निवडणुकीच्या काळात मतदान केंद्र कसे ठरविले जाते??

बातम्या कायदा

निवडणुकीच्या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा असतो तो मतदानाचा दिवस. मतदार या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत देतात, पण मतदान केंद्र कुठे असतील? ते कसं ठरवलं जातं. पोलिंग स्टेशन आणि पोलिंग बुथमध्ये काय फरक असतो? तसेच मतदानाच्या आधी तिथे अधिकारी काय तयारी करतात? हे जाणून घेऊया..

मतदान केंद्र म्हणजे अशी एखादी इमारत किंवा जागा तिथे मतदान केलं जातं. या पोलिंग स्टेशनमध्ये वेगवेगळ्या खोल्यांमध्ये पोलिंग बूथ असतात. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मध्ये मतदान केंद्रांविषयी काही तरतुदी केलेल्या आहेत. 2020 सालचा नियमानुसार मतदारसंघातील जास्तीत जास्त पंधराशे मतदारांसाठी एक मतदान केंद्र असायला हवं.

आणि कुठल्याही मतदाराला मत देण्यासाठी साधारण दोन किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करावा लागू नये. त्यामुळे मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये किंवा उत्तर प्रदेशासारख्या जास्त लोकवस्तीच्या राज्यांमध्ये भरपूर मतदान केंद्र दिसून येतात, तर ग्रामीण भागात त्यांच्या तुलनेने त्यांची संख्या कमी असते.

याशिवाय, मतदान केंद्र कोणत्या इमारतीमध्ये असावे हे कसे ठरविले जाते? यामध्ये प्रामुख्याने मतदान केंद्र साधारणपणे सरकारी किंवा निमसरकारी इमारतीचा मतदान केंद्र म्हणून वापर केला जातो, अशा पक्या इमारती सुरक्षेच्या दृष्टीने निवडल्या जातात. काही वेळा गावातलं सार्वजनिक सभागृह किंवा कम्युनिटी सेंटर अशा इमारतींचा वापर ही मतदान केंद्र म्हणून दिला जाऊ शकतो.

पण पोलीस स्टेशन, हॉस्पिटल मंदिर किंवा धार्मिक स्थळ अशा जागांचा वापर मतदान केंद्र म्हणून केला जाऊ नये असे नियमामध्ये सांगते जाते. तसेच मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात कुठलही राजकीय पक्षाच्या कार्यालयात नसावे असा नियम आहे. जिल्हा न्यायदंडाधिकारी ही त्या जिल्ह्याची निवडणूक अधिकारी असते.

तर हे जिल्हा निवडणूक अधिकारी मतदान केंद्र विषयी निर्णय घेतात. पण त्यांनी या केंद्रासाठी निवडणूक आयोगाकडून मान्यता घेणं आवश्यक असते. तसेच देशात अगदी दुर्गम भागातील लोकांनाही मतदान त्यासाठी कधीकधी जंगलात डोंगरावरही मतदान केंद्र उभारली जातात. त्यासाठी अधिकाऱ्यांना दूरवर प्रवास करून जावे लागू शकत.

कधी कधी अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच मतदारांसाठी अधिकारी दोनशे ते तीनशे किलोमीटरचा प्रवास करतात. 2019 च्या निवडणुकीत गुजरातचा गीरच्या जंगलातून लडाखमध्ये, हिमालयात ट्रेक करून आणि अंदमान मधल्या बेटावर दलदलीतुन वाट काढत अधिकाऱ्यांना जावे लागले होते. त्यामुळे अशा दुर्गम जागी जाताना मतदान अधिकारी यांना बरीच तयारी करावी लागते.

भारतात निवडणूक आयोग असला तरी त्यांच्याकडे निवडणुका घेण्यासाठी कुठलीही स्वतंत्र यंत्रणा आणि कर्मचारी अधिकारी नसतात. तर शिक्षक, पोलीस असे सरकारी कर्मचारी निवडणूक काळात आयोगासाठी काम करतात. मतदान यंत्र मतदान केंद्रावर सुरक्षित नेणं आणि मतदानाच्या दिवशी मतदारांची पडताळणी करणं. मतदान केंद्रांची सुरक्षा, मतमोजणी इत्यादी कर्तव्यही कर्मचारी पार पाडतात.

मतदानासाठी आता यंत्राचा वापर केला जातो. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात EVM ही यंत्र बॅटरीवर चालतात म्हणजे जिथे वीज पुरवठा नाही अशा ठिकाणी मतदानासाठी जाऊ शकतात.
या केसेस निवडणूक आयोगाचा शिक्का आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या सही आणि शिक्का सह जमा केल्या जातात. आधीच निश्चित मतमोजणी केंद्रावर मतदान यंत्र नेलीजातात.मतमोजणीच्या दिवशी ही पुन्हा उघडली जातात.