घरगुती गॅस सिलेंडर ग्राहकांचे अधिकार ।। गॅस एजन्सी विरोधात तक्रार करता येते का? ।। कोण कोणत्या कारणासाठी आपण तक्रार करू शकतो? जाणून घ्या सामान्य जनतेसाठी महत्वाची माहिती !

लोकप्रिय शैक्षणिक

आज आपण बघणार आहोत घरगुती गॅस सिलेंडर ग्राहकाचे अधिकार कोणकोणते आहेत. जी कोणती गॅस एजन्सी गॅस सिलेंडरचा पुरवठा करते त्या एजन्सीने ग्राहकाला कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिले पाहिजे याबद्दलची माहिती घेणार आहोत. समजा ग्राहकाला त्याचे अधिकार मिळत नसतील तर ग्राहकाने कोण कोणते पाऊले उचलायला पाहिजे. तसेच त्या गॅस एजन्सी वर कशा प्रकारे कारवाई होऊ शकते ही सर्व प्रोसेस आपण आज समजून घेणार आहोत.

स्वयंपाकाचा जो गॅस आपल्या घरी डीलिवर होतो त्याच योग्य वजनाचा सिलेंडर आपल्याला डिलिवर झाला पाहिजे. सुरक्षित आणि वेळेवर तो गॅस आपल्याला प्राप्त होणे आवश्यक आहे. हा जसा ग्राहकांचा हक्क आहे त्याचप्रमाणे ही गॅस एजन्सीची जबाबदारी आहे.

की ग्राहकाला त्याच्या सेवा आपण पूर्णपणे देतो आहे की नाही, आणि जर या सेवांवरती कुठे गॅस एजन्सी परीपूर्णपणे उतरत नसेल किंवा पाहिजे तसे सेवा जर ग्राहकाला मिळत नसेल तर ग्राहकाला त्याच्या अधिकारान्वये जो काही संविधानाने त्याला हक्क दिलेला आहे तो ग्राहक मंचात आणि न्यायालयात त्याविषयी दाद मागू शकतो. त्याचबरोबर गॅस एजन्सीची जी वितरक किंवा कंपनी असते त्यांच्याकडे आपण कम्प्लेंट करू शकतो.

त्याचप्रमाणे आपले अन्नधान्य वितरण अधिकारी जे तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा पुरवठा अधिकारी असतात त्यांच्याकडे देखील आपण तक्रार करू शकतो. एजन्सीच्या ज्या काही वेबसाईट असतील. जसे की भारत गॅस, HP गॅस, इंडियन गॅस या तीन मोठ्या कंपन्या भारतात गॅस डिस्ट्रिब्युशनच काम करतात.

आपण त्यांच्या वेबसाईटवर ती जाऊनही तक्रार करू शकतो. त्याचप्रमाणे एक पिजी पोर्टल म्हणून सेंट्रल गव्हर्मेंटची एक वेबसाईट आहे त्यावरती सेंट्रल गव्हर्मेंटचे सर्व काही डिपार्टमेंट येतात. त्यावरती जावून आपण आपली ही तक्रार करू शकतो.

आपण पाहूया, जे काही घरगुती गॅस ग्राहक आहेत त्यांचे अधिकार कोणकोणते आहेत. गॅस ग्राहकाचा किंवा घरगुती गॅस सिलिंडर वापर करत्याचा पहिला अधिकार हा आहे, की जो काही सिलेंडर त्याच्याकडे गॅस एजन्सी मार्फत येत असेल त्याच वजन हे योग्य असल पाहिजे.

आपल्याकडे जो कोणता गॅस डिलिवरी होत असेल तर प्रत्येक गॅस सिलेंडर वर त्या टाकीच म्हणजे  गॅस सिलिंडरचे वजन लिहिलेले असते. आपल्याला तिथे दोन वजनांची नोंद दिसेल, समजा 14.2 हे आहे गॅसच वजन, म्हणजे त्या टाकी मध्ये किती प्रमाणात गॅस भरलेला आहे. टाकीचे वजन आणि गॅस मिळून हे समजा 30.4 किलोग्राम असेल, या पेक्षा जर हे वजन कमी किंवा जास्त असेल तर आपण त्याची तक्रार करून आपण ती गॅस टाकी बदलून घेवू  शकतो.

ती गॅस टाकी बदलण्याचे मागणी करू शकतो. वजनामध्ये जर तफावत असेल तर त्याची कारणे काय असतात ते आपण पाहुयात. समजा गॅस टाकीच वजन जर जास्त भरत असेल तर, काही गॅस एजन्सी किंवा डिलिवरी बॉय त्या गॅस टाकी मधला गॅस काढून घेतात. त्या जागी गॅस टाकी मध्ये पाणी भरले जाते आणि त्या टाकीच वजन हे वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.

