परवा केरळमध्ये 14 वर्षांचा एक मुलगा तळ्यामध्ये पोहोचल्यानंतर आजारी पडला. त्याच डोकं दुखत होतं आणि त्यांला उलट्या होत होत्या. या आजारपणात त्याचा मृत्यू झाला. गेल्या काही महिन्यांमध्ये मधला तिसरा मृत्यू आहे. या मृत्यूमागचं कारण म्हणजे मेंदू पोखरणारा एक अमिबा आहे. हा अमिबा असे मृत्यूचे कारण आहे? आज आपण समजून घेणार आहोत.
तुमच्या शाळेतील विज्ञानाचे पुस्तक आठवा. त्यामध्ये अमिबा हा एकपेशीय सूक्ष्मजीव असतो तो साध्या डोळ्यांना कधीच दिसत नाही. त्याचा आकार कसाही असू शकतो आणि तो सूक्ष्मदर्शक म्हणजे मायक्रोस्कोपने आहे. मेंदू पोखरणाऱ्या या अमिबाचे नाव ब्रेन एटिंग अमिबा असे आहे. तळे, नदी किंवा काव्यातला गढूळ पाण्यामध्ये किंवा चिखलाचा पाण्यात हा अमिबा असल्याचे सांगितले जात आहे.
पाण्यात पोहल्यामुळे किंवा उडी मारल्यामुळे हा अमिबा नाकावाटे शरीरात जातो आणि संसर्ग होतो. स्विमिंग पूल किंवा वॉटर पार्कच्या पाण्यात पुरेश क्लोरीन नसेल तर असा संसर्ग त्या पाण्यातून सुद्धा होण्याची शक्यता असते. दरम्यान, केरळमध्ये नोंदवण्यात आलेल्या ब्रेन एटिंग अमिबाच्या मृत्यूंमध्ये तिन्ही मुलं पाण्यात पोहून आल्यानंतर त्यांना त्रास झाला.
नेगलेरिया नावाचा म्हणजे ब्रेन एटिंग अमिबा शरीरात गेल्यामुळे प्राइमरी मेनिंगोव्येन्सि हा संसर्ग होतो. हा संसर्ग मेंदू व मज्जासंस्थामध्ये होतो आणि त्यामुळे मेंदूला सूज येणे, ताप येतो आणि रुग्णाचा मृत्यू होतो असा केरळच्या कोळिकोड मधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या ब्रेन एटिंग अमिबा रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टरांनी सांगितलं आहे.
या ब्रेन एटिंग अमिबाच्या संसर्गाची लक्षणे काय असतात? ज्यामध्ये डोकेदुखी, मळमळ, उलट्या रोगांची प्राथमिक लक्षणे आहेत. तसेचमान आखडणं, गोंधळून जाणं, आजूबाजूच्या घटना किंवा व्यक्तींकडे लक्ष केंद्रित न करता येण? भास होणं, आकडी येणं ही मेंदू पोखरणारा अमिबा झपाट्याने पसरत असल्याची लक्षणे आहे.
हा संसर्ग वेगाने पसरतो आणि संसर्ग झाल्यापासून एक ते अठरा दिवसांमध्ये रुग्णाचा मृत्यू ओढवू शकतो असा अमेरिकन सरकारची मोठी संस्था सांगते. संसर्ग दुर्मिळ आहे. पण बहुतेकदा तो जीवघेणा ठरत असल्याचे म्हंटले आहे. तसेच हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होतं नाही या आजाराची साथ पसरत नाही. आता हा संसर्ग होऊ नये? म्हणून काय काळजी घ्यावी? चला तर जाणून घेऊ.
मेंदू पोखरणारा अमिबा हा नाकावाटे किंवा पाण्यातुन आपल्या शरीरात जात असतो. त्यामुळे काही गोष्टींचे भान राखलं तर हा दुर्मिळ संसर्ग टाळता येऊ शकतो. ज्या स्विमिंग पूलची स्वच्छता नीट राखलेली नाही तसेच पाण्याची पातळी कमी आहे? तिथे पोहू नका. तसेच स्विमिंग पूलमध्ये योग्य प्रमाणात क्रॉरिंग वापरला गेलाय का? हे तपासा.
नाकात पाणी जाऊ नये म्हणून पाण्यात सूर मारला, उडी मारणं अशा गोष्टी टाळा. तसेच हा ब्रेन एटिंग अमिबा पाण्याचा तळाशी असलेल्या चिखलात सुद्धा असतो त्यामुळे अशा पाण्यात पोहू नका किंवा तळाचा तो थर ढवळला जाईल असं काही करु नका. जलनीती क्रिया करण्यासाठी उकळलेलं पाणी वापरा आणि त्यावरचा प्रभावी उपचारांसाठीचा संशोधन अजूनही सुरू आहे. हा संसर्ग झाल्यानंतर सुद्धा बचावलेल्याची संख्या अगदी तुरळक आहे.