तुम्ही देखील इन्स्टंट लोन ऍप्स वरून कर्ज काढले आहे का? किंवा काढण्याचा विचार करत आहेत का? तर हि माहिती तुमच्याकरता महत्वाची आहे, नक्की वाचा !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो, समजा तुम्हाला पैशाची तातडीने गरज असेल तर तुम्ही काय कराल? तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर ते वापराल, बँक किंवा पतपेढी किंवा एखाद्या वित्तसंस्थेकडून कर्ज घ्याल, नोकरी करत असाल तर आगाऊ पगार घ्याल किंवा मग मित्र आणि नातेवाइकांकडून उसने पैसे घ्याल,

पण या सगळ्यांमध्ये वेळ जातो आणि म्हणूनच अनेक जण इन्स्टंट लोन देणाऱ्या मोबाईल ॲपचा वापर करू लागले आहेत. मात्र अशा अँप मुळे काहीजण अडचणीत आल्याच्या घटना सुद्धा समोर आलेल्या आहे. हे लोन ॲप कसे काम करतात ते सुरक्षित आहेत का आणि त्या पासून कसे सावध राहायचं हे आज आपण जाणून घेणार आहोत.

“तुमच्याकडे अकरा वाजेपर्यंतचा वेळ आहे पैसे परत करा नाहीतर तुमच्या नातेवाईकांना सांगू” हैदराबादच्या एका ग्राहकाला असे मेसेज आलेले. लॉकडाउन मुळे त्यांना कर्ज मिळत नव्हतं आणि म्हणून त्यांनी एक मोबाईल ॲप डाऊनलोड केले आणि घरबसल्या काही मिनिटांमध्ये पैसे त्यांच्या अकाउंटला जमा झाले.

पण कर्ज फेडण्याच्या दिवशी दुसऱ्या कामांमध्ये त्या व्यस्त होत्या आणि पैसे देऊ शकल्या नाहीत. त्यानंतर लगेच पैसे द्या नाहीतर तुमच्या नातेवाईकांना सांगू असे धमक्यांचे फोन आणि मेसेज त्यांना यायला लागले आणि काही वेळातच त्यांचे फोन आणि मेसेज त्यांच्या नातेवाईकांना देखील गेले.

महाराष्ट्रातही लोन ॲप द्वारा मानसिक छळ होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत पण हे ॲप नेमकं कसं काम करतात?: अगदी लगेच कर्ज देणाऱ्या मोबाईल ॲपला इन्स्टंट लोन ऍप्स म्हणून ओळखलं जातं. अशा ॲप्समध्ये तुमचे डिटेल्स भरले कि ती एजन्सी तुम्हाला लगेच कर्ज देते.

पण अगदी काही थोडे अपवाद वगळले तर बहुतांश ॲप व्याज आणि कर्जाचे नियम पाळत नसल्याचे लक्षात आले आहे. बँक किंवा वित्तीय संस्था या छोट्या रकमेच्या कर्जासाठी साधारणपणे एक टक्का म्हणजे शंभर रुपयाला एक ते दीड टक्का व्याज लावतात.

म्हणजेच पाच लाख रुपये साठी पाच हजार रुपये. या ऍप्स चालणाऱ्या कंपन्या केवळ पाच हजार रुपयांच्या कर्जासाठी प्रोसेसिंग फी म्हणून चार हजार रुपये उकळतात. उत्पन्नाचा दाखला किंवा अन्य कोणतेही कागद न देता अगदी जलद आणि सहज कर्ज मिळत असल्याने ज्याला तातडीने पैशाची गरज आहे असे लोक या जाळ्यांमध्ये फसले जातात.

आपल्या फोन मध्ये कोणतेही ॲप डाऊनलोड करताना काही विशिष्ट परवानगी द्यावी लागते पण असं केल्याने आपण त्या ॲपला आपला मोबाईल मधले सगळे फोटो आणि कॉन्टॅक्ट नंबर वापरण्याची परवानगी देत असतो. याच परवानगीचा वापर करून लोन ॲप्स धमक्या देत आहेत.

या ॲप्स मागे चीनचा हात आहे का? तिथल्या वित्तीय संस्था कर्जासाठी निधी पुरवत आहेत का? याचा सुद्धा पोलीस तपास करत आहेत. 25 डिसेंबर रोजी गुजरात पोलिसांनी यातील चार संशयितांना अटक केली आणि त्यातील एक जण चिनी नागरिक आहे आणि तो कुबेवो टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मालक आहे आणि या कंपनीचे दिल्लीत स्काय इनोव्हेशन्स टेक्नॉलॉजी नावाचं मुख्यालय असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या संस्थेने कर्ज देणारी 11 Apps बनवून त्या माध्यमातून भरघोस कमाई केली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये बेकायदेशीर सावकारीला परवानगी नाही तर भारतात रिझर्व बँकेच्या नियमानुसार नोंदणीकृत बँका आणि बँकेच्या वित्तीय संस्था आणि वेगवेगळ्या राज्यांचे नियमानुसार तिथली कार्यरत असलेल्या संस्था यांनाच कर्जपुरवठा करण्याची अधिकृत परवानगी आहे.

याबद्दल सांगताना वकील प्रशांत माळी सांगतात की तुम्हाला जर हे ॲप्स चेक करायचे असतील तर ॲप्स च्या contact us किंवा about us मध्ये गेला तर तिथे जाऊन चेक केलं तर कळेल की कुठल्या नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट किंवा बँकेकडून याचा संबंध आहे.

या माहितीमध्ये कुठल्याही बँकेचा त्यांच्याशी संबंध असल्याचे ते दावा करत असतील तर तुम्ही त्या बँकेत जाऊन चौकशी करू शकता की या ॲप्स साठी यांच्याकडून मान्यता मिळाली आहे का. पूर्वी फक्त नोंदणीकृत संस्था असे ॲप तयार करायच्या आणि त्या त्यामाध्यमातून कर्ज पुरवायच्या.

पण आता हे असल्या कंपन्या आणि अगदी सामान्य व्यक्ती सुद्धा ॲप तयार करून आणि कर्जपुरवठा करू लागले आहेत. पण अशा ॲप साठी अजूनही कोणतेही नियम काढले गेले नाहीयेत. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

अशा ॲप्स कडून तुम्हाला त्रास होत असेल तर काय करायचं?: तुम्हाला जर अशा ॲपकडून त्रास होत असेल किंवा ते तुम्हाला ब्लॅकमेल करत असतील, धमक्या देत असतील तर तुम्ही sachet.rbi.org.in या संकेतस्थळावर जाऊन या विरुद्ध तक्रार करू शकता. तुमच्या बाबतीत जर असं काही घडलं तर तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तुमचा मानसिक छळ केल्याबाबतची तक्रार नोंदवू शकता.

थोडक्यात हल्ली झटपट कर्ज मिळते पण अशा कुठल्याही ॲप वरून कर्ज घेऊ नका. मान्यता प्राप्त संस्थाकडूनच पैसे उचला. कारण आधी वाचवलेला थोडावेळ नंतर खूप मनस्ताप देऊन जातोय असं आतापर्यंतच्या प्रकरणातून दिसून आलेले आहे.म्हणूनच नेहमी सतर्क राहा.सावध राहा. आपल्याला आम्ही दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.