सात बारा सोबत बाकीचे गाव नमुने नंबर 1 ते 21 काय आहेत? शेतकऱ्यांना नक्कीच ह्याबद्दल माहिती नसते जाणून घ्या !

शेती शैक्षणिक

याच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न आपण आता करूया. साधारणपणे आपण जर पाहिलं कुठल्याही योजनेचा लाभ घेताना किंवा शेती विषयक काम करत असताना, आपल्याला जे महत्त्वाचे लागणारे कागदपत्र आहेत यामध्ये सातबारा आणि आठ अ आणि या दोन नमुने बद्दल च आपल्याला सर्वात जास्त माहिती असते.

तर हे गाव नमुने 1 ते 21 म्हणजे काय आहे. आणि याचा कशा प्रकारे आपल्याला फायदा होऊ शकतो किंवा या मधून आपल्याला काय माहिती मिळू शकते किंवा कशाप्रकारे यामध्ये रेकॉर्ड मेंटेन केला जातो या सर्वांबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. यामध्ये सर्वात प्रथम आपण पाहुया गाव नमुना नंबर 1: यामध्ये आपण जर पाहिलं तर गाव नमुना नंबर 1 ची नोंदवही असते.

या नोंदवहीमध्ये भुमिअभिलेख खात्याकडून जो आकार बंध केलेला असतो. त्या जमिनीचा सर्वे नंबर, त्या जमिनीचा गट नंबर किंवा त्या जमिनीचा जो काही आकार आहे हे सर्व या नोंदवहीमध्ये दर्शविलेले असते. आणि या सर्वां बद्दलची माहिती, सर्वे नंबर बद्दलची, आकाराबद्दल ची, गटनंबर बद्दलची हे सर्व आपण गाव नमुना नंबर 1 मध्ये पाहू शकतो.

आणि याचाच उपभाग म्हणजेच गाव नमुना नंबर 1 अ. गावामध्ये जे काही वन जमीन आहे वा जमिनीचा जो काही गट आहे या सर्व बद्दलची जी काही माहिती आहे गावातील वन जमिनीची ही सर्व माहिती आपल्याला गाव नमुना नंबर 1 अ मध्ये आपण घेऊ शकतो. यामधील दुसरा उपभाग आहे तो गाव नमुना नंबर 1 ब आणि एक ब मध्ये जर आपण पाहिलं तर जी सरकारच्या मालकीची ज्या जमिनी आहेत ज्यामध्ये शाळा किंवा स्मशानभूमी ग्रामपंचायत इत्यादी कार्यालय यांची जमिनी आहेत.

या सर्वांची नोंद ही ही गाव नमुना नंबर 1 ब मध्ये आपण घेऊ शकतो. त्याचप्रमाणे तिसरा उपभाग आहे तो गाव नमुना नंबर 1 क आणि आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर कूळ कायदा पुनर्वसन कायदा सिलिंग कायदा या कायद्यानुसार भोगवटदार यांना दिलेल्या जमिनी या जमिनीची सर्व माहिती ती सर्व माहिती आपण गाव नमुना नंबर 1 क मध्ये पाहू शकतो याच्यामध्ये सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास

जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतना खाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते आणि याची नोंद गाव नमुना नंबर एक क मध्ये घेऊ शकतो. त्याचप्रमाणे चौथा उपभाग आहे तो गाव नमुना नंबर 1 ड यामध्ये आपण पाहू शकतो कुळ वहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर यांची सर्व माहिती आपण या गाव नमुना नंबर 1 ड मध्ये घेऊ शकतो.

गाव नमुना नंबर 2: मध्ये जर आपण पाहिलं तर या नोंदवहीमध्ये गावातील जे बिनशेती क्षेत्र आहे, अकृषिक क्षेत्र आहे या सर्व जमिनींची जी काही माहिती गाव नमुना नंबर दोन नोंद केलेली असते. गाव नमुना नंबर 3: जर आपण पाहिलं तर गावातील जे काही दुमला जमीन आहेत ज्याची देवस्थानासाठी ची जमीन दिलेली असते अशा सर्व जमिनी ची माहिती किंवा नोंद ही आपल्याला गाव नमुना नंबर 3 मध्ये घेऊ शकतो.

