अब्रुनुकसानीचा किंवा मानहानीचा कायदा ।। त्या विरोधात कशाप्रकारे दाद मागता येते? ।। गुन्हा सिद्ध झाला तर किती आणि काय शिक्षा नमूद केलेली आहे हे सर्व जाणून घ्या या लेखातून !

लोकप्रिय शैक्षणिक

भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला प्रतिष्ठाने जगण्या बरोबर मुक्तपणे वागण्या-बोलण्याच, आणि मत व्यक्त करण्यासाठी काही मूलभूत हक्क आणि अधिकार बहाल केले आहेत. याच मूलभूत हक्क आणि अधिकारांच्या आधारे माणसं मुक्तपणे बोलू लागलीत, लिहू लागलेत आणि आपलं मत व्यक्त करू लागलेत.

मात्र कधीकधी या अधिकारांच्या वापराचा अतिरेक असे उलटे परिणाम दिसू लागले. आणि मूलभूत अधिकार आणि हक्कांच्या आधारे इतरांच्या हक्कावर, स्वातंत्र्यावर, आणि प्रतिष्ठेने जगण्याच्या अधिकारावर गदा आणली जाऊ लागली. आणि यामुळे डिफेमेशन किंवा मानहानी सारख्या केसेस मोठ्या प्रमाणावर कोर्टात दाखल केल्या जाऊ लागल्या.

मात्र मानहानी हा प्रकार काय ? आणि याबाबत कायदा काय सांगतो हे पाहुयात मानहानी कायदा अगदी सोप्या शब्दात. तर “डीफर्मेशन” हा इंग्रजी शब्द मराठीत अब्रू नुकसान आणि सोप्या शब्दात बदनामी असं म्हटलं जातं. कायदा सांगतो जर तुम्हाला आणि मला वागण्याच, लिहिण्याच, आणि बोलण्याचे स्वातंत्र्य असलं, तरी एखाद्याची बदनामी होईल किंवा एखाद्याच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचेल अशी कोणतीही कृती करण्याचा अधिकार नाही.

आणि जेव्हा एखादी कृती घडते ज्यामुळे समाजात एखाद्या व्यक्तीची बदनामी होते तेव्हा मानहानी झाली असं म्हटलं जातं. तस मानहानीचा प्रकार ज्या व्यक्तीबरोबर घडतो त्या व्यक्तीला संरक्षण देण्यासाठी भारतीय दंडविधान संहिता मध्ये काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. आणि त्यात तरतुदी कोणत्या त्याबाबत जाणून घेऊया अगदी सोप्या शब्दात.

भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला स्वतः चे स्थान निर्माण करणेसाठी काही अधिकार दिलेले आहेत, काही कर्तव्य दिलेली आहेत. हे कर्तव्य देत असताना त्या व्यक्तीचा त्याच्या परिसरात, मित्रमंडळींमध्ये समाजामध्ये त्याला प्रतिष्ठा असते, नावलौकिक असत. हा नावलौकिक असताना त्या नावलौकिकेच्या यासंदर्भात जर एखाद्या तिरहिताने किंवा विरुद्ध बाजू असणाऱ्या व्यक्तीने जर त्या व्यक्तीविषयी खोटी माहिती प्रसिद्ध केली.

त्याची प्रतिष्ठा असती त्याची हानी होईल. बदनामी होईल अब्रूची नुकसानी होईल. अशा प्रकारचे वाक्य उद्गारले तर ती त्याची बदनामी होते. याला आपण डीफर्मेशन म्हणतो. अशा प्रकारे जर एखाद्या व्यक्तीची बदनामी झाली, तर राज्यघटनेनुसार आणि कायद्याने त्याला संरक्षण दिलेलं आहे. त्या संरक्षण यामध्ये आपण काय करतो, जर कुणी आपली बदनामी केली तर त्याच्यावर आपण दोन गोष्टीने कायदेशीर मार्गाने फिर्याद दाखल करू शकतो.

