नातवाचा व नातीचा आजोबांच्या संपत्तीवरील अधिकार ।। आजोबांच्या मालमत्तेत नातवंडांच्या हक्काबाबत मोजकी व महत्वाची माहिती !

शेती शैक्षणिक

मित्रांनो आज आपण नातवांचा आजोबांच्या संपत्तीवर चा अधिकार या बद्दल जाणून घेऊ मग ती संपत्ती वडिलोपार्जित असो किंवा स्व कमाईचे असो, याबाबतची सविस्तर माहिती आपण आज घेणार आहोत. नातवांचा आजोबांच्या संपत्तीवर अधिकार नसतो जर ती मिळकत किंवा प्रॉपर्टी आजोबांची स्वता कमावलेली असेल हे कायदेशीर रित्या सत्य आहे.

कारण की जर ती संपत्ती आजोबांनी स्वतः कमावाली असेल तर ती नंतर कुणाला द्यायची याचा कायदेशीर रित्या अधिकार आजोबांना आहे. जर त्यांना ती त्यांनी कमावलेली संपत्ती त्यांच्या मुलाला द्यायची नसेल तर कायदेशीर रित्या त्या संपत्ती वर मुलाचा काहीच अधिकार नसतो. त्यामुळे नातवांचा देखील त्यावर अधिकार राहत नाही.

आजोबा त्या संपत्तीचे विल्हेवाट कशी लावायची किंवा ती कुणाला दान द्यायची याचा निर्णय घेऊ शकतात. मित्रांनो कायदेशीर रित्या अशी धारणा आहे की आजोबांच्या संपत्तीवर नातवांचा अधिकार हा असतोच असतो पण हे पूर्ण सत्य नाही. तर मग कायदेशीर रित्या आजोबांच्या कोणत्या संपत्तीवर नातवांचा अधिकार असतो.

ते अगदी सरळ आणि सोप्प्या मार्गाने टप्प्या टप्प्याने आपण या लेखात पाहू. मित्रांनो संपत्ती ही दोन प्रकारची असते: १.स्वतः कमावलेली संपत्ती. २.वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे ही वाडवडिलांकडून आलेली असते. या पैकी कुठल्या ही प्रकारची संपत्ती ही नातवाला डायरेक्ट मिळत नाही तर त्यासाठी दोन नियम आहेत.

१.वडिलांच्या मृत्यूनंतर २.आजोबांनी मृत्यूपत्र केले असेल तर, असे मृत्यूपत्र जे आजोबांनी नातवाच्या नावाने केले असेल किंवा संपत्ती नातवाला मिळावी असे केले असेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आजोबांना मृत्यूपत्र करण्याचा अधिकार तेव्हाच असतो जर ती संपत्ती त्यांनी स्वतः कमावलेली असेल पण जर ती संपत्ती वडिलोपार्जित असेल तर मात्र आजोबा मृत्यूपत्र करू शकत नाहीत.

जर वडील हयात आहेत आणि आजोबांची संपत्ती ही स्वतः कमावलेली असेल तर ती डायरेक्ट नातवाला मिळणार नाही तर वडिलांद्वारे नातवाला मिळेल. अश्या संपत्तीवर नातू जबरदस्ती हक्क गाजवू शकत नाहीत किंवा हिस्सा मागू शकत नाहीत कारण ती संपत्ती कुणाला द्यायची याचा संपूर्ण अधिकार आहे.

आजोबांना जर ती प्रॉपर्टी नातवाला द्यायची नसेल किंवा त्यांच्या मुलाला देखील द्यायची नसेल तर ती कुणाला दान करायची याचा पूर्ण अधिकार आजोबांना आहे. जर आजोबांची संपत्ती ही वडिलोपार्जित असेल आणि वडिलांचा मृत्यू झाला असेल तर मात्र त्यावर कायदेशीर रित्या संपूर्ण अधिकार हा नातवांचा असतो. अशी संपत्ती वारसा हक्काने नातवाला मिळते.

पण आजोबांची संपत्ती ही स्वतः कमावलेली असेल पण आजोबांनी मृत्यूपत्र केलेच नसेल तर मात्र त्यांच्या मृत्यूनंतर ती संपत्ती वडीलांद्वारे नातवाला मिळते. जर आजोबांची संपत्ती ही स्वतः कमावलेली असेल आणि त्यांनी मृत्यूपत्रात नातवाला हिस्सा देण्यासंदर्भात उल्लेख केला नसेल तर मात्र नातवाला त्या संपत्तीत काहीही अधिकार उरत नाही.

1 thought on “नातवाचा व नातीचा आजोबांच्या संपत्तीवरील अधिकार ।। आजोबांच्या मालमत्तेत नातवंडांच्या हक्काबाबत मोजकी व महत्वाची माहिती !

Comments are closed.