महार वतन वर्ग सहावा ब जमिनीचे खरेदी विक्री परवानगी कशी प्राप्त करून घेता येईल ?

शेती शैक्षणिक

आज आपण चर्चा करणार आहोत महार वतन वर्ग सहावा ब जमिनीचे खरेदी विक्री परवानगी कशी प्राप्त करून घेता येईल. वर्ग सहावा ब ही जमीन खरेदी विक्री करत असताना जमीन विक्री करणाऱ्या व्यक्ती भविष्यात जमीन विक्री केल्यानंतर भूमिहीन होणार नाही किंवा जमीन विक्री करणाऱ्या व्यक्ती हा जमीन विक्री करण्यासाठी त्याला सबळ कारण आहे का

त्या गोष्टीची खात्री केली जाते तसेच जमीन घेणारा व्यक्ती हा शेतकरी आहे? का आणि शेतकरी नसल्यास तो मग आणखी कोणत्या कारणासाठी घेणार आहेत? त्याच्याकडे जमीन घेण्यासाठी परवानगी आहे का? त्या गोष्टीची खात्री केली जाते. एखाद्या व्यक्तीला जमीन विक्री करायची असेल तर त्याला प्रथम आपल्या जागेचे सर्व मागील सातबारा

फेरफार उतारे आणि त्याला जमीन मिळाल्याचा रिग्रन्ड चा उतारा इतकी कागदपत्रे जोडून आणि त्याबरोबर आपन ही जमीन विक्री केल्यानंतर भूमिहीन होणार नाही किंवा जमीन विक्री करायची असेल तर त्याला प्रथमता आपल्या जागेचे सर्व मागील सातबारा फेरफार उतारे आणि त्याला जमीन मिळाल्याचे यांचा उतारा ही कागदपत्रे जोडून

आणि त्याबरोबर आपली जमीन विक्री केल्यानंतर आपण जमीनहीन होणार नाही आणि जमीन विक्री करण्याचे योग्य कारण जसे ती वैद्यकीय कारण किंवा त्यांनी शेती व्यवसाय बंद केला असेल किंवा त्यांच्या मुलांनी शेती व्यवसाय बंद केला असेल किंवा त्यांना कोणी वारस नसेल या गोष्टींचा अंतर्भाव करून घेते कारण त्या नमूद करून त्याला अर्ज करावा लागतो.

तसेच अर्ज यामध्ये जमीन घेणारी व्यक्ती हा जमीन घेतल्यानंतर शासनाच्या कुठले नियमाचे आटी चे भंग करणार नाही अशा आशयाचा त्याला प्रतिज्ञापत्र द्यावे लागतात. आता अशी जमीन खरेदी करण्यासाठी हे सर्व कागदपत्र जमा करून संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव अर्ज दाखल करावा.

त्यांच्याकडे तहसिलदार यांचेकडून संबंधित मंडळाधिकारी यांच्याकडे पाठवला जातो. मंडळ अधिकारी संबंधित जमीन देणाऱ्या न जमीन घेणार त्यांची जागा जबाब घेतात. जागेचा पंचनामा घेतात. आणि त्यांच्या आवश्यक ती अन्य कागदपत्रं प्रकरणी सामिल करतात. त्याच बरोबर विक्री करत असताना कोणाची काही हरकती व सूचना असल्यास ती कळण्यासाठी गावांमध्ये दवंडी पिटली जाते.

आणि आणि अशी दवंडी पिटवली रजिस्टर उतारा व दवंडी दिल्यानंतर कोणाचीच हरकत आली नाही म्हणून तसा अहवाल उतारा सोबत जोडून असा प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडे तहसीलदार द्ववारा अग्रेषित केला जातो. जिल्हाधिकारी सदरची जागा ही विकत घेणाऱ्या पेक्षा अजुन जास्त कीमती मधे घेणार असेल तर ते कळण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देतात.

व जाहीर ज्याची कुणाची हरकत असेल तेव्हा जास्त घेणार असेल तर तसे याबाबत तहसीलदार यांच्याकडे कळवावे असा उल्लेख केलेले असतो. तहसिलदार यांचेकडे कोणाच्या हरकती व विचारणा आल्या तर तस ते जिल्हाधिकारी यांना अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवतात.

जिल्हाधिकारी आता हा परिपूर्ण प्रस्ताव त्यासोबत त्यांचे अखत्यारीतील भूमी संपादन अधिकारी, पुनर्वसन अधिकारी अशा अन्य विभागांचे ना हरकत दाखले घेतले जातात. जेणेकरून या जागेवर कोणतीही भूमि सम्पदानाची कारवाई सुरू करण्यासाठी घेऊन जिल्हाधिकारी परिपूर्ण प्रस्ताव मान्यतेसाठी माननीय विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवून देतात

व त्यांच्याकडून त्यावर विचार करून अशा व्यवहारांना मान्यता देण्याची शिफारस केली जाते आणि नंतर जमीन घेणाऱ्या व्यक्ति जर शेतकरी असेल तर त्यासाठी किती नजराना भरावा लागतो. आणि जर शेती व्यतिरिक्त वापर असेल तर त्यासाठी किती या प्रमाणे त्याच्या नजरण्याचे चलन त्याला काडून दिले जाते.

व त्या चलनाची रक्कम संबंधित शासकीय कोषागारात जमा झाल्यानंतर ही जमीन खरेदी विक्रीचा परवाना जिल्हाधिकारी यांच्याकडून संबंधित अर्जदारांना लिहून देणारे – लिहून घेणार याना मिळतो. हा परवाना जोडून संबंधित जमीन मालक व घेणारी व्यक्ती त्यांचा नोंदणीकृत दस्त रजिस्टर आफिस ला नोदवू शकतात आणि त्या अनुषंघाने सातबरा सदरी नोंद करू शकतात.

1 thought on “महार वतन वर्ग सहावा ब जमिनीचे खरेदी विक्री परवानगी कशी प्राप्त करून घेता येईल ?

  1. १९६० मध्ये महार लोकांच्या जमिनी धारकरी राव मंडळी नि कुळवहिवाट लावून त्यांना नोटिसा पाठवून गैर हजर दाखवून अशिक्षित महार समाजाकडून काढून तेव्हाच्या प्रांत साहेबांनी जमीन राव मंडळींच्या नावावर केल्या आज शेती कसणारा तेव्हाचा महार आज बौद्ध आहे. पण कसण्यासाठी जमिनी खूपच कमी आणि अल्प भूधारक तर काही भूमिहीन आहेत , माझ्याकडे सगळे जुने पेपर आहेत. माझे आजोबा आर्मी मध्ये असल्या ने त्यांचे भाऊ ,आई वडील अशिक्षित होते त्यांच्या सगळ्या जमिनी राव मंडळींनी खोटी माहिती देऊन घेतली आहे, आजोबांनी सगळे पेपर तयार केले आणि वारले आज ते पेपर माझ्याकडे आहेत , वडील शेतकरी असून 30 ते 35 वर्ष दुसऱ्याची शेती खंडाने करीत आहेत ,आम्हाला आमच्या जमिनी पुन्हा मिळण्यासाठी काय करावे लागेल. मार्ग सुचवावा… मार्गदर्शन आपेक्षित आहे.

Comments are closed.