कुळ म्हणजे काय? ।। कुळ कसा तयार होतो? ।। कुळाचे कोण कोणते हक्क असतात? ।। कुळ कायदा कलम-43 च्या अटी !

जमीनीला कूळ लागणे हा वाक्य प्रयोग आपल्याला सर्वांना माहितीच आहे चांगला परिचयाचा झालेला आहे. कुळ म्हणजे काय? कुळ कसे तयार होते कुळाचे हक्क कुठ कुठले असतात. आणि शेत जमीन आणि कुळाचे काय कायदेशीर संबंध आहे हे आपण यामध्ये पाहणार आहोत.

जमीनीतील कूळ हक्क: जमीनीला कूळ लागणे हा वाक्यप्रयोग आता आपल्याला चांगलाच माहिती झालेला आहे. कुळ म्हणजे काय? कुळ कसा तयार होतो? कूळाचे कोणते कोणते हक्क असतात आणि शेत जमिनी व कुळ यांचे कायदेशीर संबंध काय आहे? याची आज आपण माहिती घेणार आहोत. “कसेल त्याची जमीन असेल” असे तत्व घेऊन कुळ कायदा अस्तित्वात आला.

दुसर्‍या ची जमीन कायदेशीर रित्या कसणारा व प्रत्यक्ष कष्ट करणारा जो माणूस आहे त्याला कूळ म्हटले गेले. सन 1939 च्या कूळ कायद्या नुसार सर्व प्रथम जमिनीत असणाऱ्या कायदेशीर कुळांची नावे सात बाराचा इतर हक्कात नोंदली गेली. त्या नंतर 1948 चा कूळ कायदा अस्तित्वात आला. त्याने कुळांना अधिक अधिकार प्राप्त झाले.

सुधारित कायद्या नुसार कलम 32 ग नुसार दिनांक 1.4.1957 रोजी दुसऱ्याच्या मालकीची जमीन कायदेशीर रित्या करणाऱ्या व्यक्ती या जमीन मालक म्हणून जाहीर करण्यात आल्या. या जमीनी यथा वकाश प्रत्यक्ष प्रकरणाच्या निकाला प्रमाणे कुळाच्या मालकीच्या झाल्या. गेल्या 40 वर्षा मध्ये राज्या तील बहुसंख्य कूळ कायद्याच्या प्रकरणांचा निकाल लागला आहे. तरी देखील वेग वेगळया कारणा मुळे किंवा वरिष्ठ न्यायालयात चाललेल्या अपीला मुळे अजूनही कूळ कायद्यांचे हजारो दावे प्रलंबित आहेत.

कूळ हक्क : आज रोजी जमीन कसणार्‍या कूळांचे किंवा मालकांचे, कूळ हक्का संबंधी काही महत्वाचे मुद्दे असून ते समजल्या खेरीज कूळ हक्का बाबत स्पष्ट जाणीव शेतकर्‍यां मध्ये होणार नाही. हे मुद्दे खालील प्रमाणे आहेत. (1) सन 1939 च्या कूळ कायद्यात दिनांक 1.1.1938 पूर्वी सतत 6 वर्षे कूळ म्हणून जमीन करणार्‍या व्यक्तीला किंवा दिनांक 1.1.1945 पूर्वी सतत 6 वर्षे जमीन कसणारा आणि दिनांक 1.11.47 रोजी जमीन कसणारा कूळ या सर्वांची नोंद नोंदणी पत्रकात संरक्षीत कूळ म्हणून केली गेली.

(2) सन 1955 साली कूळ कायद्यात काही सुधारणा करण्यांत आली. ही सुधारणा करण्या पूर्वी वहिवाटी मुळे किंवा रुढी मुळे किंवा कोर्टाच्या निकाला मुळे ज्या व्यक्तींना कायम कूळ म्हणून संबोधण्यांत आले व ज्यांची नोंदणी हक्क नोंदणी पत्रकात कायम कूळ म्हणून नोंद केली गेली त्या सर्वांना कायम कूळ असे म्हटले जाते.

(3) आज रोजी दुसर्‍याच्या मालकीची कोणती ही जमीन कायदेशीर रित्या जर एखादा माणूस कसत असेल व अशी जमीन, जमीन मालका कडून जातीने कसण्यांत येत नसेल तर त्याला कूळ असे संबोधले जाते. याचाच अर्थ तो माणूस जमीन मालकाच्या कुटूंबा तील नसला पाहिजे किंवा जमीन गहाण घेणारा नसला पाहिजे किंवा पगारा वर ठेवलेला नोकर नसेल किंवा मालकाच्या कुटूंबा तील कोणत्याही व्यक्तीच्या देखरेखी खाली जमीन कसत नसेल तर त्याला कूळ असे म्हणतात.

(4)कूळ होण्याच्या नियमाला काही महत्वाचे अपवाद करण्यांत आले आहेत. विधवा किंवा अवयस्क व्यक्ती किंवा शरीराने किंवा मनाने दुर्बल झालेला माणूस किंवा सैन्य दलात काम करणारा माणूस, यांची जमीन दुसरी व्यक्ती जर कसत असेल तरी, त्या व्यक्ती स्वत:च जमीन कसतात असे मानले जाते.

(5) कूळ हक्काच्या संदर्भा तील दुसरी बाजू म्हणजे जमीन मालकाने स्वत: हून जमीन कसणे होय. याची व्याख्या सुध्दा कूळ कायद्यात करण्यांत आली आहे. एखादा इसम स्वत: जमीन कसतो काय, हे ठरविण्या साठी खालील नियम लावले जातात. (अ) स्वत: अंग मेहनतीने तो जमीन कसत असेल तर,

(ब) स्वत:च्या कुटूंबा तील कोणत्याही इसमाच्या अंग मेहनतीने जमीन कसत असेल तर, (क) स्वत:च्या देखरेखी खाली मजूरीने लावलेल्या मजूरां कडून जमीन करुन घेत असेल तर, असे मजूर कि ज्याला पैसे दिले जात असोत किंवा मालाच्या रुपाने वेतन दिले जात असो. परंतू पिकाच्या हिश्श्याच्या रुपाने जर मजूरी दिली गेली तर तो कूळ ठरु शकतो.

(6)कूळ ही संकल्पना समजण्यास थोडी अवघड आहे, परंतु कूळ होण्या साठी खालील महत्वाचे घटक मानले जातात. (अ) दुसर्‍याच्या मालकीची जमीन अन्य इसम वैध किंवा कायदेशीर रित्या कसत असला पाहिजे. (ब) जमीन मालक व कूळ यांच्यात तोंडी का होईना करार झाला असला पाहिजे व तोंडी करार कोर्टात सिध्दा झाला पाहिजे. (क) असा इसम प्रत्यक्ष जमीन कसत असला पाहिजे व त्या बदल्यात तो मालकाला खंड देत असला पाहिजे. (ड) जमीन मालक व कूळ यांच्यात पारंपारिक रित्या जपलेले मालक व कूळ असे विशिष्ठ सामाजिक नाते असले पाहिजे.

कूळ कायदा कलम-43 च्या अटी : जी कूळे, यापूर्वी जमीनी चे मालक झाले आहेत, त्यांच्या दृष्टीने कूळ कायदा कलम 43 नुसार जमीन विकायला बंदी केली जाते व तसा शेरा त्याच्या 7/12 वर इतर हक्कात लिहिला असतो. “कूळ कायदा कलम-43 ला पात्र”, अशा प्रकारचा हा शेरा 7/12 वर लिहिला जातो.

शहरीकरणा मुळे किंवा स्वत:च्या गरजे नुसार जमीन विकण्याची आवश्यकता असल्यास, कूळांना अशी जमीन विकण्या पूर्वी प्रांत अधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते. जमीन विक्रीची परवानगी कोणाला द्यावी या बाबतचे नियम देखील शासनाने बनविले आहे. त्या नुसार कूळ कायदा कलम-43 ला पात्र असलेली जमीन खालील अटींवर विकता येते.

(1) बिगर शेती प्रयोजना साठी. (2) धर्मादाय संस्थां साठी किंवा शैक्षणिक संस्थेसाठी किंवा सहकारी संस्थे साठी. (3) दुसर्‍या शेतकर्‍याला परंतू जर असे कूळ कायमचा शेती व्यवसाय सोडून देत असेल तर किंवा जमीन कसायला अ समर्थ ठरला असेल तर. (4) अशी जमीन विकण्या पूर्वी शासकीय खजिन्यात अतिशय नाम मात्र म्हणजे जमीनीच्या आकाराच्या 40 पट एवढी नजराण्याची रक्कम भरावी लागते.

