ह्या वर्षीचा अर्थसंकल्प सामन्यांसाठी कसा आहे? आपल्याला भराव्या लागणाऱ्या टॅक्स मध्ये काही छुपे बदल आहेत का? जाणून घ्या अर्थसंकल्पाचे महत्वाचे मुद्दे !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो, तुमच्या आमच्या सारखा मध्यमवर्गीय जेव्हा अर्थसंकल्प पाहत असतो तेव्हा एका गोष्टीकडे त्याची नजर लागलेली असते ती म्हणजे आयकर मध्ये त्याला नेमकी किती सूट म्हणजे सवलत मिळणार आहे. मागच्या वर्षीची जी कररचना होती तीच या वर्षी म्हणजेच 2021-22 ला कायम राहणार आहे.

मागच्या वर्षी जो आयकर तुम्ही भरत होता तोच या वर्षी तुम्हाला भरावा लागणार आहे.पण काही दिलासे आहेत ते मात्र अर्थमंत्र्यांनी नक्की देऊ केलेले आहेत तर पाहूयात नवीन कर्ज रचना आणि काय आहेत हे दिलासे. मागच्या वर्षीचीच कररचना अबाधित राहणार आहे.

म्हणजे काय तर गेल्याच वर्षी एक नवीन कररचना सांगितली होती आणि ती अशी होती की अडीच लाखांपर्यंत चा आपले उत्पन्न आहे करमुक्त होतं त्यानंतर 2.5 ते 5 लाखापर्यंत च्या उत्पन्नाला आपल्याला 5 टक्के कर भरावा लागणार होता, पण त्याला रिबेट मिळणार होता म्हणजे एकंदरीत 5 लाखांपर्यंत उत्पन्न तुमचं करमुक्त होऊ शकत होतं.

त्यानंतर 5 ते 7.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के कर भरावा लागणार होता आणि 7.5 ते 10 लाखापर्यंत च्या उत्पन्नावर 15 टक्के कर भरावा लागणार होता. 10 ते 12.5 लाखांसाठी वीस टक्के 12.5 ते 15 लाखांसाठी 25 टक्के आणि 15 लाखांच्या पुढे उत्पन्नासाठी 30 टक्के इतका कर भरावा लागणार होता.

हीच रचना आता ही अबाधित आहे आणि तज्ञांचा अस म्हणणं आहे की जेव्हा एक नवीन कररचना सांगितली जाते तेव्हा लगेचच एक दोन वर्षात ती बदलली जात नाही, त्यामुळे अनेकांना अपेक्षा ही नव्हती की कररचना बदली जावी. मागच्या वर्षी अर्थमंत्र्यांनी दिलेल्या कररचनेनुसार कर भरायचा?

की गेल्यावर्षी 18 c द्वारे कर बचत करून बचत करता येत होती तसे करायचे? हा पर्याय आपल्याला दिला होता तो पर्याय आजही कायम आहे. आता अर्थमंत्री यांनी जे दिलासे दिले आहेत ते खालील प्रमाणे: 1)75 वर्षापेक्षा मोठे म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील

त्यांना इथून पुढे फक्त आणि फक्त पेन्शन ही त्यांची मिळकत असेल तर त्यांना ITR फाईल करावा लागणार नाही आहे, हे फक्त आणि फक्त पेन्शनचे उत्पन्न असले तरच आहे या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे उत्पन्न असल्यास किंवा बँकेत ठेवी असल्यास ITR फाईल करावा लागणार आहे.

2)दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी सरकारने आणखी एक गोष्ट आणली होती ते अफोर्डेबल हाऊस म्हणजेच परवडण्यासारखी घर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर त्यासाठी सरकारने कर रिबेट दिला होता आणि त्याच बरोबर अशा घरांमध्ये जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर त्यासाठी सुद्धा सवलत केंद्र सरकारने व अर्थमंत्र्यांनी देऊ केली होती. या सवलतीला मुदतवाढ मिळाली आहे ती पुढच्या वर्षी सुद्धा तुम्हाला मिळत राहणार आहे.

3)आणखी एक सोपी गोष्ट ते म्हणजे इन्कम टॅक्स म्हणजेच ITR फाईल करण्याच्या दृष्टीने सरकारने केली आहे ते म्हणजे तुमचं निव्वळ उत्पन्न,शेअर मार्केटमधील गुंतवणूक व उत्पन्न या सर्व गोष्टी ज्या आहेत या ITR फॉर्ममध्ये आधीच भरलेले असणार आहेत.यामुळे तुम्हाला फॉर्म भरणे सोपे जाणार आहे, तसेच त्यासंबंधीचे सर्व हिशोब देखील त्यामध्ये केलेले असणार आहेत.

4.आणखी एक गोष्ट म्हणजे आयकरबद्दल तुमच्या काही तक्रारी असतील आणि त्या तुम्ही आयकर विभागाकडे नोंदवलेले असतील तर त्याची वेळोवेळी सुनावणी होते. कारण की आयकर विभागाकडून अनेकदा तुम्हाला विचारलं जाते, तुमच्या फॉर्म भरण्यामध्ये त्रुटी आढळलेल्या असतात,

हे सगळे सिस्टीम आता ऑनलाइन केली आहे. याचा मोठा फायदा तुम्हाला होणार आहे तो म्हणजे प्रत्येक सुनावणीच्या दरम्यान आयकर अधिकाऱ्यांना तुम्हाला भेटायला जावं लागणार नाही आहे तर ऑनलाइन मध्ये सुद्धा ती कामे होऊ शकतील.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.