आपल्याला जर ही तफावत आढळत असेल तर आपण तो सिलेंडर स्वीकारू नका किंवा जी काही गॅस एजन्सी, जो कोणी डिलिवरी बॉय तो सिलेंडर घेवून आला असेल आपण त्यांच्याकडून तो बदलून घेऊ शकतो. आता आपण दुसरा मुद्दा पाहुयात, जेव्हा आपण  गॅस बुक करतो. संबंधित गॅस एजन्सी आपल्याला लवकर  सिलेंडर डिलिव्हर करत नाही किंवा आपल्यापर्यंत पोच करत नाही.

जर आपण कंपनीच्या टोल फ्री नंबर वरून गॅस टाकीची नोंद केली तर आपल्याला कमीत कमी दोन दिवसात तो सिलेंडर मिळाला पाहिजे. जर त्यांच्याकडे स्टॉक उपलब्ध असेल तर आपल्याला कमीतकमी दोन दिवसात उपलब्ध व्हायला पाहिजे. जर त्यांचेकडे स्टॉक नसेल तर तीन-चार दिवसांमध्ये मॅक्झिमम आपल्याला तो गॅस सिलेंडर हा घरपोच डिलिव्हरी व्हायला पाहिजे.

जर अशा प्रकारे गॅस एजन्सी त्यांच्याकडे सिलिंडर असूनही जर  ग्राहकांना तो सिलिंडर देत नसेल किंवा तो वेळेत  पुरवठा करत नसेल तर आपण याची तक्रार करू शकतात. हा आपला हक्क आहे. जर ठरवून दिलेले वजन त्या गॅस टाकी मध्ये नसेल तर आपण त्याची तक्रार ही वजन मापन अधिकारी यांच्याकडे करू शकतो.

आणि त्या गॅस एजन्सीस आणि जी काही कंपनी पुरवठादार आहे त्यांच्यावरती “आयपीसी कलम 415, 420 अन्वये” संभंधित जी गॅस एजन्सी किंवा कंपनी आहे त्याच्यावरती खटला दाखल होतो. त्याच पद्धतीने हे जर आरोप सिद्ध झाले, तर त्यांच्यावरती कलम 417 अन्वये एक वर्ष कैदेची शिक्षा सुद्धा त्या गॅस एजन्सी अणि संबंधित कंपनीच्या अधिकारी तसेच पदाधिकारी यावरती होवू शकते. फक्त जर आपण जागृत राहिलो तर आपल्या हक्का करीता ही गोष्ट शक्य आहे.

आपल्याकडे ज्या वेळेस गॅस एजन्सी मार्फत गॅसची टाकी येईल तर गॅस एजन्सीची टाकी घेवून येणारा जो डिलिवरी बॉय असेल किंवा जो काही कर्मचारी असेल आपण त्यांच्याकडे गॅसच्या वजनाची मागणी नक्कीच करू शकता. मुद्दा नंबर तीन, आता जो गॅस सिलेंडर आपल्या घरी येतो तो सीलबंद असणे गरजेचे आहे. त्याच्यावरती जी काय सिलेंडरची कॅप असते त्याला प्रॉपर सिलिंग असणे आवश्यक आहे.

अशा पद्धतीने जर सीलिंग होवून ती टाकी आली नसेल तर ती आपण (रिजेक्ट) नाकारू  शकतो. आपल्याला फोर्स  केला जात असेल तर आपण त्याचीही तक्रार नोंदवू शकतो. तक्रार नोंदवली तर ग्राहक  एजन्सीवरती कारवाई करण्याची तरतूद आहे. काही वेळेस आपली गॅसची शेगडी किंवा बर्नर आहे त्याच्यामध्ये काही वेळेस (प्रॉब्लेम) अडचणी तयार होतात त्याच्यामुळे आपला गॅस व्यवस्थित चालत नाही.

किंवा जे काही रेगुलेटर आहे ते जर काम करत नसेल तर त्याची दुरुस्तीची जी जबाबदारी आहे ती संबंधित गॅस एजन्सी वरती आहे. त्यांनी खास या करता काही कर्मचारी नेमले असतात जे आपल्या घरी येऊन आपली जी काही गॅसची शेगडी असेल असेल ती आपल्याला त्यांनी रिपेर (दुरुस्त) करून दिले पाहिजेत. त्यांच्याकडे ह्या रेपीरिंगचे ठराविक चार्जजेस ठरलेले असतात. जे अधिकृत असतात त्याचप्रमाणे त्यांनी ती सर्व्हिस चार्ज करायला पाहिजे.

काही वेळेस गॅस सिलेंडर आपल्याकडे येतो अणि काही दिवसांनंतर गॅसचा (स्मेल) वास यायला लागतो किंवा लिकेज व्हायला लागत. तर आपण गॅस एजन्सीला कळल्यानंतर त्यांनी येवून ते रिपेअर करून द्यायला पाहिजे आणि सिलेंडरच्या बाबतीत असेल तर फ्री ऑफ कॉस्ट त्याची रेपीरिंग व्हायला पाहिजे. आता प्रत्येक गॅस एजन्सी मधे एक कंप्लेंट रजिस्टर किंवा तक्रार पुस्तिका ठेवलेली असते त्यामधे ग्राहकाने स्वतः जावून तिथे आपली तक्रार नोंदवू शकतो आणि याच रेकॉर्ड मेन्टेन करणे हे ग्राहक एजन्सीचे काम असते.