1. प्रथमत आपण त्यावर फौजदारी केस दाखल करू शकतो. त्या फौजदारी केस मध्ये भारतीय दंड सहितेच्या कलम 499 मध्ये त्याची व्याख्या दिलेली आहे, 500 प्रमाणे आपण त्याची कोर्टामध्ये फिर्याद दाखल करू शकतो. फिर्याद दिल्यानंतर साधारणत डीफर्मेशन झाले असेल, बदनामी झाली तर चार गोष्टी कराव्या लागतात. की ज्यांना आपल्याविषयी जो काही मजकूर छापलेला आहे, प्रसिद्ध केलेला आहे.

तो खोटा पाहिजे, बनावट पाहिजे. आणि मग जरा असा खोटा मजकूर असेल, तर तो खोटा मजकूर सुद्धा दोन प्रकारे होऊ शकतो. एक तोंडी बदनामी करणं किंवा लिखित स्वरुपाची करते. आणि असा मजकुराला प्रसिध्दी मिळाली पाहिजे. प्रसिद्धी दिली की ती माहिती लोकांपर्यंत मिळाली, तर ती बदनामी होते. आणि ती बदनामी त्या वाक्याची पुढच्या व्यक्तीला त्याची बदनामी होवून त्याचं नुकसान झालं पाहिजे, त्याची मानहानी झाली पाहिजेत.

याबाबत आपण त्या व्यक्तीचे संदर्भा मध्ये फौजदारी केस होवू शकते. त्या फौजदारी केस मध्ये जर न्यायलायात या गोष्टी सादर झाल्या तर कमीत कमी दोन वर्षांपर्यंत त्याला कैद होवू शकते. अथवा दंड होवू शकतो. किंवा दोन्ही गोष्टी न्यायालयात सिद्ध होवून न्यायालय त्याला शिक्षा करू शकते.

त्याचप्रमाणे फौजदारी बरोबरच आपली जी काय अब्रू नुकसानी होईल, आपल्याला ती काय नुकसान भरपाई करायची असेल तर (law of torts) खाली त्या नुकसान भरपाईच्या कायद्याच्या अनुष्णगणे आपण त्याच्या विरुद्ध दिवाणी स्वरूपाचा दावा दाखल करू शकतो. मग तो दावा किती कोटीपर्यंत किंवा किती रकमेचा करावं ह्याला काही मर्यादा नाही. पण साधारणत वाजविक रकमेसाठी आपण दावा दाखल करू शकतो.

मग त्या मध्ये सुद्धा असाच पुरावा देऊन तो दावा होवू शकतो. याप्रमाणे जर एखाद्याने बदनामी केली तर त्या बदनामीच्या स्वरूपामध्ये कायदेशीर गोष्टी आहेत. परंतु या बदनामी करताना सुद्धा आपल्याला एक 7 ते 10 गोष्टी सुद्धा कायद्याने संरक्षण दिलेलं आहे. की जर समजा आपण एखादी गोष्ट जर पब्लिक हिता करता किंवा सर्व सामान्य जनतेसाठी एखाद वाक्य किंवा एखादी बातमी छापली गेली, पत्र लिहिलं गेलं, एखादा मजकूर लिहिला गेला.

तर अशा पत्राचा जर हेतू प्रामाणिक असेल, आणि ती बातमी खरी असेल.आता त्यामध्ये व्यक्तीची बदनामी होते किंवा नाही, तर त्याला हे अपवाद आहे, यात अशा प्रकारची बदनामी होणार नाही. उदरणार्थं एखादा व्यक्ती आहे आणि दुकानदारांनी सांगितलं अशा एखाद्या व्यक्तीला उधार माल देऊ नका. मग ही त्या व्यक्तीची बदनामी होवु शकते. मी काय बुडवणार आहे का. परंतु तो दुकानदार स्वतः च्या हितासाठी सांगू शकतो की मला अशा व्यक्तीला उधार माल द्यायचा नाही.

मग तो दुकानदार येथे अपवाद आहे. किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्याला सावध करायचं असेल. एखाद्या व्यक्तीला आजार झालेला आहे, आणि त्या व्यक्तीच्या आजारपणाची आपण वाच्यता केली तर ती त्या व्यक्तीची बदनामी होणार. किंवा काही वेळा आपण अशा बातम्या देतो की, एखाद्या गोष्टीची कोर्टात प्रोसेडींग आहे. कोर्टात झालेला निकालावर वर्तमानपत्र असेल किंवा एखादी खाजगी व्यक्ती असेल त्यावर ते चर्चा करू शकतात, त्यांचं मत देऊ शकतात.

