कोणता व्यवसाय करावा हे कसे शोधावे ह्याबद्दल ३ पद्धती जाणून घ्या ।। या पद्धती वापरून नफा देणारा व्यवसाय कसा निवडायचा? याबद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या !
मित्रांनो या कोरोनामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेले आहेत. आम्हाला व्यवसाय करायचा आहे पण कोणता करावा हेच सुचत नाहीये? आज मी तुम्हाला व्यवसाय करायचा कल्पना, आयडियाज कशा शोधायच्या? त्याच्या तीन पद्धती सांगणार आहे. या पद्धती वापरून नफा देणारा व्यवसाय कसा निवडायचा? हे तुम्हाला समजेल.
शिवाय प्रत्येक पद्धत सांगताना मी काही उदाहरणे सुद्धा देणार आहे. जेणेकरून तुम्हाला तुमचा व्यवसाय निवडला सोपे जाईल. चला तर मग सुरू करूयात. पहिले आहे, तुमच्या आजूबाजूला कोण कोणत्या समस्या आहे? याची यादी बनवा. मित्रांनो या जगामध्ये जास्त करून व्यवसाय करण्याच्या कल्पना, हि पद्धत वापरून शोधले गेले आहेत.
इथे तुम्हाला जागृत राहून हे बघावे लागेल, की तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या गावात, शहरात लोकांना कोण कोणत्या समस्या आहेत. तुम्हाला त्याची यादी बनवायची आहे. आणि शांतपणे विचार करून तुम्हाला हे बघायचं आहे की तुम्ही लोकांची कोणती समस्या सोडवू शकता? असे केल्याने तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी अनेक नवीन कल्पना सुचतील.
एक उदाहरण घेऊ, मुंबई मध्ये रस्त्यावर किती ट्राफिक असते, हे तुम्हाला वेगळे सांगायला नको. लोक तासंतास ट्रॉफीक मध्ये आडकलेली असतात. मुंबई मध्ये राहणाऱ्या एका युवकाला कल्पना सुचली. त्याने विचार केला, जेव्हा पब्लिक ट्राफिक मध्ये एवढा वेळ रखडते, तेव्हा त्यांना भूक लागत असेल.
या युवकाला इथे व्यवसायाची संधी दिसली. यांनी काय केले? जिथे जिथे मुंबई मध्ये सर्वात जास्त ट्राफिक असते. तिथे वडापाव आणि पाण्याचे बाटल्या विकायला सुरुवात केली. तुम्हाला सांगतो मित्रांनो, त्याचा हा व्यवसाय एवढा जोरात चालू लागला. हा युवक या व्यवसायातून लाखो मध्ये करू लागला.
दुसरं उदाहरण मी माझ्या सोसायटीचेच देतो. आमच्या सोसायटीमध्ये सहाशे पेक्षा जास्त फ्लॅट आहेत. आता आपल्या सर्वांना माहिती आहे, हे को’रो’ना परत सर्वत्र पाय पसरायला लागला आहे. त्यामुळे आमच्या सोसायटीत सुद्धा रू’ग्ण वाढायला लागले आहे. इथे सुद्धा आमच्या सोसायटीत राहणाऱ्या ला एक संधी दिसली.
ज्या घरात को’रो’ना रु’ग्ण असतात, ते पंधरा दिवस घराबाहेर पडू शकत नाही. शिवाय परिवारामध्ये स्त्रीला को’रो’ना झाला असेल, तर जेवण बनवायचे वांदे होतात. मग अशा मध्ये त्या व्यक्तीने ह्या लोकांसाठी टिफिन सेवा चालू केली. आणि थोडा रेट जास्त ठेवला.
लोकांना आईते जेवन मिळाल्यामुळे ते परवडू लागले. आणि इथे सुद्धा, त्या व्यक्तीचा व्यवसाय जोरात चालू लागला. सांगण्याचा मुद्दा मित्रांनो, तुम्हाला समस्या शोधून त्यावर योग्य ते निवारण, व्यवसाय स्वरुपात घ्यायची आहे.
