थंडीच्या कडाक्याने त्वचेची झालीये अशी अवस्था? हा घ्या त्यावरील उपाय

लोकप्रिय

यंदा थंडीने तिचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. जवळपास देशभरात थंडीने आपला हात पसरला आहे. जिथे दिसेल तिथे थंडीचं साम्राज्य आणि शेकोटी भोवती बसलेले लोक दिसत आहेत. रोजच्या व्यवहारावर, व्यापार- उदिमावरही या थंडीचा परिणाम होताना दिसतो आहे.

हा महिना उत्तरायणाचा मानला जातो. कोवळं उन, बोचरी थंडी हे कॉम्बिनेशन सुखद असलं तरी अनेकदा अनेक आजारांनाही निमंत्रण देणारं ठरतं. ऋतुबदल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पण आपल्या संस्कृतीने प्रत्येक ऋतुसाठी खास योजना बनवली आहे.

खान-पान, पेहराव, सण समारंभ या सगळ्यांवर ऋतुमानाचा अमीट अ‍सा प्रभाव आहे.  हा ऋतु व्यायामासाठी उत्तम मानला जात असला तरी उबदार पांघरुन सोडूण उठणं हे देखील कोणतं दिव्य करण्यापेक्षा अजिबात कमी नसतं. पानगळतीच्या या ऋतुमध्ये शरिरावरही परिणाम होते.

Essential winter skin care tips that you should follow

अतिथंडीमुळे वातावरणातील शुष्कपणा वाढतो. त्याचप्रमाणे त्वचेवरील शुष्कपणाही वाढू लागतो. त्वचेच्या शुष्कपणाशी लढण्यासाठी आम्ही दिलेल्या या टीप्स तुम्हाला उपयोगी ठरु शकतात. सगळ्या आधी त्वचा कोरडी पडू नये यासाठी हायड्रेटेड राहणं अगदी महत्त्वाचं आहे. कोरडी त्वचेसाठी सगळ्यात महत्त्वाची आणि सहज उपलब्ध होणारी गोष्ट म्हणजे खोबरेल तेल. अंघोळीपुर्वी त्वचेला खोबरेल तेलाचा मसाज खुप उपयुक्त ठरतो.

विशेष म्हणजे हे घरोघरी सहज उपलब्ध होणं शक्य आहे. घरी उपलब्ध होणारी आणखी एक वस्तू म्हणजे कोरफड. थंडीमुळी पायाला पडलेल्या भेगा असो किंवा कोरडे केस कोरफड या सगळ्यावर गुणकारी आहे. थंडीमध्ये सगळ्यात जास्त नुकसान होतं ते हाताचं. संपुर्ण शरीर कपड्यांच्या आवरणाखाली असलं तरी हात मात्र बरेचदा थेट कोरड्या हवेच्या संपर्कात येतात.

Effective Tips on Using Aloe Vera for Hair Growth | Femina.in

हातांसाठी एक सोपा उपाय करता येणं शक्य आहे. शिया बटर, व्हिटॅमीन ई कॅप्सूल आणि खोबरेल तेल याचं मिश्रण झोपण्यापुर्वी हाताला लावावं आणि पाच- दहा मिनिटं हाताला मसाज करावा. यामुळे डेड स्कीन निघून जातेच. शिवाय हाताला ग्लो देखीही येतो