लाडका भाऊ या योजनेमागील खरा उद्देश काय? जाणून घ्या!!

बातम्या

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा माझी लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ या योजनेची सुद्धा घोषणा सुद्धा घोषणा केली आहे. अर्थसंकल्पातही योजना जाहीर करण्यात आलेली होती मात्र याचा उल्लेख आता एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजना आता केलेला आहे.

ज्यामध्ये बारावी झाला आहे त्याला 6 हजार रुपये महिन्याला आणि तसेच आयटीआय, डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये आणि पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये दरमहा दिले जाणार आहेत. नेमके योजना काय आहे? याची पात्रता काय आहे? हे जाणून घेऊया.
युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत सरकार संकेत स्थळावर राज्यभरातील काही आस्थापना, काही कारखाने किंवा कंपन्या यांना रोजगारासाठी उमेदवार हवे आहेत, अशांची भरती करू शकता की, प्रशिक्षण योजना आहे.

या प्रशिक्षण योजनेअंतर्गत बारावी, आयटीआय, डिप्लोमा पदवी किंवा पदव्युत्तर विद्यार्थ्यांची भरती केली जाणार आहे हे उपक्रमांतर्गत एक संकेतस्थळ तयार करण्यात आलेला आहे. ज्यांच्या माध्यमातून रोजगार देणारे आणि ज्यांना रोजगार हवा आहे असे उमेदवार सुद्धा जोडले जाणार आहेत असं सरकारचं म्हणणं आहे.

मात्र यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे योजना विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी किंवा त्यांच्या स्किल डेवलपमेंटसाठी आहे. बारावी, आयटीआय, पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले ते इच्छुक उमेदवार आहेत हे ऑनलाईन नोंदणी करू शकतात. त्यानंतर उमेदवारांची किमान वय 18 वर्ष हवं तर कमाल वय 35 वर्षे हवं.

तसेच संबंधित उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्याच्याकडे आधार क्रमांक असावं. त्याच्याकडे बँक खात आधारशी संलग्न असलं पाहिजे, तर दुसऱ्या बाजूला ज्या कंपन्या यासाठी नोंदणी करणार आहेत, त्यांना सुद्धा काही पात्रता असल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार संबंधित कंपनी तीन वर्ष जुनी असावी.

तसेच संबंधित आस्थापना किंवा कंपनी किंवा कारखाना रोजगार त्यांनी किमान 20 रोजगार दिलेलं असावेत, अशी सरकारची अट आहे. त्या संबंधित कंपनीने किंवा आस्थापने कौशल्य रोजगार उद्योजकता या विभागाच्या संकेत स्थळावर नोंदणी केलेली असावं. तसेच वेगवेगळ्या प्रमाणपत्र आवश्यक आहेत जी उद्योगांसाठी किंवा या कंपन्यांसाठी ही सुद्धा संबंधित कंपनीकडे असली पाहिजे.

आणि सरकार जे विद्यावेतन देणार आहे त्याचा कालावधी 6 महिन्यांचा असणार आहे. जर विद्यार्थी शिक्षण घेत असेल म्हणजे एखादा बारावीचा विद्यार्थी असेल आणि तो पुढचं शिक्षण घेत असेल आणि सोबत असल्याने या प्रशिक्षणासाठी जर अर्ज केला तर त्याला मात्र विद्यापीठांचे आहे ते लागू होणार नाही, असे या योजनेमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत होती की, सरकारने केवळ लाडक्या बहिणीसाठी किंवा महिला मतदारांसाठी योजना आणली आहे किंवा त्यांना लक्षात घेऊन सरकार काम करत आहे. तर त्याला कुठेतरी एक प्रत्युत्तर देत सरकारने कार्य प्रशिक्षण योजनेला आता लाडका भाऊ म्हणण्यास सुरुवात केलेली आहे. पुढच्या 2 ते 3 महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर आहेत त्यांमुळ या निवडणुका तोंडावर आहेत तेव्हा सरकारकडून वेगवेगळ्या वयोगटातील मतदारांना कुठेतरी खूश करण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी टीका आता विरोधकांकडून केली जाते आहे.