म्हणून आजपर्यंत डेंग्यूवर लस विकसित करता आलेली नाहीये?

बातम्या

 

भारतामध्ये विकसित करण्यात येणाऱ्या डेंग्यूच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू करण्यात आली अशी घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल आणि पानेशिया बायोटेक कंपनी मिळून ही लस विकसित करत आहेत.1943 साली पहिल्यांदा जपानच्या नागासाकीमध्ये डेंग्यूचा व्हायरसचा शोध लागला होता आणि 2023 मध्ये 129देशांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत मग या वायरस या शोधाला 81 वर्ष उलटून देखील डेंग्यूची परिणामकारक लस विकसित करता का आलेली नाही? चला तर समजून घेऊया..
मुळात डेंग्यूचा डांस प्रदूषित पाण्यापेक्षा स्वच्छ साठवलेल्या पाण्यामध्ये जास्त आढळतो. डेंग्यू याचा अर्थ होतो पिळवटून दुखणं. या अर्थाप्रमाणे डेंग्यूच्या तापामध्ये हाडं आणि स्नायू खूप दुखतात. कोरोना व्हायरसचा शोध लागल्यावर त्यावर तातडीने लस विकसित करण्यात आली होती. मात्र, डेंग्यूची लस विकसित करण्यामध्ये काय आव्हानं आहेत?
महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक प्रकारचा डेंग्यू होऊन गेला तर त्यामुळे तुमच्या शरीरात या विषाणूची लढणारी रोग प्रतिकारक शक्ती तयार होईल. पण इतर प्रकारच्या डेंगूपासून काहीच संरक्षण म्हणजे इम्युनिटी मात्र तुम्हाला मिळणार नाही. एका डेंग्यू विषाणू संसर्ग नंतर इतर तीन प्रकारांच्या विषाणूंचा संसर्ग होऊन डेंग्यू होण्याचा धोका राहतोच आणि दुसऱ्यांदा डेंग्यू झाला तर तो अधिक धोकादायक आणि जीवघेणा असू शकतो.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि बायोटेक विकसित करत असलेल्या डेंग्यूचा लशीचा नाव आहे डेंगी ऑल. डेंग्यूच्या चारही प्रकारच्या विषाणूंचे तीव्रता कमी करून त्यांना एकत्र आणून तयार करण्यात येणारी ही एक लस आहे. हे चारही प्रकारचे विषाणू पासून संरक्षण देण्याचे उद्दीष्ट आहे. ही लस तयार करण्यासाठी वापरात येणारे असलेला व्हायरस हा अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ म्हणजे विकसित केला आहे. त्यांच्या सोबतीने भारतातल्या 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आतल्या 19 जागी या लसीच्या तिसऱ्या टप्प्यात या चाचण्या घेण्यात येतील. यामध्ये 3035 पेक्षा जास्त लोकांचा समावेश असेल आणि पुढची दोन वर्षं या लोकांवर ती लक्ष ठेवले जाईल.
जगातल्या निम्म्या लोकसंख्येला आता डेंग्यू होण्याचा धोका असून दरवर्षी 10 ते 40 कोटी लोकांना डेंग्यूचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या डासांचा प्रादुर्भाव हा आत्तापर्यंत उष्णकटिबंधात आढळून येत होता पण डेंग्यूचे डास आता थंड प्रदेशात देखील आढळलेले आहेत. जागतिक पातळीवर देखील डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतो. 2023 वर्षांमध्ये डेंग्यूची आजवरचे सर्वोच्च जागतिक रुग्णसंख्या नोंदवण्यात आली होती. या वर्षात जगातील देशामध्ये डेंग्यूचे 65 लाख रुग्ण आढळले तर डेंग्यूमुळे 7,300 मृत्यू जगभरात नोंदवण्यात आले.
पण बहुतेक मध्ये लक्षणे सौम्य असतात आणि त्यावर अनेक जण घेतात त्यामुळे प्रत्यक्षातला रुग्णांचा आकडा आज जास्त असण्याची शक्यता आहे. या भारत सरकारच्या आकडेवारीनुसार जून 2024 पर्यंत या वर्षी भारतात डेंग्यूचे 32091 तर यावर्षी आतापर्यंत 32 जणांचा डेंग्यूने मृत्यू झाला 2023 वर्षांमध्ये डेंग्यूचे दोन लाख 89 हजार 235 रुग्ण आढळले होते आणि आकार 485 जणांचा मृत्यू झाला होता.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेंग्यूच्या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर 4 ते 10 दिवसांनी लक्षणे दिसायला लागतात आणि पुढच्या दोन ते चार दिवस त्यातही प्रचंड दिसतात. त्यामध्ये पोटदुखी, उलट्या होणे, धाप लागणं, हिरड्यांमधून रक्त येणे, थकवा, उलटी किंवा रक्तस्राव अशी काही गंभीर लक्षणे असतात ती ताप येऊन गेल्यानंतर दिसतात. त्यामुळे निदान व्हायला वेळ जातो, अशा लोकांना खरं तर तातडीने उपचार मिळणे गरजेचं असतं.
तर कोविड विरोधातली लस तयार करणारी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट या देखील आता डेंग्यूची लस विकसित करण्याचा प्रयत्न करतात. तर डेंग्यूवरची लस विकसित करण्यासाठी जपानच्या भारतातल्या या कंपन्यांनी करार केलेला आहे.