याचा अर्थ अशी जमीन सार्वजनिक कामासाठी किंवा संस्थांना विकतांना फारशा जाचक अटी नाहीत. परंतू सर्रास दुसर्‍या जमीन मालकास अतिशय किरकोळ पैसे भरुन मालकीच्या झालेल्या जमीनी, कूळांनी परस्पर विकू नयेत म्हणून वरील क्र.3 ची महत्वाची अट ठेवण्यांत आली आहे. व त्यांना शेवटचा उपाय म्हणून शेती व्यवसाय सोडतानाच अशी कूळ हक्काची जमीन विकली पाहिजे असा याचा अर्थ आहे.

नव्याने कुळ हक्क निर्माण होतो का? आज एखादा इसम कूळ होऊ शकतो का? कूळ कायदा कलम-32 (ग) नुसार दिनांक 1.4.57 रोजी जमीन कसणार्‍या माणसाला मालक म्हणून जाहिर केले आहे, परंतु आज रोजी जमीनीत नव्याने कूळ निर्माण होऊ शकतो काय? व असल्यास कशा पध्दतीने कूळ निर्माण होतो या बाबत शेतकर्‍यांमध्ये कुतूहल आहे. या बाबतची तरतूद कूळ कायद्याच्या कलम-32 (ओ) मध्ये नमूद करण्यांत आली आहे.

कूळ कायदा कलम-32 (ओ) नुसार आजही दुसर्‍याची जमीन कायदेशीर रित्या एक वर्ष जरी दुसरा इसम कसत असेल तर तो कूळ असल्याचा दावा करु शकतो. तथापी त्यासाठी खालील महत्वाच्या अटी कायम आहेत. (अ) वहिवाट दार व मालक यांच्यात करार झाला असला पाहिजे. (ब) तो मालकाकडून जमीन कसत असला पाहिजे. (क) तो खंड देत असला पाहिजे. (ड) जमीन मालक व कूळ असे विशिष्ठ नाते संबंध असले पाहिजेत.

आज काल जमीन मालक स्वत: हून कोणतेही करार वहिवाटदाराशी करीत नसल्या मुळे, कलम-32(ओ) च्या दाव्यांची संख्या अतिशय अल्प आहे. जमीन मालकां मध्ये जागृती निर्माण झाल्या मुळे अशा पध्दतीचे कोणते ही करार तो वहिवाटदारा बरोबर करीत नाही. तथापी आधी पिक पाहणीला नांव लावून घ्यावयाचे.

एक वर्षाच्या पिक पाहणीचा 7/12 जोडून दिवाणी न्यायालया तून जमीन मालकाला जमीनीत यायला मनाई आदेश आणावयाचे व त्यानंतर काही दिवसां नी कलम-32 (ओ) नुसार कूळ असल्याचा दावा करावयाचा अशा प्रकारे वहिवाट दार व्यक्ती कूळ असल्याचा दावा सर्व साधारण पणे करतात. तर अशा प्रकारे आपण कुळ म्हणजे काय? कुळ कसे तयार होते कुळाचे हक्क कुठ कुठले असतात. आणि शेत जमीन आणि कुळाचे काय कायदेशीर संबंध आहे त्या बद्दलची सविस्तर माहिती पाहिली.

8 thoughts on “कुळ म्हणजे काय? ।। कुळ कसा तयार होतो? ।। कुळाचे कोण कोणते हक्क असतात? ।। कुळ कायदा कलम-43 च्या अटी !”

 1. यात जरका जमीन मालक भूमी हिन होत असेल तर काय करावे

  1. कुळाने जर त्याच्या अटी व शर्ती पूर्ण केल्या असतील तर काहीच करता येणार नाही.

   1. सूर्यकांत डोळस

    कुल कायदा महार वतन जमीनिस लागु होतो का?

  2. कुळाने जर त्याच्या अटी व शर्ती पूर्ण केल्या असतील तर काहीच करता येणार नाही.

  3. Ashok RAMBHAU Shinde

   जर एखादी विधवा असेल व तिला तीन मुले असतील व पहिले कुळ ती असेल तर ते जमिला दुसरे कुळ लागु शकते का व लागले तर काय करावे व फेरफार गायब केला आहे व तोडी व कबुली जबाबने वेवार झाला तर काय करावे

  4. शेतीचा जुना मालकच जमीन विकल्यावर कुळ म्हणून लागू शकतो का ? आणि असं झालाच तर काय करावा

  5. गहाण ठेवलेली जागा परत घेतलीय परंतु नावे केली नाही. ती जमीन गेले ४० वर्षे आपण कसत आहे.ती जमीन कुळ कायदा लागू केला तर आपल्या नावावर करून घेऊ शकतो का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *