भारतातील सर्वात मोठे सरकारी पद कोणते आहे? ।। भारतातील सर्वोच्च १० सरकारी नोकऱ्या ।। महत्वाची माहिती जाणून घ्या या लेखातून !

लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

भारतात सरकारी नोकरी हे एक जवळजवळ प्रत्येक भारतीयाच स्वप्नचं असत. त्यासाठी कित्येक लोक मेहनत घेत असतात व त्या त्या क्षेत्रातील परीक्षा देऊन प्रयत्नही करत असतात. आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील दहा सरकारी नोकरी बद्दल यांची तुलना देशातील सर्वश्रेष्ठ नोकरी म्हणून केले जाते. तेव्हा सुरुवात करू या देशातील नंबर 10 सरकारी नोकरी पासून.

नंबर 10 रेल्वे इंजिनिअर रेल्वे: इंजिनिअर ही नौकरी भारतातील प्रतिष्ठित नोकरी म्हणून ओळखली जाते. ही नोकरी मिळवण्यासाठी बी.ई.इंजिनिअर डिग्री करावे लागते. साधारणत: रेल्वे इंजिनिअरचे एका महिन्याचे पगार साठ हजार ते ऐंशी हजार असू शकते. या व्यतिरिक्त रेल्वे इंजिनिअरला राहायला घर, ट्रॅव्हल अलाऊनस् आणि वेगळे इन्सेंटीव्ह सरकारद्वारे दिले जातात.

नंबर 9 इन्कम टॅक्स ऑफिसर : आयकर विभागांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी कित्येक जण प्रयत्न करत असतात. कारण या क्षेत्रामध्ये पैसे बरोबर मानसन्मान मिळाल जातो. व काही इन्कम टॅक्स ऑफिसरचा पगार हा साठ हजार ते एक लाखापर्यंत असू शकतो. या व्यतिरिक्त सरकारी गाडी, 30 लिटर पेट्रोल व एक सिम यांना दिले जाते. इन्कम टॅक्स ऑफिसर बनण्यासाठी (SSC CGL) या दोन परीक्षा पास व्हाव्या लागतात.

नंबर 8 सरकारी डॉक्टर : सरकारी डॉक्टरची मागणी नेहमीच जास्त असते. कारण सरकारी रुग्णालयात आपल्याकडे कमी पैशात उपचार केले जातात. परंतु सरकारी डॉक्टरचा पगार हा जास्त असतो. सर्वसाधारण सरकारी डॉक्टर चाळीस हजार ते पन्नास हजार रुपये पगार असू शकतो. तर सर्जनला एक लाख ते दोन लाखापर्यंत पगार असतो.

नंबर 7 असिस्टंट इन मिनिस्त्री ऑफ एक्स्टर्णल अफेअरस : नोकरी एक भारतातील सन्मानीय, ही नोकरी भारतातील सन्मानिय नोकरी मानली जाते. या नोकरीत बऱ्याचदा आपले शिफ्टींग ही बाहेरच्या देशात होत असते. येथे एका महिन्याचा पगार हा 1.5 लाख ते 2 लाख पर्यंत असू शकतो. ही नोकरी मिळवण्यासाठी (SSC CGL) ही परीक्षा पास करावे लागतात.

नंबर 6 सायंटिस्ट इस्रो, डीआरडीओ वैज्ञानिक : या भारताच्या संशोधन संस्था आहेत. अशा ठिकाणी वैज्ञानिक होवून जर काम केले तर आपल्याला संशोधनासह इच्छित पैसेही मिळतात. या संस्थेत काम करण्याचा पगार हा 40 हजार ते 60 हजार असू शकतो. आणि हा पगार पोस्टसह व वाढत असतो. या शिवाय यांना परिवहन शुल्क, कॅन्टीन मध्ये विनामूल्य जेवण, राहण्यासाठी घर, व प्रत्येक 6 महिन्यांनी बोनस मिळत असतो.

नंबर 5 बँकिंग क्षेत्र : जेव्हा बँकिंग ची गोष्ट येते तेव्हा आपल्याला आरबीआय गव्हर्नर, ऑफिसर यांची नावे आठवतात. बँकेच्या नोकरीत बढती मिळवणे सोपे आहे. याव्यतिरिक्त बँक आपल्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी घर देते, तसेच दर दोन वर्षानंतर एक लाख रुपये मुलांना शैक्षणिक खर्च म्हणून देत असते. यांचा वार्षिक पगार हा 18 लाखापर्यंत असू शकतो.

नंबर 4 युनिव्हर्सिटी प्रोफेसर : अस मानल जात की प्रशिक्षण देणे हे जगातील सर्वोत्तम व शांत काम आहे. म्हणून कोणतेही सरकारी क्षेत्रात प्राध्यापकाची नोकरी ही चांगली असते. या क्षेत्रात पैसा बरोबर मानसन्मान ही मिळाला जातो. एनआयटी व आयआयटी प्राध्यापकांचा पगार हा जास्त असतो. एका महाविद्यालय आणि विद्यापीठात शिकवणाऱ्या प्राध्यापकांचा पगार चाळिस हजार ते एक लाखापर्यंत असू शकतो. याव्यतिरिक्त त्यांना सरकारकडून वैद्यकीय सेवा व निवास गृहे दिली जातात.

नंबर 3 पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणजेच पीएसयू : तुम्हाला प्रायव्हेट सेक्टर आवडत नसेल तर पीएसयु ही नोकरीत तुमच्या साठी चांगला ऑप्शन आहे. पीएसयु मध्ये बीएचईएल व ओएनजीसी व आयएसई ह्या सरकारी कंपन्या आहेत. येथे नोकरी मिळण्यासाठी (gate)ही परीक्षा पास करावी लागते. पीएसयु मध्ये काम करणाऱ्याचा पगार हा 40 हजार ते 1.5 लाखापर्यंत असतो. या व्यतिरिक्त जेवणासाठी कॅंटीन, सबसिडी, लॅपटॉप, पेट्रोल अलाऊंनस हे सरकार द्वारे मिळालेले असते.

नंबर 2 डिफेन्स सर्व्हिस : या क्षेत्रात आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे सर्व येतात. ही नोकरी एक सन्मानजनक नोकरी आहे. कारण हेच ते 3 क्षेत्र आहेत जे आपल्याला शत्रूपासून वाचवत असतात. डिफेन्स मध्ये जाण्यासाठी एनडीए, सीडीएस, AFCAT, अशा वेगवेगळ्या परीक्षा पास करावे लागतात. यांचा पगार हा पन्नास हजार एक लाखापर्यंत असतो.

नंबर 1 इंडियन सिविल सर्विसेस : या क्षेत्रात आयएएस, आयपीएस, आयएफएस, असे मोठमोठे हुद्दे येतात. या क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी नोकरी आहे. दरवर्षी बरेच लोक ही परीक्षा देतात. त्यापैकी तुरळक लोक ही परीक्षा पास होतात. या क्षेत्रातील अधिकाऱ्यांचा पगार हा 2 लाख पर्यंत असू शकतो.

या व्यतिरिक्त यांना घर, ड्रायव्हर, वीज, अशा सुविधा ही मिळत असतात. तर या होत्या आपल्या देशातील सर्वोत्तम दहा नोकऱ्या. आपल्यलाला माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा. वरील यादीमध्ये तुमच्या माहितीतील कुठली पोस्ट राहुल असेल तर ती देखील कमेंट्स मध्ये कळवा.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.