ये, चौरस मीटर मध्ये कसं करायचं? या संबंधित बरेच प्रश्न निर्माण होतात, तर यासंबंधीची माहिती आज आपण पाहणार आहोत.

प्रश्न 1:- आर म्हणजे किती जमीन? उत्तर:- आर हे मेट्रिक पद्धतीतील क्षेत्रफळ मोजण्याचे युनिट आहे, यामध्ये जेव्हा शंभर चौरस मीटर होतात तेव्हा एक आर तयार होतो.आता यामध्ये काय केलं जातं तर जमीनीच मोजमाप आहे ते मीटर मध्ये घेतले जातं आणि आणि थेट क्षेत्रफळाला शंभर ने भागल जात म्हणजे जर तुम्हाला तुमच्या जमिनीचा क्षेत्रफळ आर मध्ये पाहिजे असेल तर त्याला शंभर नि भागलं की तुम्हाला ते मिळेल.

प्रश्न 2:- आर आणि गुंठा यामध्ये काय फरक आहे? उत्तर:आताच आपण पाहिला की आर म्हणजे शंभर चौरस मिटर. यालाच जर चौरस फुटामध्ये रूपांतरित केलं तर एक आर म्हणजे 1076.39 चौरस फूट इतका होतं. म्हणजे एक गुंठा बरोबर 1089 चौरस फूट.आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरचे रूपांतर गुंठ्या मध्ये कसे करायचे

कारण जर आपण कागदपत्रके, सातबारा उतारे पाहिले तर त्यामध्ये आर चा उल्लेख जास्त असतो,आणि व्यवहारात आपण गुंठ्याचा चा वापर जास्त करतो, तर रूपांतर गुंठ्यात कसे करायचे हे आपण पाहू त्यासाठी जे काही आर असेल त्याला 1076.39 ने गणायचे आहे आणि आलेल्या उत्तराला 1089 ने भागायचे आहे तर तुम्हाला गुंठ्यामध्ये रूपांतर होऊन मिळेल..

यानंतर महत्त्वाचा प्रश्न येतो की आरचे रूपांतर एकर मध्ये कसं करायचं? आपण रूपांतर गुंठ्यामध्ये करताना जी पद्धत वापरली तीच तिथेही वापरायचे आहे आणि जे काही गुंठ्यात उत्तर आलेल आहे त्याला भागिले 40 करायचं आहे.अशाप्रकारे तुम्हाला आर चे रूपांतर एकर मध्ये मिळून जाईल,कारण का 1 एकर बरोबर 40 गुंठे असतात. यामध्ये काही महत्त्वाचे समीकरण आहे ते लक्षात ठेवायचे आहे.

चौरस मीटर = आर गुणिले 100
चौरस फूट = आर गुणिले 1076.39
गुंठा=आर गुणिले 1076.39 /1089
एकर =आर गुणिले 1076.39 /1089/ 40
या पद्धतीने आपण आरच रूपांतर चौरस मीटर,चौरस फूट, गुंठा आणि एकर मध्ये करू शकतो.

1 आर म्हणजे किती ?
1 आर म्हणजे 100 चौ मी
1 मी x 1 मी = 1 चौ मी
जेव्हा असे 100 चौ मी होतात त्यावेळी 1 आर तयार होतो. उदा – 10 मी x 10 मी ची जमीन यामध्ये जमिनीचे मोजमाप हे मीटरमध्ये घेतले जाते आणि त्याचे क्षेत्रफळ हे चौरस मीटर मध्ये काढून त्यास 100 ने भागले जाते.

आर मध्ये क्षेत्रफळ कसे काढायचे ?
जेवढे चौरस मीटर मधील क्षेत्रफळ असेल त्यास 100 ने भागायचे
आर = चौरस मीटर / 100

यानंतर महत्वचा प्रश्न आहे आर चे गुंठ्या मध्ये कसे रुपांतर करायचे ?
1 आर म्हणजे 100 चौ मीटर
जर आपण याचे चौरस फुटामध्ये रुपांतर केले तर आपल्याला 1076. 39 चौ फुट मिळतात. 1 गुंठा हा 1089 चौरस फुटाचा असतो म्हणूण आर चे गुंठ्या मध्ये रुपांतर करण्यासाठी जेवढे आर असतील त्याला 1076.39 ने गुणायचे आणि 1089 ने भागायच. आपल्याला आर मध्ये मोजमाप मिळेल.
गुंठा = आर x 1076.39 / 1089

जर आपल्याला एकर मध्ये पाहिजे असेल तर आर चे गुंठ्यात रुपांतर करून 40 ने भागायचे कारण 40 गुंठ्याचा एक एकर असतो.
चौरस मीटर = आर x 100
चौरस फुट = आर x 1076.39
गुंठा = आर x 1076.39 / 1089

एकर = आर x 1076.39 / 1089 / 40
1 गुंठा = 1089 चौ फुट
1 आर =1076.39 चौ फुट
1 एकर = 40 गुंठे

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

4 thoughts on “एक आर म्हणजे किती जमीन? आर चे गुंठा, एकर मध्ये रुपांतर कसे करायचं?।। आर आणि गुंठा यामध्ये काय फरक आहे? याबद्दल महत्वाची माहिती !

Comments are closed.