सिंधुताई सपकाळ एक जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, अनेक अनाथांच्या आई म्हणून ओळखल्या जातात. अगदी खडतर आयुष्य जगून त्या आज मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या बनल्या आहेत, वीस वर्षाच्या असताना त्यांना त्यांच्या सासरच्यांनी घरातून हाकलून दिलं, तेव्हा त्या 9 महिन्याच्या गरोदर होत्या, गाईच्या गोठ्यात त्यांनी एका मुलीला जन्म दिला व नाळ स्वतः दगडाने ठेचून तोडली.
त्यांनी रस्तावरील भिकाऱ्यांना जेवण दिल आणि त्या बदल्यात त्या भिकाऱ्यांनी त्यांची रक्षा केली असे त्या सांगतात. पुण्यातील एका कॉलेज मध्ये तरुणांना संबोधित करताना त्या सुरेश भट्ट यांची एक कविता म्हणून दाखवतात व सांगतात, “जन्मलो तेव्हाच नेत्री आसवे घेऊन आलो, दे तुझी आकाशगंगा बोल मी केव्हा म्हणालो, घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला, पोळलेला प्राण माझा बोलण्याआधीच गेला, जीवनाची प्रेत यात्रा थांबली जेव्हा स्मशानी, घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसांनी.
त्या म्हणतात स्वतः दुःख व्यक्त करत बसू नका, ओळखीची माणसचं खांदा काढून घेतात, जीवनात जगताना अडीअडचणी, धोक्याची सल, पाय घसरण्याची जागा या माहीत असाव्यात, काटेकुटे ओलांडावे लागतात त्याशिवाय रस्ता गवसत नसतो, म्हणून त्या म्हणतात, एक लक्षात ठेवा “मेरे जनाजे के पिछे सारा जहाँ निकला, लेकीन वो नही निकले जिनके लिये जनाजा निकला” कुणाची वाट पाहताय, सोडून जाणारे खूप असतात.
सोबत राहणारे फार कमी असतात, तुम्ही स्वतःला जाग करा, स्वतःतील ऊर्जा जागृत करा, कोसळून जाऊ नका, उद्या ची पहाट तुमची आहे, माझ्याकडे तरी काय होतं, अंधारात जगणारी मी सिंधुताई आज इथे येऊन पोचले, मी स्मशानात राहायचे, रेल्वेत भीक मागायचे, भिकाऱ्यांसोबत राहायचे, जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजायचे, म्हणून एक लक्षात ठेवा, भिकारीण वीस वर्ष्याची मी आज सत्तर वर्ष्याची आहे, हजारो लेकरांची माय होऊ शकते.
२८२ जावई, ४९ सुनांची सासू, १७५ गाईंची आई, ७५० पुरस्कारांची मानकरी, ४ राष्ट्पती पुरस्काराने सन्मानित सिंधुताई सपकाळ. म्हणून बहिणाबाई सांगतात ‘दिव्यात तेल नसेल तर आत्मबळ टाकायला शिका’. बहिणाबाई शिकल्या नाहीत तरी आज त्यांच्या नावाचं विद्यापीठ आहेत, म्ह्णून सिंधुताई सांगतात.
‘पुढे चालत राहा, पण मागे वळून पहा, काट्यांना फक्त बोचणं माहीत असत, वेदना त्यांना कळत नसतात, या रस्ताने चालायचं असेल तर पाय एवढे मजबूत बनवा की एक दिवस काटे पण म्हणतील, “आइये वेलकम, सुस्वागतम, हम झुकते है तुम चलना सिखो”. त्या म्हणतात माझ्या चित्रपटात फक्त चार दगड मारताना दाखवलीत पण खरं तर मी सोळा दगड मारून नाळ तोडलं, म्हणून खंत बाळगू नका, जगायला शिका.
“जब उसिने मेरे कब्र पर आके मुसकुरा दिया, बिजली चमक के गीर पडी, सारा कफन जला दिया। “कफन जळू द्या रे तुम्ही दफन होऊ नका, 22 देशात मी जाऊन आले, कधी वाटलं नव्हतं, नववारी घालणारी मी एवढी मोठी होईल २२ देशात जाईल, मी जेव्हा परदेशात जाते तेव्हा तिथले भारतीय म्हणतात ‘जय महाराष्ट्र, नववारी बेस्ट’ देहप्रदर्शन करण म्हणजे शिकणं नाही आणि जगण पण नाही.
तुमच्याकडे बघताना समोरच्याला मादी वाटायला नको, माय आठवली पाहिजे, तेव्हा मुली सुरक्षित होतील, शिकणं म्हणजे टाचेवर चालणं नाही, मी तर शिकले पण नाही, तरी पण जगले तुम्ही पण जगा हा संदेश मला द्यायचाय. त्या पुढे सांगतात, ‘गरिबी वाईट असते, गरिबांपर्यंत पोहचा, ज्या झोपडीत अंधार आहे, तिथे मायेचा दिवा लावा, आपल्या खाऊतले दोन घास गरिबांना द्या, दुःख वाटून घ्या, मी अनाथांची आई झाले तुम्ही गणगोत व्हा.
‘याच कारण बहिणाबाई सांगतात, “नाही दिव्यामध्ये तेल, कशी अंधारली रात, तेल मिळे एकदाच, नेली उंदरानं वात” याच नाव गरिबी आहे, “वात केली चिंधुकाची तेल दिव्यात पडलं, सापडेना आगपेटी, घोडं इथं ग अडलं” आपण का हरतो याच कारण यांच्यात आहे. “सापडली आगपेटी, आग्या वेताळाची लेक, आली आली हाती काडी नाड्या नवसाची एक “काडी एकच आहे ती हरत पण नाही आणि मरत पण नाही” अशी लागली आगकाडी, ज्योत पेटली पेटली.
अंधाराला घाबरून तीही विजुनिया गेली” दिवे विजतात तुम्ही आतून पेटायला शिका, विजू नका, अंधाराच्या शोधात जा, जगायला शिका, याच कारण, फ़ुलांच्या पायघड्या वरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका कारण काट्यांना फक्त बोचणं माहीत असतं, वेदना कळतं नसतात दिवस उगवतो, एक रात्रीचा इंतजार करा, नंतर जे साध्य होत ते हे होतं “दूध मे पकाये चावल तो उसे खीर कहते है, मोहब्बत मे खाई ठोकर तो उसे तकदिर कहते है, लकीर की फकिर हू मै, उसका कोई गम नही, नही धन तो क्या हुआ इज्जत तो मेरी कम नही। “इज्जतदार व्हा, पेटायला शिका, उजेड निर्माण करा, माणूस बना, चालत रहा पण मागे वळून पहा.