पुणे – मुंबईकडे जमीन विकत घेण्याअगोदर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? ।। ऍग्रिकल्चरल जागेच्या तुलनेत नॉन अग्रिकल्चरल जागा फायद्याची की तोट्याची?

शेती शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो मागच्या काही दिवसात जर आपण जमीन विकत घेणाऱ्या लोकांचा सर्वे केला तर त्यांच्याकडून प्रखरतेने येणारा असा एक प्रश्न आपल्या लक्षात येईल बऱ्याचश्या ऑनलाइन पोर्टल वर किंवा जमीन विकत घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या साइटवर जर आपण माहिती काढली तर एकाच एरिया मधल्या एकाच जमिनीची किंमत ही तुम्हाला वेगवेगळी पाहायला मिळते.

काही ठिकाणी त्याची किंमत 300 रुपये काही ठिकाणी 600 रुपये तर काही ठिकाणी 1200 रुपये पाहायला मिळते तर हा फरक का? असा प्रश्न बऱ्याच ग्राहकांकडून ऐकायला मिळतो. प्रत्येक ग्राहकाकडून त्यांच्या गरजेनुसार येणाऱ्या मागण्या पूर्ण करताना या गोष्टी लक्षात घेतल्या जातात त्या पुढील प्रमाणे:

1.सगळ्यात महत्वाचा पहिला घटक म्हणजे जमिनीचा प्रकार ती जागा कोणत्या प्रकारची आहे तुम्ही एग्रीकल्चर जागा घेताय की नॉन ॲग्रीकल्चरल जागा घेतात, ऍग्रिकल्चरल जागेच्या तुलनेत नॉन अग्रिकल्चरल जागाही तिपटीने महाग असते कारण म्हणजे कोणत्याही

एग्रीकल्चरल जागेला लगेच नॉन अग्रिकल्चरल जागे मध्ये रुपांतरीत करता येत नाही त्यासाठी सरकारचे काही नियम आणि कानुन आहेत त्यामुळे प्रत्येक एग्रीकल्चरल जागाही नवीन अग्रिकल्चर होत नाही

2.दुसरी गोष्ट म्हणजे एक जरी एग्रीकल्चर जागांवर ॲग्रिकल्चरल मध्ये रुपांतरीत करायची झाली तरी त्यासाठी जवळपास 45 टक्के जागा , सोयीसुविधा मोकळी जागा आणि इतर गोष्टी पुरवण्यांमध्ये जाते.

3.तिसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही नॉन अग्रिकल्चरल जमीन विकत घेत असाल आणि त्याचा भाव एकेठिकाणी कमी या दुसऱ्या ठिकाणी जास्त असेल तर त्या जागेचं FSI तपासणे गरजेचे आहे कारण जमिनीची किंमत ही त्या जागेच्या FSI वरून प्रमाणित होते एफएसआय म्हणजे तुम्ही घेतलेल्या

जागेवर किती बांधकाम करू शकता FSI हा जर 0.5 असेल तर तुम्ही हजार स्क्वेअर फूट जागा घेतली तर त्यावर पाचशे स्क्वेअर फुट बांधकाम करू शकता आणि जर FSI 1.5 असेल तर दोन हजार स्क्वेअर फूट जागेवर दीड हजार स्क्वेअर फुटाचे बांधकाम करू शकता त्यामुळे जमिनीची किंमत ही FSI वरून बदलते.

4.चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही जर जागा पुण्यामध्ये घेणार असाल तर तिथे PMRDA ची परमिशन घ्यावी लागते म्हणजेच पुणे मेट्रो ओरिजनल डिजिटल अथोरिटी यांची परवानगी घ्यावी लागते कारण तो एरिया सिटी डेव्हलपमेंट एरिया मध्ये येतो त्यामुळे त्याचे भाव हे इतर जागेपेक्षा थोडे जास्त असू शकतात.

5.पाचवी गोष्ट म्हणजे जमिनीचे लोकेशन तुम्ही घेत असलेली जमीन ही विमानतळापासून ,मार्केट पासून तसेच इतर उपलब्ध सोयी सुविधांपासून किती अंतरावर आहे यावर त्याचे भाव ठरतात त्यामुळे जमीन घेण्याआधी गुगल मॅप वर त्याचे लोकेशन तपासणे गरजेचे आहे.

6.त्या जागेला कोणकोणत्या सोयी सुविधा दिल्या जातात या देखील बघणे गरजेचे आहे कारण की या सोयी सुविधा पुरविण्यासाठी देखील डेव्हलपर ला खर्च करावा लागतो दुसरी गोष्ट म्हणजे या दिलेल्या सोयीसुविधा बद्दल घेण्यात येणारी वार्षिक रक्कम तुम्ही देऊ शकता का हेदेखील बघणे गरजेचे आहे.

तर या वरील दिलेल्या गोष्टी जर तुम्ही जागा घेताना लक्षात घेतल्या तर तुम्ही घेतलेली जागा नक्कीच तुम्हाला लाभदायी ठरेल. आपल्याला अशीच माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो त्यात अनेक लोकांचे अनेक प्रश्न असतात. आम्ही सर्वांना उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करू.

1 thought on “पुणे – मुंबईकडे जमीन विकत घेण्याअगोदर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? ।। ऍग्रिकल्चरल जागेच्या तुलनेत नॉन अग्रिकल्चरल जागा फायद्याची की तोट्याची?

  1. Rajangav pune area’s kasa aahe mi ghetli aahe pan toda daut aahe mi aata kay karu saga please

Comments are closed.