सर्वात जास्त शिकलेले भारतीय कोण आहेत माहित आहे का? तब्बल २० पदव्या, डॉक्टर, वकील, IAS, IPS, आमदार या सर्व पदांवर काम केलेले एकमेव व्यक्ती ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

बातम्या लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील मोस्ट क्वालीफाईड म्हणजे सर्वात जास्त शिकलेल्या व्यक्तीबद्दल. ”लिम्का” बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मोस्ट क्वालिफाईड पर्सन ऑफ इंडिया म्हणून नोंद आहे. कधी हा विचार केला आहे का, की एखादी व्यक्ती शिक्षणासाठी किती आतुर आणि पॅशनेट असू शकते.

आपण ज्या व्यक्ती बद्दल जाणून घेणार आहोत त्यांच्या डिग्रीच्या लिस्ट वरून तुम्हाला कल्पना येईल की ते शिक्षणासाठी किती वेडे होते. त्यांच्याकडे 20 डिग्री होत्या त्या महान व्यक्तीचे नाव आहे डॉक्टर श्रीकांत जिचकार. डॉक्टर श्रीकांत जिचकार हे डॉक्टर होते, आयपीएस ऑफिसर, आयएस ऑफिसर, वकील आणि MLA सुद्धा होते.

पत्रकार, कुशल पेंटर आणि प्रोफशनल फोटोग्राफर सुद्धा होते. आणि एक स्टेज ॲक्टर आणि कीर्तनकार सुद्धा होते. हे ऐकून धक्का बसला असेल ना चला तर मग जाणून घेऊन त्यांनी एवढे सर्व कसे प्राप्त केले. डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचा जन्म 14 सप्टेंबर 1954 नागपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील एक श्रीमंत शेतकरी होते.

डॉक्टर श्रीकांत जिचकार यांनी त्यांच्या ग्रॅज्युएशन ची सुरुवात एमबीबीएस ने केली. त्यांनी यशस्वीरित्या एमबीबीएस पूर्ण केले त्यानंतर त्यांनी एल एल बी ची डिग्री घेतली नंतर एल एल एम सुद्धा पूर्ण केले. त्यांनी संस्कृतमध्ये डॉक्टर ऑफ लिटरेचर युनिव्हर्सिटीची सर्वोत्तम पदवी सुद्धा घेतली होती. 1973 ते 1990 या काळात डॉक्टर श्रीकांत यांनी 42 युनिव्हर्सिटी एक्झाम दिला त्यांनी मिळवलेल्या डिग्री जास्त करून फर्स्ट क्लास मध्येच होत्या आणि त्यांनी बऱ्याच एक्झाममध्ये गोल्ड मेडल सुद्धा मिळवले होते.

1978 सारी डॉक्टर श्रीकांत यांनी सिविल सर्विस एक्झाम पास केले व आयपीएस म्हणून ते निवडले गेले पण काही दिवसांतच त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर 1980 आली परत त्यांनी सिविल सर्विस एक्झाम दिली व यावेळेस ते आयएस म्हणून निवडले गेले. आयएस झाल्यानंतर चार महिन्याच त्यांनी त्याचा पण राजीनामा दिला कारण त्यांना MLA निवडणूक लढवायची होती.

डॉक्टर श्रीकांत जिचकार हे वयाच्या 26 व्या वर्षी MLA म्हणून निवडून आले ते भारतातील सर्वात तरुण MLA होते. ते काँग्रेस पार्टीचे दिवांगत नेता होते ते राज्यसभेचे सुद्धा मेंबर होते. ते मंत्री असताना त्यांच्याकडे एकाच वेळी 14 खाते होते. एकाच वेळी 14 खाते सांभाळणे म्हणजे विचार करा किती किती प्रतिभाशाली व्यक्ती होते त्यांना राजकारणात सुद्धा खूप इंटरेस्ट होता.

ते कॉलेजमध्ये असताना सुद्धा युवा नेते म्हणून ओळखले जात होते कॉलेजमध्ये एक सर्वात ऍक्टिव्ह स्टुडन्ट म्हणून ओळखले जात होते. डॉक्टर श्रीकांत जिचकार यांना वाचनाची खूप आवड होती .त्यांच्याकडे तब्बल 52 हजार पेक्षा जास्त पुस्तकांचे कलेक्शन होतं जी भारतातील सर्वात मोठी पर्सनल लायब्ररी होती.

डॉक्टर श्रीकांत जिचकार 1999 मध्ये राज्यसभेची निवडणूक हरले त्यानंतर त्यांनी ट्रॅव्हलिंग वर आपला फोकस वळवला. त्यांनी देशात खूप ठिकाणी भ्रमण केले व या दरम्यान त्यांनी फिटनेस इकॉनोमी हेल्थ आणि धर्म या बद्दल बरीच व्याख्याने दिली. त्यांना पेंटिंग फोटोग्राफी स्टेज एक्टिंग याची सुद्धा आवड होती.

फिटनेस हेल्थ धर्म अशा अनेक विषयात ते निपुण होते. शिक्षणामुळे माणूस अंधकारातून प्रकाशाकडे वाटचाल करतो तुमच्याकडे कितीही ज्ञान असू द्या ते कधीच संपूर्ण किंवा पुरेसे नसते या मताचे ते होते. एवढे ज्ञानाचे भांडार असून सुद्धा डॉक्टर श्रीकांत खूप साधे सरळ आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व होते.

2 जून 2004 मध्ये त्यांचा एका कार एक्सीडेंट मध्ये दुर्देव मृत्यू झाला. महाराष्ट्र व भारताने त्या दिवशी एक अनन्यसाधारण व्यक्ती गमावला. एक व्यक्ती एज्युकेशन साठी इतका पॅशनेट असू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. आशा करतो की डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्या अचीवमेंट आणि जीवनावरून आपण सर्व प्रेरणा घेऊन आपल्या कामात अभ्यासात आणि जीवनात कठोर मेहनत करून यशस्वी होऊ.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.