नमस्कार, आज आपण को-ऑपरेटिव हाउसिंग सोसायटी म्हणजेच सहकारी गृहनिर्माण संस्था या विषयीच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया. सभासदत्वाचे प्रकार ।। विक्री करारनामा आणि शेअर सर्टिफिकेट किंवा मेंबरशिप यांच्यात काही संबंध आहे का?।। सदनिका किंवा गाळे विकताना सोसायटीच्या एनओसी ची गरज असते का?।। कन्व्हेन्स आणि डीम कन्व्हेन्स यामध्ये काही फरक आहे का?।। नॉमिनेशन ने मालमत्ता हस्तांतरित होते का?
प्रश्न १:- को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी किंवा सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या सभासदत्वाचे किती प्रकार आहे? उत्तर:- सहकारी गृहनिर्माण संस्था व त्याचे सभासदत्व याचा विचार करायचा झाला तर त्याचे मुख्य तीन प्रकार आहे. १) मेंबर २) असोसिएट मेंबर ३) नॉमिनल मेंबर
१)मेंबर म्हणजे कोण? उत्तर: सोसायटी शेअर सर्टिफिकेट मध्ये ज्याचे नाव पहिल्या क्रमांकावर असते तो त्या सोसायटीचा मेंबर असतो. ह्या मेंबरला मेंबरशिप चे सर्व अधिकार असतात .त्याच्या कोणत्याही अधिकारावर कोणत्याही प्रकारची मर्यादा नसते.
२)असोसिएट मेंबर म्हणजे कोण? उत्तर:- शेअर सर्टिफिकेट वर जर एकापेक्षा जास्त नावे असतील तर पहिले नाव सोडून ची आणखी नावे असतात ते सर्व लोक असोसिएट मेंबर असतात. असोसिएट मेंबरला मेंबरशिप चे कोणतेही अधिकार नसतात. पण शेअर सर्टिफिकेट च्या संदर्भात जो मेंबर आहे तो अनुपस्थित असेल किंवा जर त्यांनी अधिकार पत्र दिले असेल तर मेंबर च्या वतीने ती व्यक्ती काम करू शकते.
३)नॉमिनल मेंबर म्हणजे कोण? उत्तर:-नॉमिनल या शब्दावरूनच आपल्याला कळते की त्याची मेंबरशिप ही नॉमिनल असते आणि त्यांना मेंबरशिप चे विशेष कोणतेही अधिकार नसतात. एखाद्या मेंबरच्या संमतीने त्याच्या कामाकरिता एखादी व्यक्ती असेल तर त्याला नॉमिनल मेंबरशिप दिली जाऊ शकते. उदाहरणार्थ .भाडेकरू, केअरटेकर किंवा एखाद्या संस्थेचे जर युनिट असेल तर त्याचे कर्मचारी ह्या लोकांना नॉमिनल मेंबरशिप दिली जाऊ शकते.
प्रश्न २:- विक्री करारनामा आणि शेअर सर्टिफिकेट किंवा मेंबरशिप यांच्यात काही संबंध आहे का? उत्तर:- तसं बघायला गेलं तर दोघांचा संबंध आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. पहिल्या प्रश्नात पाहिल्याप्रमाणे ज्याचे नाव पहिले तो मेंबर आणि त्याच्या नंतरचे नाव असते तो असोसिएट मेंबर.
आता विक्री करारामध्ये एकापेक्षा जास्त नावे असतील तर शेअर सर्टिफिकेट मध्ये असणाऱ्या नावांचा क्रम हा सारखाच असतो. विक्री करारानुसार त्या मालमत्तेमध्ये त्या व्यक्तींना समान हक्क आणि अधिकार असतात. मात्र शेअर सर्टिफिकेट वर ज्याचे नाव पहिल्या क्रमांकावर असते.
त्याला मेंबरशिप मिळते व पहिल्या नावाच्या नंतर असणाऱ्या नावांना असोसिएट मेंबरशिप मिळते. त्याला पूर्ण मेंबरशिप मिळत नाही. त्यामुळे विक्री करारातील नावांचा अनुक्रम व सर्टिफिकेट वरील नावांचा अनुक्रम यामध्ये दाट असा कायदेशीर संबंध आहे.
प्रश्न ३:- सदनिका किंवा गाळे विकताना सोसायटीच्या एनओसी ची गरज असते का? उत्तर:- तसे पाहता या प्रश्नाचे दोन उत्तरे आहेत. पहिल आहे कायदेशीर आणि दुसर आहे वास्तविक. कायदेशिर बघता सोसायटी नियमांमध्ये झालेल्या सुधारणे नुसार कोणालाही कोणताही युनिट विकण्याकरिता एनओसी ची आवश्यकता नाही.
तसं बघता एनओसी कोण देऊ शकत तर जो ऑब्जेक्शन घेतो अशीच व्यक्ती किंवा माणूस एनओसी देऊ शकते. सोसायटीमध्ये एखाद्या व्यक्तीची मालमत्ता जर तो कुणाला हस्तांतरित करत असेल तर त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार हा सोसायटीला नसतो.
सोसायटी फक्त एखाद्या युनिट संदर्भात त्यांच्यावर कोणत्याही स्वरुपाची थकबाकी नाही असे लिहून देऊ शकते. कारण थकबाकी व त्याची वसुली हा सोसायटीचा कायदेशीर अधिकार आहे. मात्र वास्तवात जेव्हा अशा सदनिकांची खरेदी-विक्री होते तेव्हा मात्र जर कर्ज असेल तर संस्था किंवा बँक एनओसी ची मागणी वारंवार करतात. मात्र अशा एन ओ सी ची अजिबात आवश्यकता नाही.