दुसरी पद्धत. चालू असणारे व्यवसाय अजून चांगल्या प्रकारे कसे करू शकतो? मित्रांनो हे सुद्धा व्यवसाय शोधण्याची एक जबरदस्त पद्धत आहे. अनेक लोकांना वाटते जगामध्ये खूप स्पर्धा आहे. त्यामुळे आमचा व्यवसाय चालणार नाही. पण इथे सुद्धा तुम्ही सतर्क राहून, बारकाईने जे चालू असलेले व्यवसाय आहे त्यांचे अवलोकन करा.
आणि तेच व्यवसाय अजून चांगल्या प्रकारे कशी करता येतील? याचा विचार करा. इथं तुम्हाला हे बघायचे आहे, की सर्वात जास्त चालणारा कोणता व्यवसाय आहे? आणि तोच व्यवसाय तुम्ही चांगल्या प्रकारे कसं करू शकता ? याचे उदाहरण द्यायचे झाले तर चहाची टपरी. हा कित्येक पिढ्या पासून चालत आलेला व्यवसाय आहे.
तुम्हाला मी जर म्हणालो की चहाची टपरी या व्यवसायाबद्दल तुमचे काय मत आहे? तर तुमच्यापैकी अनेक जण उत्तर देतील, की जागोजागी चहाची टपरी आहे. पण मित्रांनो काही वर्षापूर्वी पुण्यामध्ये दोन युवकांना कल्पना सुचली. आणि त्यांनी बाजारामध्ये तंदूर चहा ही नवीन संकल्पना आणली. या चहा ला एवढा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. की लाखोंमध्ये हे युवक कमवू लागले. दुसरे उदाहरण वॉट्सप चे देता येईल.
वॉट्सप च्या या जगामध्ये किती वापर होतो, हे वेगळे सांगायची गरज नाही. कोणी विचार तरी करु शकतो का, व्हाट्सअप ला स्पर्धा करायची? पण व्हाट्सअप मध्ये ज्या त्रुटी होत्या, त्याचा अभ्यास केला गेला. आणि आज बाजारामध्ये टेलिग्राम हे नवीन कम्युनिकेशन अँप आलं आहे. आणि बऱ्यापैकी वॉट्सप वापरणारी पब्लिक टेलिग्राम सुद्धा वापरू लागली आहे.
तिसरी पद्धत आहे, हे शक्य आहे का? मित्रानो ही पद्धत पहिल्या दोन पद्धतीपेक्षा थोडी वेगळी आहे. ईथे तुम्हाला असा व्यवसाय निर्माण करायचा आहे, जो आतापर्यंत कोणी केलेला नाही. पण ज्याची गरज सर्वात जास्त आहे. बल्ब चा शोध, विमानाचा शोध, ट्रेन चा शोध, मोबाईलचा शोध, अशे अनेक शोध. या पद्धतीमुळे शक्य झाले आहे.
सुरुवातीला या सर्व गोष्टी अशक्य वाटत होत्या. पण त्या वास्तवात उतरवल्या गेल्या. मला मान्य आहे ही पद्धत थोडी अवघड आहे. त्याला प्रचंड मेहनत आणि बुद्धीचा कस लागणार आहे. पण माझे हे कर्तव्य आहे, मी तुम्हाला सांगने. कारण सांगता येत नाही उद्या आपल्या मराठी बांधवातून एखादा बिलगेट्स होऊ शकतो.
जेफ बेझोज होऊ शकतो. एलोन मस्क होऊ शकतो, मुकेश अंबानी होऊ शकतो. अशा अनेक समस्या या जगामध्ये आहे. ज्याचे समाधान आपण देऊ शकतो. जसे कि ट्राफिक ची समस्या, प्रदूषणाची समस्या, भ्रष्टाचाराची समस्या. फक्त गरज आहे आऊट ऑफ बॉक्स विचार करण्याची. मित्रांनो मला खात्री आहे या तीन पद्धती तुम्हाला योग्य व्यवसाय निवडण्यासाठी मदत करतील.
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
Great
मी शेती मध्ये कोणता उद्योग करू शकतो