गाव नमुना नंबर 4: जर आपण पाहिलं तर गावातील जमिनीचा महसूल महसुलाची वसुली त्याच प्रमाणे विलंब शुल्क या सर्व बद्दलची जी काही माहिती आहे ती माहिती आपण गाव नमुना नंबर 4 मध्ये आपण पाहू शकतो. गाव नमुना नंबर 5: मध्ये जर आपण पाहिलं तर गावाचे एकूण क्षेत्रफळ आहे गावाचा एकूण महसूल त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे कर याबद्दलची सर्व जी काही माहिती आहे ती हि गाव नमुना नंबर 5 यामध्ये ठेवलेली असते.

त्याचप्रमाणे गाव नमुना नंबर 6: यामध्ये हक्काचे पत्र किंवा फेरफार किंवा नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती तसेच खरेदी रक्कम किंवा कोणत्या तारखेला खरेदी झाली होती किंवा कुठल्या नोंदणी कार्यालयात याचा दस्त झालेला होता खरेदी झाली होती व्यवहार झाला होता या सर्वांबद्दल ची माहिती जी आहे ती या गाव नमुना नंबर 6 मध्ये ठेवली जाते.

गाव नमुना सहा चे दोन उपभाग आहेत म्हणजेच सहा अ अ आणि सहा ब: याच्यामध्ये आपण जेव्हा फेरफार करतो आणि कुणी हरकत घेतलेली असेल त्याची तक्रारीची नोंद किंवा चौकशीची नोंद आणि अधिकाऱ्यांनी काय निकाल दिला होता याबाबतची सर्व माहिती आणि आणि तक्रार आणि निर्णयाची माहिती ते गाव नमुना नंबर 6 अ आणि सहा ब मध्ये आपल्याला मिळून जाते.

याच प्रमाणे गावातील वारसाची जी काही माहिती असते ते गाव नमुना नंबर 6 क क या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची ची नोंद आपल्याला मिळते आणि याचा चौथा जो प्रकार आहे गाव नमुना नंबर 6ड या नोंदवहीमध्ये जे काही जमिनीचे पोटहिस्से आहेत त्याचप्रमाणे वाटणी किंवा भूमी संपादन बद्दल ची सर्व माहिती या गाव नमुना नंबर 6 ड यामध्ये ठेवली जाते.

गाव नमुना नंबर 7: आता हे जे कागदपत्र आहे याला आपण बोलीभाषेमध्ये सातबारा म्हणतो कारण कुठलीही योजना असो किंवा शेतीविषयी कुठलीही ही कामे असो तर आपल्या शेतीची कुंडली असते ते कुंडली म्हणजे सातबारा कारण यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये आपला जो काही सर्वे नंबर आहे त्याचा जो काही गट नंबर आहे किंवा त्या सर्वे नंबर मध्ये त्या गट नंबर मध्ये जे जमिनीचे मालक आहेत त्यांची नावे

त्यांचे क्षेत्रफळ किंवा सामुदायिक शेती असेल तर प्रत्येकाचे नाव त्यांच्या नावावर असलेली जमीन किंवा त्याच्या मधे सुद्धा पोट खराबी असलेले क्षेत्र या सर्वांबद्दल ची माहिती हे सगळं सातबारामध्ये मेंटेन केले जातात म्हणजे काही लागवडीखालील क्षेत्र आहे पोटखराब क्षेत्र आहे हे सर्व या सातबारा मध्ये नोंद मिळते याच्यामध्ये कोणाच्या नावावर ती विहीर असेल असेल बोर असेल त्याचप्रमाणे काही वृक्ष लागवड फळबाग याप्रमाणे पेरणी लागवड केलेले जे सर्वक्षेत्र आहे या सातबारा मध्ये सर्व माहिती मिळते.

आणि गाव नमुना नंबर 7 अ हा त्यातलाच एक उपप्रकार आहे आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर कुळवहिवाट याबाबतची जी काही माहिती आहे याची नोंद वही असते यामध्ये कुळाचे नाव आकारलेला कर व खंड या सर्वांची माहिती आपल्याला मिळते.

गाव नमुना नंबर 8: आठ अ चे एकूण चार प्रकार आहेत. जमिनीची नोंद, सर्वे नंबर, त्या नावावरील एकूण क्षेत्र या सर्व बद्दलची माहिती गाव नमुना नंबर 8 अ नोंद मिळते. गाव नमुना नंबर आठ ब क ड मध्ये आपण जर पाहिलं तर गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची जे काही नोंद आहे या सर्वांची माहिती हे गाव नमुना नंबर 8 ब क ड या नोंद वही मधे नोंद केलेली जाते.

गाव नमुना नंबर नऊ: आणि यामध्ये नऊ अ यामध्ये जर आपण पाहिलं तर शासनाला दिलेल्या काही पावत्या आहेत या सर्व पावत्यांची ग्रामपंचायत मध्ये तलाठी मार्फत जे काही नोंद होते या सर्व नोंदी आपल्याला गाव नमुना नंबर 9 अ आपल्याला पाहायला मिळते. गाव नमुना नंबर 10: यामध्ये जे काही गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुली ची ची माहिती या सर्व बद्दलची जी काही माहितीची नोंद आहे ती गाव नमुना नंबर 10 च्या नोंदवहीमध्ये पाहायला भेटते.

गाव नमुना नंबर आहे अकरा: तर या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर पीकपाणी आणि झाडांची सर्व माहिती गावात जे काही क्षेत्र आहे या सर्व क्षेत्रांमधील सर्व सर्व क्षेत्रांमधील सर्वे नंबर मधील पीकपाणी व झाडे आहेत याची सर्व माहिती आपल्याला या गाव नमुना नंबर 11 मध्ये मिळते. गाव नमुना नंबर 12 आणि 15: मध्ये जर पाहिलं तर पिकाखालील क्षेत्र पडीक क्षेत्र पाण्याची व्यवस्था व इतर बाबतची माहिती हे गाव नमुना नंबर 12 आणि 15 मध्ये नोंदविलेले असते.

गाव नमुना नंबर 13: मध्ये जर आपण पाहिलं तर गावाची जे एकूण लोकसंख्या आहे गावातील जे जनावर आहेत या सर्व बद्दलची माहिती याची नोंद ही सर्व नोंद गाव नमुना नंबर 13 मध्ये मिळते. गाव नमुना नंबर 14 मध्ये जर आपण पाहिलं तरगावाच्या पाणी पुरवठा बद्दलची जी काही माहिती आहेत तसेच पाणीपुरवठा कशा प्रकारे केला जातो या सर्वांची माहिती आपल्याला गाव नमुना नंबर 14 मध्ये या ठिकाणी मिळते.

गांव नमुना नंबर सोळा मध्ये: जर आपण पाहिलं तर माहिती पुस्तके परिपत्रके हरकती पत्रक वगैरे जे काही सर्व माहिती आहे ही सर्व माहिती गाव नमुना नंबर सोळा मध्ये आपण पाहू शकतो. गाव नमुना नंबर 17 मध्ये: जर आपण पाहिलं तर महसूल आकारणी केली जाते गावांमध्ये या महसूल आकारण्याची जी माहिती आहे ते या गाव नमुना नंबर 17 मध्ये मिळते.

गाव नमुना नंबर 18 मध्ये: जर आपण पाहिलं तर यामध्ये सर्कल ऑफिस मंडल अधिकारी यांना जे काही पत्र व्यवहार केलेले आहेत आपल्या ग्रामपंचायत मार्फत या सर्व पत्र व्यवहाराची ती ती या गाव नमुना नंबर अठरा मध्ये मिळून जाते. गाव नमुना नंबर 19: या नोंदवहीत सरकारी मालमत्तेची महिती हे गाव नमुना नंबर 19 मध्ये मिळते. गाव नमुना नंबर 20: मध्ये जे काही पोस्ट तिकिटांची नोंद आपल्याला या नोंदवहीमध्ये मिळते.

गाव नमुना नंबर 21: मध्ये जर आपण पाहिलं तर सर्कल ऑफिस यांनी जे काही सांगितले कामाची दैनंदिन माहिती हे गाव नमुना नंबर 21 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. साधारणतः गाव नमुना नंबर 1 ते 21 बद्दलची माहिती घ्यायची म्हटलं तर आपल्या आपल्या ग्रामपंचायत किंवा तलाठी यांच्यामार्फत ही माहिती होऊ शकतो किंवा याची माहिती आपल्याला कशा प्रकारे मिळेल याच्याबद्दल जर आपल्याला प्रश्न पडले असतील तर तलाठी यांचे मार्फत याचे उत्तरे आपण घेऊ शकतो.