अंतराळात अडकलेली व्यक्ती मतदान करू शकते का? अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता तशी फारच दुर्मिळ असते. पण सध्या सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या साथीदारांबाबत मात्र हे घडले आहे. एका मोहिमेत 8 दिवसांच्या मोहिमेसाठी इंटरनेशनाल स्पेस स्टेशनला गेलेले हे दोन अंतराळवीर आता फेब्रुवारी 2025 पर्यंत तिथेच असणार आहेत आणि या दरम्यान 5 नोव्हेंबर अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मतदान होते. मग हे दोन अंतराळवीर आणि त्यांच्या सोबत असणारी इतर अंतराळवीर मतदान करू केलं का? आणि कसं केलं असेल? चला तर मग समजून घेऊया..
तर इंटरनॅशनल स्पेसस्टेशन मधल्या नासाच्या या अंतरावीरांना मतदान करणे शक्य होते! कारण ते यासाठी अब्सेंटी बैलेट सुविधा वापरू शकतात.कारण अमेरिकेत ही सुविधा त्या लोकांसाठी असते जे काही कारणांमुळे त्यांच्या नेहमीच्या मतदार केंद्र जाऊन मतदान करू शकणार नाहीत.
नासाच्या स्पेस कम्युनिकेशन अँड नेव्हिगेशन प्रोग्रॅमद्वारे हे शक्य होत. सगळ्यात आधी अंतराळवीर या निवडणुकीसाठीची अब्सेंटी बैलेट विनंती अप्लिकेशन करतात आणि मग इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका या स्पेस स्टेशनमध्ये भरतात. या मतपत्रिका एन्क्रिप्ट करून स्पेस स्टेशनमधले कम्प्युटर सिस्टीममध्ये अपलोड केल्या जातात आणि यानंतर या मतपत्रिका ट्रेकिंग रिटर्न सॅटेलाईट द्वारे न्यू मेक्सिको मधल्या टर्मिनलला पाठवले जातात.
टर्मिनल मतपत्रिका नासाच्या युस्टनमधल्या जॉन्सन स्पेसमध्ये असणाऱ्या मिशन कंट्रोल सेंटरमध्ये येतात आणि मग हे जॉन्सन स्पेस सेंटर या मतपत्रिका इलेक्ट्रॉनिक मतदान अंतराळवीरांच्या मतदान केंद्र अधिकारीपर्यंत पोहोचवतात आणि मग इतर मतदानसोबत या मताची देखील मोजणी होते. मत कोणाला दिल आहे? यामध्ये गुप्तता राहावी? म्हणून ही इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका एन्क्रिप्ट करण्यात येते आणि फक्त अकाउंट क्लार्क आणि मग देणारी ती अंतराळवीर व्यक्ती त्या दोघांनाच ॲक्सेस करता येते.
1997 पासूनच्या निवडणुकांमध्ये अमेरिकन अंतराळवीर अशाप्रकारे मतदान झालेले आहेत. 1997 मध्ये मिर अंतराळ स्थानकात माणसाची अंतराळवीर डेव्हिड यांनी पहिल्यांदा निवडणुकीसाठी मतदान केलं होतं तर नोव्हेंबर 2020 मध्ये नासाच्या अंतराळ वीर केट रुबे यांनी या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी स्पेस स्टेशनमध्ये मतदान करणारे पहिले अंतराळवीर ठरला. सुनीता विल्यम्स यांना अमेरिकेचे मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मत नोंदवणे बंधनकारक होतं.
5 नोव्हेंबरला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीचे मतदान होते..