महाराष्ट्रातील सर्वात गरीब 5 जिल्हे कोणते? जाणून घ्या!!

अर्थकारण बातम्या

आपले महाराष्ट्र राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे. ज्याची कोकण-पुणे-नाशिक- छत्रपती संभाजीनगर- नागपूर-अमरावती अशा एकूण 6 प्रशासकीय विभागात विभागणी केलेली आहे. महाराष्ट्रातील एकूण जिल्हे आणि तालुके यांचा विचार केला तर महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आणि 358 तालुके आहेत. महाराष्ट्रात हे राज्य आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम समजले जात असले तरी आज देखील या राज्यांमध्ये गरीब जिल्हे आहेत, जिथली गरीबी पाहून तुम्हीदेखील अगदी थक्क होवून जाल. नुकताच निती आयोगाने देशभरात केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात गरीब आणि श्रीमंत जिल्ह्याची माहिती देण्यात आली. याच बेसवर आज आपण महाराष्ट्रातील सर्वात गरीब पाच जिल्हे कोणते आहेत? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत..

◆अकोला : महाराष्ट्रातील सर्वात गरीब जिल्ह्यांच्या यादीमध्ये अकोला जिल्ह्याचा पाचवा क्रमांक लागतो. जो महाराष्ट्राच्या विदर्भ या प्रशासकीय विभागांमध्ये येतो. जिथे मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन घेतले जाते त्यामुळे या जिल्ह्याला कॉटन सिटी म्हणून ही ओळखले जाते. मात्र असे असले तरी देखील अकोल्यात 30 ते 35 टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतात.

◆ यवतमाळ : महाराष्ट्रातील सर्वात गरीब जिल्ह्यांच्या यादीमध्ये यवतमाळ चौथा क्रमांक लागतो. जो विदर्भ या प्रशासकीय विभागामध्ये येतो. जिथे कापूस पिंजून घ्यायचे आणि दाबून त्याचे गठ्ठे बनवण्याचे उद्योग केले जातात. त्यामुळे यवतमाळ कापसाचे शहर म्हणूनही ओळखले जाते. सध्या यवतमाळ जिल्ह्यातील 40 ते 45 टक्के लोक गरीब परिस्थितील जीवन जगत आहेत.

◆ गडचिरोली : महाराष्ट्रातील सर्वात गरीब जिल्ह्यांच्या यादीमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा क्रमांक लागतो. जो महाराष्ट्राच्या विदर्भ या प्रशासकीय विभागामध्ये येतो. आदिवासींचा, मागासवर्गीय आणि घनदाट जंगलाने व्यापलेला जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख आहे. हा जिल्हा औद्योगिक दृष्ट्या अकुशल असल्यामुळे तिथे जास्त कंपन्या नाही त्यामुळे इथले जास्त करून लोक शेतीवर अवलंबून असतात. सध्या गडचिरोली या जिल्ह्यातील 50 टक्के लोक गरिबी जीवन जगत आहेत.

◆ गोंदिया : महाराष्ट्रातील सर्वात गरीब जिल्ह्यांची यादीमध्ये गोंदिया जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. जो महाराष्ट्राच्या विदर्भ या प्रशासकीय विभागातील अतिपूर्वेकडील जिल्हा म्हणून ओळखला जातो. अतिशय उपेक्षित असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील बहुतेक जमीन जंगलाने व्यापलेली आहे. हा जिल्हा आर्थिक दृष्ट्या मागास असून संपूर्ण जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योग नाहीत. भात शेतीचे मुख्य पीक असल्यामुळे या जिल्ह्यात तांदळाच्या बऱ्याच गिरण्या आहेत त्यामुळे याला राईस सिटी म्हणून ओळखले जाते. या जिल्ह्यातील 57.5 एक किलो गरिबी जीवन जगत आहेत.

◆ नंदुरबार : महाराष्ट्रातील सर्वात गरीब जिल्ह्यांच्या यादीमध्ये नंदुरबार या जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो. आदिवासी जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. ज्या ठिकाणी रोजगार नसल्यामुळे अनेक आदिवासी बांधव ते रोजगाराच्या शोधात राज्याच्या इतर ठिकाणी गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर शिक्षण आणि रोजगाराची मोठी समस्या या ठिकाणी असल्यामुळे हे जिल्हा आदिवासी बांधवांचा विकास हा देखील गुंठलेला आलेला आहे. सध्या नंदुरबार या जिल्ह्यातील अडीच लाख कुटुंबांपैकी 72% लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत.

तर आज आपण महाराष्ट्रातील सर्वात गरीब जिल्ह्याबद्दल माहिती जाणून घेतली आहे. तुमच्या मते महाराष्ट्रातील सर्वात अविकसित जिल्हा कोणता आहे? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…