या पट्ठ्याने खायचं तेल चक्क हेअर ऑईल म्हणून खपवलं………… वाचा सविस्तर

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

तेल लावलेला पैलवान कोण आहे? असं विचारलं तर सहाजिकच “शरद पवार” यांचं नाव येतं. काहीजण अमित शहा यांच्या नावाचाही उल्लेख करतील. पण आज आपण येथे एक अस्सल तेल लावलेल्या पैलवान ना बद्दल सांगणार आहोत, जो गेली 45 वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेला गंडवतोय. या माणसाने भारतातील नियमांचा अचूक फायदा घेतला आहे. गेली 45 वर्ष तो सांगून गंडवतोय, तरीही त्याला कोणीही पकडू शकलं नाही. आणि त्याचं कारण ही तितकाच भन्नाट आहे. कोण आहे तो माणूस? चला तर मग ते पाहून घेऊ.
◼️आता एक काम करा. तुमच्या घरात पॅराशुट तेलाची निळी बाटली असेल, त्या बाटलीवर “हेअर ऑइल” असं लिहिलंय का? बघा. तुम्हाला कुठेही त्या बाटलीवर हेअर ऑइल असं लिहिलेला दिसणार नाही. त्यावर फक्त कोकोनट ऑइल असा उल्लेख आहे. दुसरी गोष्ट म्हणजे खाण्यासाठी ज्याप्रमाणे नॉनव्हेज साठी हिरवा आणि लाल रंगाचं व्हेज साठी असतं. तसच यावर निळ्या रंगाचं चिन्ह मिळते.

म्हणजे काय, तर तुम्ही डोक्यावर लावतात ते तेल केसांना लावायचं नसून ते खाद्यतेल आहे. आता मुद्दा येतो की असं कसं आणि हे काय भानगड आहे? तर मारीको असं त्या कंपनीचं नाव आहे. ही कंपनी वेगवेगळ्या ब्रांड साठी ओळखली जाते. वेगवेगळ्या ब्रँडसाठी ओळखली जात असली तरी त्या कंपनीचा मुख्य ब्रांड हा पॅराशुट ची बाटली हाच राहिला आहे. त्यांच्या यशाची सुरुवात होते ती 1971 सालापासून. बॉम्बे ऑईल इंडस्ट्री नावाची कंपनी होती, या कंपनीचा कारभार तरुण असणाऱ्या हर्ष मारे वाला यांच्या हातात होता. तरुण रक्त असल्याने या पठ्ठ्याने वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली.

त्यातला सर्वात भारी प्रयोग होता तो म्हणजे कोकोनट कोकोनट तेल विकायचा. त्याकाळी कोकोनट तेल हे खाण्यासाठी, डोक्याला लावण्यासाठी सर्वांसाठी वापरलं जात होतं. पण सगळ्यात मोठा तोटा होता ते म्हणजे ते पत्र्याच्या मोठ्या डब्यात डब्यातून मिळायचं. त्यामुळे मध्यमवर्गीय लोक अस ते घेऊन डोक्याला लावण पसंत करायचे नाही. काही तरी आकर्षक पॅकेजिंग करून तेल विकल पाहिजे असं हर्ष मारी वाला यांच्या सुपीक डोक्यात चालू होतं.

Buy Parachute Coconut Oil 200ml from Tirupattur Home Delivery & Get Door Delivery Within Few Hours

त्यांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. आपल्या कंपनीची टीम त्यासाठी त्यांनी कामाला लावली. तेव्हा त्यांना समजलं की प्लास्टिकच्या डब्यातून कोकणात तेल विकण्याचा प्रयोग यापूर्वी एका कंपनीने केला होता, पण कोकोनट तेल आणि प्लास्टिक चे कंबिनेशन उंदरांना प्रचंड आवडल्याने एक ही बाटली ग्राहकाच्या हाती लागली नाही. आता आता हर्ष मारे वाला मुळातच तेल लावलेले पैलवान होते त्यांनी एक आयडिया केली. त्यांनी काय केलं, तर प्लास्टिकच्या कॅन्स च रूपांतर बाटलीत केलं. बाटली गोलाकार ठेवले आणि उंदरांवर प्रयोग केला. बाटली गोलाकार असल्यामुळे ती उंदरांचा तोंडात येऊ शकली नाही. त्यामुळे प्रयोग यशस्वी झाला.

आता दुसरा प्रयोग होता म्हणजे पॅराशुट चं ब्रँडिंग. खाद्यतेलावर आत्तापर्यंत कर नव्हता. त्यामुळे खाद्यतेल स्वस्तात विकून चांगला फायदा मिळवता येत होता. पण हे तेल ब्युटी प्रॉडक्ट म्हणून जर विकलं तर मात्र त्यांना मोठ्या प्रमाणावर कर द्यावा लागणार होता. आणि म्हणून मग त्यांनी कोकनट ऑईल हे खाद्यतेल म्हणून विकण्यास सुरुवात केली. 1975 पासून पॅराशुट ची बाटली खपू लागली. घरातले मोक्याची जागा तिने मिळवली .पॅराशुट ची बाटली नसलेलं घर मिळवणं अशक्य झालं. भारतासोबत वेगवेगळ्या देशातही ते आपलं तेल विकू लागले. कंपनीने चांगलं नाव कमावलं.

यादरम्यान ची जाहिरात सुरू झाली मात्र काळजीपूर्वक जाहिरात पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, कोणत्याही जाहिरातीत समोरची ललना तेल घेऊन ते केसांना लावताना दिसत नाही. एकीकडे ललना आणि दुसरीकडे बॉटल. हा तिचे लावण्याचे केस लांब सडक असायचे. पण ती कुठेही हे तेल डोक्याला लावा असं सांगायची नाही. मध्यंतरी कोणीतरी कंपनीची तक्रार केल्याची माहिती इंटरनेटवर मिळाली होती. पण यात चुकीचं काय? आम्ही खाद्य तेल विकतोय. आता त्याच काय करायचं ? ते ग्राहक ठरवतील. त्यामुळे कंपनीचे मालक कुठल्याही नियमांचा भंग करत नाहीत.

थोडक्यात काय तर हा माणूस अस्सल तेल लावलेला पैलवान आहे ते यावरून कळतं. सध्या जीएसटी च्या वेगवेगळ्या स्लब मध्ये खाद्यतेलावर कमी कर आहे. आजही ही कंपनी पॅराशुट च्या त्यांच्या साईटवर गेल्यानंतर मात्र केसांना तेल लावल्याचे उल्लेख आणि बाटली दिसते पण काळजीपूर्वक पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की हे कंपनीचे वेगळे प्रोडक्स आहेत. पॅराशुट नंतर काढलेला जास्मिन तेल हे स्पेशल हेअर ऑइल क्रीम यांची जाहिरात करून ते प्रॉडक्ट काढण्यात आले आहेत. पण त्यांची संख्या फक्त जाहिरात इथेच आहे. प्रत्यक्षात विक्री मात्र पॅराशुट या नेहमीच्या तेलाची आहे.

दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करण्यासाठी खोबरेल तेल वापरतात आणि ते थेट पॅराशुट ची बाटली च वापरतात. आपल्याकडे हे तेल डोक्याकडे लावतात. साधारण 80 टक्के लोक खोबरेल तेल डोक्याला लावण्यासाठी वापरतात आणि त्यामुळे कंपनी चांगला फायदा घेते. मारी को कंपनीचा 24 देशांमध्ये व्यवसाय आहे. बांगला देशात सर्वाधिक खपणारा ब्रँड म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे हर्ष मारे वाला हे भारतातील श्रीमंतांच्या यादीत 34 व्या नंबरला येतात तेही कोणतेही लबाडी न करता, फक्त अक्कलहुशारी करून.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा