लग्नातील पेहराव निवडण्यापुर्वी बॉडी टाईपचा विचार जरुर करा

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

लग्नसराई सुरु झाली की विविध ठिकाणचे सेलही सुरु होतात. लग्नासाठी पेहराव खरेदी करताना चालू असलेला ट्रेंड, लूक्स, रंग, पोत, कार्यक्रम या सगळ्यांचा आवर्जून विचार केला जातो. फक्त केला जात नाही तो बॉडी शेपचा विचार. लग्नासाठी सगळ्यात सुट होणारा पेहराव निवडताना तुमचा बॉडी शेप कसा आहे याचा विचारही जरुर करा.

लग्नाचा दिवस प्रत्येक मुलीसाठी खास असतो. अशा वेळी केवळ ट्रेंडच्या आहारी जाऊन कोणताही पेहराव चॉईस करण्यापेक्षा बॉडीशेपचा विचार करुन निवडावा. जेणेकरुन तुमचा खास दिवस अधिक खास होईल. अशा वेळी की बेसिक टिप्स जरुर उपयोगी पडतील.

रेअ‍ॅक्टंगल शेप – या बॉडी शेपमध्ये उठावदार दिसणं सगळ्यात मोठं आव्हान असतं. कारण या बॉडीशेपमध्ये शोल्डर, हिप्स एका रेषेत असतात. अशा वेळी कर्वी बॉडी लूक दिसण्यासाठी एम्पायर लाईन लेहंगा बेस्ट ऑप्शन आहे. चोलीच्या ऑप्शनसाठी ऑफ शोल्डर या पर्याय सर्वोत्तम आहे. अशा वेळी काही कंबरपट्ट्या सारख्या इतर अ‍ॅक्सेसिरीजनी कर्वी लूक मिळवू शकता.

उलटा त्रिकोण – Inverted triangle किंवा उलटा त्रिकोण प्रमाणे असलेला हा बॉडी शेप हेवी अपर बॉडी असलेला असतो. तर लोअर बॉडी शेप तुलनेने निमुळता होत गेलेला असतो. त्यामुळे कळीदार लेहंगा या शेपला कॉम्प्लिमेंट करणारा ठरेल. डीप नेक चोली यावर ट्राय करायला हरकत नाही. यासोबत हेवी लेहंगा या बॉडीशेपसाठी सर्वोत्तम आहे.

पेअर शेप – यामध्ये शरीराची लोअर बॉडी ही अपर बॉडी पेक्षा हेवी असते. त्यामुळे ओव्हर शेप असलेला बॉडीचा सेक्शनकडे कमी लक्ष वेधलं जाईल याकडे पेहराव निवडताना रोख असावा. अशा वेळी चोळीमध्ये तुम्ही एक्सपेरिमेंट करु शकता. पण लेहंगा मात्र डार्क कलरचा निवडा. ज्यामुळे लोअर बॉडी हेवी वाटणार नाही. याशिवाय बारीक वर्क असलेला लेहंगा तुमच्या लूकला चार चांद लावेल.

याशिवाय उंची कमी असलेल्या मुलींनी बारीक वर्क वाले लेहंगे निवडावेत. जेणेकरुन उंची कमी वाटणार नाही. लेहंगा आणि सॅण्डल्स यांच्या उंचीचा ताळमेळही जुळायला हवा. त्यामुळे तुमच्या पर्सनॅलिटीला परफेक्ट ग्रिप येईल.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा