ग्राहक म्हणून कायद्याने आपल्याला कोणकोणते अधिकार प्राप्त झालेले आहेत?।। ग्राहकांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय आहेत ह्याबद्दल सविस्तरपणे जाणून घ्या !
ग्राहक म्हणून कायद्याने एका ग्राहकाला कोणकोणते अधिकार प्राप्त झालेले आहेत: बऱ्याच वेळेस दुकानातून वस्तू खरेदी करतो, ऑनलाईन वस्तू खरेदी करतो किंवा मॉल मधनं वस्तू खरेदी करतो किंवा सेवा या विकत घेतो. अशावेळी बर्याचवेळी ग्राहकाची फसवणूक दुकानदार तर्फे किंवा विक्रेत्या तर्फे पण केली जाते.
अशा वेळेस ग्राहकाला कायदेशीर कोणकोणते अधिकार आणि हक्क प्राप्त झालेले आहेत हे ग्राहकाला माहित असं खूप आवश्यक आहे. ग्राहक म्हंणून मिळालेले हक्क तुम्हाला माहित आहेत? ग्राहक संरंक्षण कायदा १९८६ नुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला ६ हक्क मिळाले आहेत. त्यांची माहिती असल्यास आपली फसवणूक होणार नाही.
१)सुरक्षेचा हक्क: आपण एखादी वस्तू विकत घेतो तेव्हा त्या वस्तूच्या सुरक्षितेची पूर्ण हमी उत्पादकांनी घेणं अनिवार्य असत. आपण ज्या वस्तू विकत घेतो त्याची उपयुक्तता हाच एकमेव निकष नाही तर त्या वस्तू सुरक्षितही असाव्यात. इलेक्ट्रिकल उत्पादन घेताना हि काळजी घेणं आवश्यक आहे.
वस्तू विकत घेण्यापूर्वी त्यांच्या गुणवत्तेबाबत तसेच त्या वस्तूवर मिळणाऱ्या सेवांबाबत आग्रही राहण्याचा ग्राहकाला पूर्ण अधिकार आहे. ग्राहकांनी शक्यतो आयएसआय आणि अंगमार्कच चिन्ह असलेल्या वस्तूच विकत घ्याव्यात. या वस्तूंच्या वापरामुळे शारीरिक किंवा आर्थिक नुकसान झालं तर कंपनीला नुकसान भरपाई द्यावी लागते.
२)माहितीचा हक्क: एखाद्या उप्तादनाबद्दल सर्व माहिती मिळवणं हा ग्राहकाचा हक्क आहे. त्या उत्पादनाची गुणवत्ता, प्रमाण, संख्या, शुद्धता, किंमत या सर्वांची माहिती मिळवण्याचा हक्क आहे एखाद उप्तादन किंवा सेवा घेण्यापूर्वी त्या संदर्भातली पूर्ण माहिती घेण्याचा अधिकार ग्राहकाला आहे. हा हक्क कोणताही दुकानदार किंवा व्यावसायिक नाकारू शकत नाही. सोन खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता तपासून घेण्याचा अधिकार हा ग्राहकाला आहे.
३)निवड करण्याचा अधिकार: आजच युग हे स्पर्धेचं युग आहे. वस्तू खरेदी करण्यासाठी जर तुम्ही एखाद्या दुकानात गेला आणि त्या ठिकाणी तुम्हाला फक्त एकाच ब्रँडच्या वस्तू दुकानदार विकत घेण्यास सांगत असेल तर लक्षात घ्या कि, हे तुमच्या हक्काच उल्लंघन आहे. (अपवाद फक्त विशिष्ट ब्रॅण्डचा आउटलेटचा)
समजा तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि त्या ठिकाणी तुम्ही शीतपेय मागितलं, पण वेटरनं म्हटलं की या ठिकाणी तुम्हाला फक्त एकाच कंपनीचं शीतपेय मिळेल तर हे तुमच्या हक्कविरोधात आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी एक पर्याय निवडण्याचा ग्राहकांना अधिकार आहे.
४)तुमचं म्हणणं मांडण्याचा हक्क: जर तुम्हाला वाटत असेल तुमची फसवणूक झाली आहे तर तुम्हाला तुमचं म्हणणं योग्य ठिकाणी मांडण्याचा पूर्ण हक्क आहे. ग्राहकांच्या हक्का च्या संरक्षणासाठी सरकारनं तक्रार निवारण केंद्र आणि ग्राहक न्यायालयांची स्थापना केली आहे.
इतकंच नाही तर ग्राहक त्यांचं म्हणणं सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी ग्राहक मंचाची स्थापना करू शकतात . या ग्राहक मंचाचं शिष्टमंडळ आपलं म्हणणं सरकारकडे मांडू शकतं. सरकार त्यांच्या सूचना आणि शिफारशींवर विचार करतं.
५)तक्रार करण्याचा आणि निवारण करून घेण्याचा हक्क: जर ग्राहकाची फसगत झाली असेल तर त्याला तक्रार नोंदवण्याचा हक्क आहे, जर तक्रार रास्त असेल तर तिच निवारण होईल असा हक्क कायद्यानं ग्राहकाला दिला आहे. कधीकधी एखादी तक्रार लहान असू शकते पण तरी देखील त्याविरोधात दाद मागता येऊ शकते.
६)ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार: ग्राहक हक्क शिक्षणाच्या अभावांमुळं ग्राहकांची फसवणूक होते असं ग्राहक हक्क चळवळ कार्यकर्त्याचं म्हणणं आहे. ग्राहकांनी आपले हक्क काय आहेत हे नेहमी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे,त्यासाठी सरकार वेगवेगळे उपक्रम राबवत असतं , तसंच स्वयंसेवी संस्था शिबीर किंवा कार्यशाळा घेत असतात.
ग्राहकांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य: ग्राहकांना केवळ हक्कच आहेत असं नाहीत, त्यांच्या काही जबाबदाऱ्या आणि काही कर्तव्य देखील आहेत याची जाणीव देखील त्यांना असायला हवी. ग्राहकांनी ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड, एगमार्क, आणि आय एस ओ प्रमाणित उप्तादन विकत घ्यावीत.
प्रमाणित केलेली उप्तादन सुरक्षेची एकप्रमाणे हमी देतात, म्हणून ती घेणं योग्य ठरत, ग्राहकांची फसवणूक झाल्यास तक्रार निवारण केंद्र आहेत, पण आपल्या जागरूकतेमुळे प्रशासकीय यंत्रणेवरील तणाव कमी होऊ शकतो आणि सर्वांचा वेळ वाचू शकतो.
तुम्हाला हे माहित आहे का? १)कोणत्याही हॉटेल मध्ये मोफत पाणी पिऊ शकता किंवा स्वछतागृहाचा वापर करू शकता इंडियन सराईज ऍक्टनुसार तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये जाऊन पाणी पिऊ शकता आणि त्यांचे स्वछतागृह वापरू शकता ते हि अगदी मोफत , पण तुम्ही त्या हॉटेलमध्ये काही घेतलं नाही तरी देखील या दोन सेवांचा वापर तुम्ही करू शकता.
२)जागो ग्राहक जागो ! हि जाहिरात घराघरांत कशी पोहचली ? जागो ग्राहक जागो हि जाहिरात घराघरांत पोहचली आहे. हि जाहिरात दूरदर्शन आणि इतर वाहिन्यांवर यावी यासाठी ग्राहक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी सरकारकडं शिफारस केली होती. “जाहिरातीसाठी असणारी आर्थिक तरतूद वाढवण्यात यावी आणि एक मोहीम सुरु करण्यात यावी. अशी शिफारस करण्यात आली होती. ती केंद्र सरकारनं मंजूर केली, एमआरपी वर देखील किंमत कमी करता येऊ शकते हा संदेश घराघरांत याच मोहिमेमुळे पोहचला होता.
३)सुट्टे पैसे नाहीत म्हणून दुकानदार तुम्हाला गोळ्या चॉकलेट देऊ शकत नाही, एक किंवा दोन रुपये सुट्टे नाहीत म्हणून बऱ्याचदा दुकानदार एक रुपयाच्या गोळ्या किंवा चॉकलेट देतात. चलनाला दुसरी पर्यायी वस्तू देण्याचा अधिकार दुकानदारांना नाही. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे आपण न मागता एखादी वस्तू आपल्याला विकण हे ग्राहक कायद्याचं उल्लंघन आहे.
४)दिलेलं वचन न पाळलयास कंपनीवर कारवाई होऊ शकते. जाहिरातीमध्ये वचन न पाळल्यास कंपनीवर दावा ठोकू शकतातच, पण त्याचबरोबर त्या उप्तादनाची जाहिरात करणाऱ्या व्यक्तीवरही दावा करू शकता. २०१५साली एक प्रकरण खूप गाजलं होत. जाहिरातीमध्ये
दाखविल्याप्रमाणे आपण गोर झालो नाही असं म्हणत एक युवकानं एका फेअरनेस क्रीम कंपनीवर दावा केला होता. दिल्लीच्या ग्राहक हक्क न्यायालयात या दाव्यावर सुनावणी झाली , न्यायालयंन कंपनीला दंड ठोठावला आणि जाहिरातीचे प्रसारण बंद करावे असे आदेश दिले होते.
५)शैक्षणिक संस्थांनी गुणवत्तेचे निकष न पाळल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, १००% प्लेसमेँटची जाहिरात दिली पण नोकरी मिळाली नाही तर विद्यार्थ्यांसमोर बिकट प्रश्न निर्माण होतो. अनेक संस्था माहितीपत्रकावर अनेक गोष्टींची आणि अत्युच गुणवत्तेची आश्वासन देतात पण ती पूर्ण करत नाहीत, त्या संस्था न्यायालयीन कारवाईसाठी पात्र ठरू शकतात.
६)रुग्णालयाने हलगर्जी पणा केल्यास कारवाई होऊ शकते, रुग्णालयाने केलेल्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचे नुकसान झाले तर रुग्णालयावर कारवाई होऊ शकते, जर रुग्णालय काही सेवा देण्यासाठी पैसे स्वीकारले असतील तर त्या सेवा देण्यास ते बांधील आहेत. जर त्यांची पूर्तता त्यांनी केली नाही तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
वरील हक्क आणि तरतुदी जरी ग्राहकांसाठी अत्यंत चांगल्या असल्या तरी आजही आपल्या देशात ह्यांची अमलबजावणी म्हणावी तशी प्रभावीपणे झालेली दिसत नाही. अंतिमतः आपले हक्क आणि अधिकार ओळखून त्याकरता संघर्ष करण्याची तयारी प्रत्येकानी ठेवली तर प्रत्येक ग्राहकाला हक्काच्या गोष्टी मिळणे दूर नाही !
ग्राहक म्हणून तुमच्या तक्रार असेल तर ती कशी द्यावी व त्याविषयी सविस्तर माहिती पुढील लेखात आपण लवकरच घेऊन येणार आहोत. आपल्याला माहिती आवडल्यास नक्की कळवा. (वरील माहिती www.youtube.com/techwithrahul या चॅनल वरून संकलीत व शंब्दांकित केलेली आहे)
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
सुपर