समजा आपल्याला जर काही अडचणी असेल तर आपण देखील त्या तक्रार पुस्तिका मधे आपली तक्रार ही नोंदवू शकतो. किंवा कंपनीचा जो काही टोल फ्री नंबर आपल्याला दिला असेल  त्या टोल फ्री नंबर वरती आपण तक्रार नोंदवू शकतो. आपण आता सातवा मुद्दा पाहुयात, आपण ज्या वेळेस एक नवीन ग्राहक म्हणून ग्राहक एजन्सी मधे नवीन सिलेंडर विकत घेण्यासाठी जातो त्यावेळेस कोणतीही ग्राहक एजन्सी समोरील ग्राहकांना इतर वस्तू घेण्याचं बंधन करू शकत नाही.

बऱ्याचशा वेळेस आपण बघतो की एखादी गॅस एजन्सी असते तिथे खूप सारे प्रॉडक्ट ठेवलेले असतात. जसे कि राइस कुकर, भेटवस्तू किंवा शेगडी असेल. कोणतीच एजन्सी आपल्याला त्या वस्तू घेण्याबाबत फोर्स करू शकत नाही. आपल्याला जर शेगडी किंवा त्यांच्या कडे उपलब्ध असलेले बर्नर घेण्यासाठी इच्छा नसेल तर गॅस  एजन्सी आपल्याला फोर्स करू शकत नाही. आपल्या घरी जो काही गॅस, स्टोव्ह उपलब्ध आहे ते फक्त तपासणी करतील तो आयएसआय मार्क आहे की नाही एवढं ते कन्फर्म करतील.

आता अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण पाहुयात तो म्हणजे तुमच्या घरात जी गॅस टाकी आहे किंवा जो गॅस सिलेंडर आहे त्याला एक्सपायरी डेट ही असते. जसे औषध कंपनी मध्ये जी औषध तयार होतात त्यांना जसे एक्सपायरी डेट असते त्याच पद्धतीने तुमच्या घरात जो गॅस सिलेंडर आहे त्यालाही एक्सपायरी डेट असते. आता ही एक्सपायरी डेट कुठे असते ती आपण समजून घेवूयात. गॅस सिलेंडरचा जो काही वरचा भाग आहे त्यावरती ज्या तीन पट्ट्या असतात, त्यावरती काही मार्किंग केलेले असतात.

तिथे काही अक्षरे लिहिलेली असतात, तर त्यामधे आपल्याला  त्या पट्टी वरती A,B,C,D या चार जे अक्षर आहेत त्यापैकी कुटलही एक अक्षर आणि  दोन नंबर दिसतील. हे अक्षर आणि ते दोन नंबर काय सांगतात तर आपण पाहुयात. A,B,C,D हे जे आहेत ते वर्षाचे चार त्रिमसिक हफ्त्यांची जी आहे ते आपल्याला ती चार अक्षरे दाखवतात. त्याच बरोबर ते जे दोन अंक आहेत ते आपल्याला वर्ष कोणते आहे ते दाखवते.

आता ती टाकी कधी एक्सपायरी होणार आहे तर त्या प्लेट वरती लिहिलेलं असत. तिथे जर ‘A’ हे अक्षर असेल तर ती टाकी जानेवारी ते मार्च हे तीन महिने आहेत, त्या तीन महिन्यांमध्ये ती एक्सपायरी होणार आहे आणि तिथे जे साल किंवा वर्ष असेल ते दोन नंबर असतात. जसं की 17, 20, 21 जे काही डेट असेल त्या पद्धतीने ते दोन नंबर असतात.

सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की समजा तुमच्या घरातील गॅस सिलेंडरचा जर स्पोट झाला किंवा आपल्या आसपासच जर स्पोट झाला तर आपण कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे. आणि जर स्पोट जर झाला तर आपल्याला त्या संबंधित गॅस कंपनी कडून इन्शुरन्स हा किती मिळतो, आता आपण ते पाहुयात. जर गॅस टाकी मुळे जर स्पोट झालेला असेल, तर आपल्याला त्या कंपनी कडून 50 लाखा पर्यंत इन्शुरन्स मिळत असतो.

पण त्या अगोदर काही गोष्टी ज्या ग्राहकानी फॉलो केल्या गेल्या पाहिजेत. इन्शुरन्स मिळण्या अगोदर जो काही ग्राहक हक्क आहे त्या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत, फॉलो केल्या गेल्या पाहिजेत. जी गॅसची शेगडी किंवा जो सिलेंडर आपल्याकडे असतो त्याच वार्षिक मेंटेनन्स आपण दिले पाहिजे आणि ते मेंटेन गॅस एजन्सी कडून मेंटेन केलं पाहिजे तरच आपल्याला जो काही आहे तो गॅसचा इन्शुरन्स मिळू शकतो.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.