आपल्याला येणारे लाईट बील हे कशाप्रकारे कॅल्क्युलेट केले जाते ? ।। तुमचे वीज बील समजून घ्या ।। दर असे कॅल्क्युलेट करा, जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आज आपण लाईट बिलाचे संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत. लाईट बिलवर जे विविध दर लावलेले असतात. हे दर कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलेले असतात याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत. लाईट बिल वर जे दर दाखवलेले असतात हे तुम्ही स्वतः सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. सर्वप्रथम आपण जाणून घेवूयात लाईट बिलवर दिलेले दर हे कशाप्रकारे कॅल्क्युलेट केलेले असतात ?

सर्वप्रथम या ठिकाणी आपले जे या महिन्याचे एकूण युनिट किती आलेले आहे, व हे कशाप्रकारे मोजल्या जातात ते या ठिकाणी पाहुयात. लाईटबिल वरती मागील महिन्याची रीडिंग दिलेली असते आणि चालू महिन्याची रीडिंग ही असते. चालू महिन्याची रीडिंग मधून मागील महिन्याची रीडिंग वजा केली असता आपल्याला चालू महिन्याच्या एकूण वापराचे युनिट आपल्याला समजतात.

जसे की उदाहरण पाहायचे झाले तर, चालू रीडिंग 455 यूनीट आहे व मागील रीडिंग 388 युनिट आहे ह्याची वजाबाकी केली असता 67युनिट येते. हे युनिट आपण या चालू महिन्यात वापरलेले आहे. तर या ठिकाणी लाईट बिल कशा प्रकारे कॅल्क्युलेट केला जातो, दर कशा प्रकारे लावले जातात, हे आपण जाणून घेवुयात.

लाईटबिल च्या मागच्या बाजूला लाईटबिल चे जे दर लावलेले असतात, त्याच विस्तृत वर्णन दिलेले असते. तर एक उदाहरण घेवून त्याची तपशील माहिती आपण घेवू. सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला स्थिर आधार म्हणून 102 रुपये दर या ठिकाणी लावलेले आहे. स्थिर आकार म्हणजेच तुमच्या घरी जे मीटर लावलेलं असतं त्या मीटरच भाडं. त्या मीटरच प्रत्येक महिन्याला भाडं हे 102 रुपये तुम्हाला बिलामध्ये तुम्हाला लावलेला दिसून येते.

त्यानंतर वीज आकार म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे. वीज आकार म्हणजे तुम्ही जे युनिट वापरलेले आहे त्या युनिटचे दर. या ठिकाणी 230.48रुपये दिलेले आहेत. आता हे 230.48 पैसे हे कसे लावण्यात आले हे आपण पाहूया. तर या महिन्यात आपण एकूण 67 युनिट चा वापर केला असे उदाहरण घेतले आहे.

तर हे 67 युनिट चा दर कशाप्रकारे कॅल्क्युलेट केलेत ते आपण पाहुयात. तर लाईटबिलच्या मागच्या बाजूला एक बॉक्स मध्ये त्याची माहिती दिलेली असते. जसे की, 0ते100 युनिट पर्यंत 3.44 रुपये दर आकारण्यात येतात, 101ते300 यूनीट पर्यंत दर आहे 7.34 रुपये प्रति युनिट दर आकारण्यात येतात. अशा प्रकारे पुढे सुद्धा हे दर वाढत गेलेले दिसून येते.

आपण याठिकाणी 67 युनिट वापरलेले असल्या कारणाने आपल्याला याठिकाणी युनिटचे दर लागणार आहे ते 3.44 रुपये प्रतियुनिट लागणार आहे. समजा जर या महिन्यामध्ये आपण 110 युनिट वापरलेले असते, तर अशा वेळी 100 युनिटसाठी 3.44 रुपये इतके असते आणि वरच्या 10 युनिट साठी 7.34 रुपये दर लावण्यात आलेले असते.

तर आपण 67 युनिट वापरले कारण आपण (67 गुनिले * 3.44) केले असता आपल्याला 230.48 रुपये होतात. त्यानंतर वहन आकार म्हणून प्रतियुनिट रुपये 1.38 पर युनिट आपल्याला लवलेला दिसून येत आहे. वहन आकार म्हणजे विद्युत निर्मिती केंद्र पासून तुमच्या घरापर्यंत जी वीज वाहून आणले जाते त्यासाठी लावलेले हे दर असतात.

तर आपल्या 67 युनिट साठी,(67 गुणिले * 1.38) केले असता 92.46 रुपये वहन आकार आपल्याकडून घेतलेले आहे. त्यानंतर वीज शुल्क 16% म्हणजे या ठिकाणी आपण जेवढी वीज वापरलेली आहे आणि त्याचे दर जे कॅल्क्युलेट झालेले आहे. त्यावरती 16% कर(tax) हा लावला जातो. हा कर कशाप्रकारे कॅल्क्युलेट केला जातो

तर ” स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार” यांची बेरीज करून येईल त्या उत्तरावर 16% tax आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. (102+230.48+92.46= 424.94*16% = 67.99) इतका कर(tax) आपल्याला कॅल्क्युलेट झालेला आहे. त्यानंतर स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार, वीज शुल्क यांची बेरीज केलेवर जे उत्तर येते ते झालं आपल्या चालू महिन्याच बिल.

जसे की उदाहरण आपण पाहत आहेत, ( 102+230.48+92.46+67.99 = 492.93) मात्र लाईटबिल वर चालू वीज देयकच्या खाली मागच्या महिन्याच्या लाईटबिल चे काही डिटेल्स दिलेले असतात. तर ते कशाप्रकारे असतात त्याची आपण थोडक्यात उदाहरण पाहून माहिती घेवू.

जर मागच्या महिन्यात वीजबिल थकबाकी असेल म्हणजे वीजबिल न भरल्या कारण 3257.34 रुपये थकबाकी असेल. त्याखाली समायोजित रक्कम म्हणजे काय तर वरील रक्कमे मधून 23.25 रुपये हे वजा करण्यात आले आहेत. आणि त्यामुळे एकूण थकबाकी की 3234.09 रुपये इतकी करण्यात आलेली आहे.

तर समायोजित रक्कम म्हणजे काय ? तर आपल्या चालू महिन्याचे जे देयक आहे ते आणि मागची थकबाकी याची जर बेरीज केली, (492.93+3234.09= 3727.02 रुपये). पण याठिकाणी पूर्णांक देयक आपल्याला 3730 रुपये इतके आहे. तर जवळपास 3 रुपये आपल्याला जास्त याठिकाणी पूर्णांक देयक मध्ये लावलेले आहेत.

म्हणजेच पुढच्या लाईटबिल मध्ये आपल्याला समायोजित रक्कम मध्ये 3 रुपये वजा करण्यात येईल. अशी ही एकूण लाईटबिल संदर्भात माहिती आहे, आणि आपल्याला ही अत्यंत महत्वाची आहे.

(वरील माहिती www.youtube.com/techwithrahul या चॅनल वरून संकलीत व शंब्दांकित केलेली आहे)

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.