प्रश्न ४):- कन्व्हेन्स आणि डीम कन्व्हेन्स यामध्ये काही फरक आहे का? उत्तर:- कन्व्हेन्स म्हणजे काय तर एकदा इमारतीचे काम पूर्ण झालं किंवा संस्था निर्माण झाले की, ती इमारत आणि त्या खालची जमीन या दोन्ही ची मालकी जमीन मालक किंवा विकासक यांच्याकडे हस्तांतरीत केली जाते तेव्हा त्याला कन्व्हेन्स म्हणतात.
डीम कन्व्हेन्स म्हणजे काय तर इमारत व त्या खालची जमीन यांची मालकी कोणाकडे हस्तांतरीत न करता सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा सोसायटी ही शासकीय अधिकाऱ्याकडे म्हणजे सहकार विभागाकडे त्याच्या नामनिर्देशित अधिकार्याकडे अर्ज करून एकतर्फी कन्व्हेन्स केल्या जाते.
हे जे कन्व्हेन्स केल्या जाते त्याला डीम कन्व्हेन्स असे म्हणतात. कायदेशीर दृष्ट्या कन्व्हेन्स आणि डीम कन्व्हेन्स यामध्ये काही फरक नाही. तसं पाहता या दोन्ही कन्व्हेन्स ने इमारत आणि मालमत्ता या दोन्हीची मालकी सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा सोसायटी यांच्या लाभात हस्तांतरित होते.
प्रश्न ५:- नॉमिनेशन ने मालमत्ता हस्तांतरित होते का? उत्तर:- नॉमिनेशन हे सोसायटी मेंबरशिपसाठी केलं जातं. हे नॉमिनेशन सोसायटी शेअर आणि मेंबरशिप एवढ्यापुरता मर्यादित असतं त्यामध्ये मालमत्ता हस्तांतरित होऊ शकत नाही. समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीच्या लाभात नॉमिनेशन केलेले असेल तर जो कोणी नॉमिनी असेल आणि इतर वारस यांच्यामध्ये जर वाद निर्माण झाला तर त्या वादावर निर्णय देताना नॉमिनेशन झाले या आधारावर निर्णय दिला जात नाही.
असा निर्णय देतांना वारसाहक्क, त्याअनुषंगाने मृत्युपत्र, वारसा हक्कानुसार प्रत्येकाला मिळणार असंभाव्य हक्क, या सर्व गोष्टी बारकाईने तपासल्या जातात. नुसतं नॉमिनेशन आहे म्हणून त्या नॉमिनी ला सर्व मालमत्ता मिळेल असं नाही. मालमत्तेच्या मालकी हक्काबाबत आणि त्याच्यासोबत सोसायटीच्या मेंबरशिप बाबत वाद निर्माण होऊ शकतो.
असा वाद न्यायालयात सुद्धा जाऊ शकतो आणि न्यायालयात न्याय देताना नॉमिनेशन ची कोणतीही बाधा त्या प्रकरणात उद्भवत नाही. त्यामुळे नोमिनेशन केल म्हणजे सगळं संपलं असं होत नाही किंवा नॉमिनेशन केलं म्हणजे बाकी वारसांचा हक्क संपला असं होत नाही. नॉमिनेशन ही एक मेंबरशिप हस्तांतरित करण्याची चांगली सोय आहे. मात्र नॉमिनेशन हे अंतिम असे निश्चितच नाही.
After sale of property,whether share certificate is automacly transfer to transfree or not. If not what will do for transfer share certificate in the name of transferee.
आमची कल्याण ला सोसायटी आहे त्या मधे तीन वेग वेगवेगळ्या सोसायटी आहेत.व आत मधे येण्यासाठी दोन गेट आहेत व ऐक सोसायटी जास्त आत मधे आहे ऐकुन 9 सेकुरेटी वाचमन आहेत ऐका गेटवरती 7 ते 3 ते 11 ते सकाळी 7 आसे तिन्ही ठीकाणी समान सेकुरेटी आसते तर ऐका सोसायटी मधे 72 रुम दुसऱ्या सोसायटी मधे 72 रुम आहेत व ऐका सोसायटी मधे 32 रुम आहेत तरी ऐकुन सेकुरेटीचा ऐकुन पगार 70 हाजार रुपये होतोय तर ऐका सोसायटीला किती पैमेट करावे लागेल हि माहिती मिळावी ही विनंती
I own one big shop rented one bank but before 6 year they leave half portion other portion of shop I want to sale full shop had one share certificate. Can society gave mi new share certificate for new member. Pls guide for this issue
एखाद्या गृहनिर्माण संस्था एका अमुक जातीच्या नावे रजिस्टर आहे पण त्या संस्थेमध्ये इतर जातींची पण सभासद आहेत
परंतु खरेदी विक्री करताना संबंधित सोसायटी प्रमुख किंवा संचालक आत्ता आमच्या अमुक जातीची सोसायटी असून आमच्या अमुक जातीलच आम्ही खरेदी किंवा विक्री करू असा ठराव केला असून आम्ही इतर समाजाला खरेदी विक्री देऊ किंवा घेऊ शकत नाही अस सांगत आहेत
हे अस कायदा आहे का