महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा निवडून आलेले टॉप टेन खासदार कोणते ? जाणुन घ्या महत्वाची माहिती या लेखातून !
नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा निवडून आलेले टॉप टेन खासदार पाहणार आहोत : पहिल्या क्रमांकावर आहे सलग नऊ वेळा निवडून आलेले माणिकराव गावित. 1980 पासून ते 2009 पर्यंत सलग नऊ वेळा नंदुरबार मधून लोकसभा निवडणूक जिंकणारे खासदार आहेत. सलग 9 वेळा नंदुरबार मतदारसंघात काँग्रेसचे खासदार, दोन वेळा केंद्रात राज्यमंत्री, लोकसभेचे हंगामी अध्यक्ष असे अनेक पदे त्यांनी भूषविली.
दुसरा क्रमांक आहे काँग्रेसचे बाळासाहेब विखे यांचा. असून 1971 ते 1977 आणि 1984 ते 2004 असे सलघ आठ वेळा कोपरगाव मतदार संघातून ते खासदार होते. तब्बल सात वेळा खासदार, केंद्रात अर्थ राज्यमंत्री व अवजड उद्योगमंत्री अशी पदे भूषवलेले खासदार बाळासाहेब विखे विरुद्ध जिल्ह्यातील इतर प्रस्थापित मंडळी, असा राजकीय संघर्ष गेली कित्येक वर्षे सुरू होता.
तो आता शमला असला तरी जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात त्यांचे स्थान अढळ आहे. राजकारणात विखे कधीही मागे हटणारे नव्हते. त्यांनी आपले राजकीय निर्णय घेताना कोणाचीही तमा बाळगली नव्हती. सर्व पक्षांत त्यांना मानणारी मंडळी होती. आदिवासी अकोले तालुक्यापासून दुष्काळी जामखेड तालुक्यापर्यंत विखे यांना मानणाऱ्या लहान-मोठ्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकमेव नेते म्हणून विखेंचेच नाव होते.
तिसरा क्रमांक काँग्रेसचे शिवराज पाटील यांचा लागत असून 1980 पासून ते 2004 असे सात वेळा लातूर मतदार संघातून ते खासदार होते. शिवराज पाटील हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रामधील वरिष्ठ नेते, भारताचे माजी गृहमंत्री व १०वे लोकसभा सभापती आहेत. २०१० ते २०१५ दरम्यान ते पंजाब राज्याचे राज्यपाल व चंदिगढ केंद्रशासित प्रदेशाचे प्रचालक होते. १९७३ साली लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर प्रथम निवडून आलेल्या पाटील ह्यांनी महाराष्ट्र शासनामध्ये अनेक मंत्रीपदे भुषवली.
१९८० साली ते प्रथम लातूर लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून गेले. पुढील ६ निवडणुकांमध्ये त्यांनी येथून विजय मिळवला. २००४ साली राज्यसभेचे सदस्यत्व मिळालेले पाटील २००४ ते २००८ दरम्यान मनमोहन सिंग मंत्रीमंडळामध्ये गृहमंत्रीपदावर होते. २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतामधील कायदा व सुव्यवस्था राखण्यास अपयश आल्याच्या टीकेवरून पाटीलांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
चौथा क्रमांक लागतो काँग्रेसचे विलास मुत्तेमवार. 1980 पासून 1984 आणि 1991 असे तीन वेळा चिमूर मतदार संघातून आणि 1998 ते 2009 असे चार वेळा नागपूर लोकसभा मतदारसंघातून ते खासदार होते. पाचवा क्रमांक हा संदिपान थोरात यांचा असून 1977 ते 1998 असे सलग सातवेळा काँग्रेस पक्षातून पंढरपूर मतदारसंघातून खासदार होते.
सहाव्या क्रमांकावर आहेत भाजपचे उत्तमराव पाटील 1980 पासून ते 1999 पर्यंत सलग सातवेळा ते धुळे मतदार संघातून खासदार होते. सातव्या क्रमांकावर शिवसेनेचे अनंत गीते आहे. 1998 पासून 2014 पर्यंत सलग सहा वेळा रायगड मतदारसंघातून खासदार होते. आठव्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आहे. 1994 पासून ते 1999 पर्यंत आणि 2004 आणि 2009 साली माढा मतदारसंघातून ते लोकसभेचे खासदार होते. पाच वेळा सलग ते लोकसभेचे खासदार होते.
नवव्या क्रमांकावर भाजपचे राम नाईक हे आहेत. 1989 पासून 1999 पर्यंत सलग पाच वेळा उत्तर मुंबई मतदारसंघातून ते लोकसभेचे खासदार होते. दहाव्या क्रमांकावर काँग्रेसचे उदयसिंहराव गायकवाड हे आहेत ते 1980 पासून 1996 पर्यंत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेचे खासदार होते.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.