त्यामुळे न्यायालयाची बदनामी होत नाही. एखादा साक्षीदार आहे, आणि साक्ष देताना तो फितूर झाला. तर आपण सांगू शकतो की हा फितूर आहे. तस जर एखाद्याला फितूर म्हंतल तर ती बदनामी होईल. परंतु न्यायालयात साक्ष देताना फितूर झाला तर त्या न्यायालयाच्या काळापुरता असतो म्हणून ती बदनामी होत नाही.

त्याचप्रमाणे एखादी बातमी आपण जनतेसाठी प्रसिद्ध केली, चर्चा केली. तर ती चर्चा तुमचा हेतू जर प्रामाणिक असेल तर त्यात देखील तुमची बदनामी होणार नाही. किंवा तुमच्याकडून कोणाची बदनामी होणार नाही. थोडक्यात साधारणत असे हे 10 अपवाद आहे. यात तुमची केस बसली तर की यात तुम्ही म्हणून घेवू शकत नाही की तुमची बदनामी झालेली आहे.

समजा एखाद्या ने भ्रष्टाचार केला त्याची बातमी आहे. त्याच्यावर जर क्रीमिनल केस झालेली असेल. तर ती बातमी आपण देऊ शकतो. तसं पाहिलं तर कोणावर डायरेक्ट आरोप केला तर ती बदनामी होवु शकते. परंतु केस आहे पोलिसांनी अटक केलेली आहे, घटना सत्य आहे तर ती बदनामी होवू शकत नाही.

यासाठी कोणाची मानहानी होवू नये, कोणाचं चारित्र्य हरण होवू नये. म्हणून जी काय अपकिर्तीच्या संदर्भामध्ये एखाद्याची जाणीवपूर्वक, हेतुपूर्वक त्याचा अपमान होईल. समाजामध्ये त्याच स्थान कमी होईल. अशा प्रकारची जर चर्चा केली तर ती बदनामी होते. त्याचप्रमाने समजा एखादा शिक्षक आहे, आणि तो एखाद्या विद्यार्थ्याला बोलला की तुला काही येत नाही, तू काय करत नाही.

तर पालकांनी त्यांना परवानगी दिलेली आहे की आमच्या अपत्याला तुम्ही शिक्षण द्या तर तेव्हा ही त्या विद्यार्थ्याची बदनामी होत नाही. पण एखादा नेता आहे त्याची पॉलिसी सांगत असेल, किंवा निवडणुकीला उभा आहे, त्यामुळं तो जर विरुद्ध बाजूवर टिका करतो. तेव्हा ते पॉलिसी डिसिजन होते. तो त्याच्या निवडणुकीचा प्रचार करत असतो. त्यामुळे त्यांचा हेतू प्रामाणिक असेल तर तो गुन्हा होत नाही.

तर फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्ही पद्धतीने बदनामी झालेली व्यक्ती आपल्या हक्कांसाठी न्यायालयात धाव घेवू शकते. फौजदारी गुन्हा दाखल केलात तर दोषी व्यक्तीला भारतीय दंडसहिता कलम 500 नुसार 2 वर्षाची करावासा बरोबर द्रव्य दंडाची शिक्षा केली जाते.

आणि हा जामीनपात्र गुन्हा आहे. प्रथम श्रेणी न्यायालयासमोर अब्रू नुकसानीची प्रकरण चालवली जातात. आणि जर लॉ ऑफ टॉर्त नुसार जर दिवाणी गुन्हा दाखल झाल असेल तर दोषी असणारा व्यक्ती द्रव्य दंडाच्या शिक्षेस पात्र होतो. याबरोबरच भारतीय दंडसंहितेची कलम 501, 502, 503, आणि 504 मध्ये बदनामीच्या संदर्भाने घडणाऱ्या गुन्ह्यांचे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आणि यासंदर्भात शिक्षा देखील नमूद करण्यात आलेली आहे.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.