दोन गुंठे क्षेत्रफळाचा बक्षीस पत्र करता येईल का? ।। मुलीच्या लग्नानंतर वडिलांच्या जमिनीवर किंवा मालमत्तेवर मुलीचा हक्क असतो का? ।। एखाद्या ठिकाणच्या बांधकामावर स्टे आहे आणि त्या बांधकामामध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्ती करता येते का? ।। मृत्युपत्र नोटरी करून चालतं का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखातून !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

पहिला प्रश्न दोन गुंठे क्षेत्रफळाचा बक्षीस पत्र करता येईल का? उत्तर: आता जेव्हा आपल्याला दोन गुंठे, चार गुंठे अश्या क्षेत्रफळाचा बक्षीस पत्र, खरेदी खत किंवा इतर प्रकारे हस्तांतरण करायचं असतं, तेव्हा आपल्याला बाकी सगळ्या कायदेशीर तरतुदींसोबत तुकडेबंदी, तुकडेजोड कायदा याचा सुद्धा विचार करायला लागतो.

कारण तुकडेबंदी आणि तुकडेजोड कायदा जिथे जिथे लागू आहे. त्या त्या ठिकाणी एका ठराविक आकारापेक्षा लहान तुकडा पडण्यास मनाई असते. सहाजिकच जिथे तुकडेबंदी, तुकडेजोड कायदा लागू असेल तिथे त्या ठराविक आकारापेक्षा लहान आकाराचा तुकडा पडेल अशा प्रकारचा हस्तांतरण करण्यास मनाई असते.

म्हणूनच आपल्याला ज्या जमिनीच हस्तांतरण करायचं आहे. ती जमीन जिथे आहे तिथे तुकडेबंदी, तुकडेजोड कायदा लागू आहे का, लागू असेल तर तिथे क्षेत्रफळाची मर्यादा काय आहे, याची माहिती आपल्याला मिळणं अत्यंत आवश्यक आहे. एकदा का तुकडेबंदी, तुकडेजोड नुसार निश्चित क्षेत्रफळाचे आपल्याला माहिती मिळाली की आपला व्यवहार त्या क्षेत्रफळाशी आपण सुसंगत केला तर आपल्याला तो व्यवहार करता येतो.

हस्तांतरण करता येत. मात्र तुकडेबंदी, तुकडेजोड कायद्याने निश्चित जी मर्यादा आहे त्याच उल्लंघन होईल अशा प्रकारच हस्तांतरण किंवा व्यवहार आपण करू नयेत. कारण असा कोणताही व्यवहार, गैर आणि बेकायदेशीर ठरण्याची दाट शक्यता असते.

म्हणून कोणत्याही ठिकाणी अशा तुकड्याचे व्यवहार करताना आधी तिथे तुकडेबंदी कायदा लागू आहे का, आणि लागू असेल तर त्याची मर्यादा किती आहे, याची माहिती मिळवावी आणि मगच आपण आपला व्यवहार किंवा हस्तांतरण जे आहे ते पुढे न्याव.

दुसरा प्रश्न मुलीच्या लग्नानंतर वडिलांच्या जमिनीवर किंवा मालमत्तेवर मुलीचा हक्क असतो का? उत्तर: सगळ्यात पहिले एक लक्षात घेतले पाहिजे की मुलीचा वडिलांच्या जमिनीवर किंवा मालमत्तेतील हक्क याचा आणि त्या मुलीच्या लग्नाचा काहीही संबंध नाही. मुलीचे लग्न झाल्याने किंवा न झाल्याने तिच्या मालमत्तेच्या अधिकारांमध्ये, विशेषता वडिलांच्या मालमत्तेच्या अधिकारांमध्ये काहीही फरक पडत नाही.

आता ज्या मालमत्तेचा आपल्याला अधिकार आहे किंवा नाही हा विचार करायचा आहे. ती मालमत्ता मुख्यतः कशी आहे, तो आधी आपण विचार करायला हवा. म्हणजे समजा वडिलांची जर स्वकष्टाची मालमत्ता असेल तर त्या मालमत्तेमध्ये मुलीला थेटपणे काहीही हक्क प्राप्त होत नाही.

जोवर वडील हयात आहेत तोवर ते त्या मालमत्तेचा काहीही करू शकतात. तसंच त्यांच्या निधनापूर्वी जर त्यांनी मृत्यूपत्र करून ठेवलं आणि त्या मृत्यू पत्रानुसार समजा एखाद्या मुलीला हक्क किंवा हिस्सा काहीही लाभ मिळाले नाही, तरी अशा मृत्युपत्राला आव्हान देणं सुद्धा काहीस कठीण आहे.

कारण स्वकष्टार्जित मिळकतीच्या बाबतीत काहीही निर्णय घेण्याचे अधिकार मालकाला पूर्णपणे असतात. मात्र ती जर मालमत्ता वडिलोपार्जित असेल तर मात्र त्या मुलीला त्या मालमत्तेमध्ये स्वतंत्र, अविभाजित, समान हक्क आणि हिस्सा निश्‍चितपणे मिळतात. तो हक्क किंवा हिस्सा तीच लग्न होण्यावर किंवा न होण्यावर निश्‍चितच अवलंबून नसेल.

तिसरा प्रश्न एखाद्या ठिकाणच्या बांधकामावर स्टे आहे आणि त्या बांधकामामध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्ती करता येते का? उत्तर: आता जेव्हा आपण स्टे किंवा मनाई हुकूम अस म्हणतो, तेव्हा त्याचे अनेक अर्थ निघू शकतात. आणि प्रत्येक प्रकरणाच्या एकंदर परिस्थिती नुसार या स्टे ऑर्डरमध्ये बद्दल सुद्धा होऊ शकतो.

त्यामुळे एखाद्या स्टे ऑर्डर मध्ये नक्की कशाला मनाई करण्यात आलेली आहे, हे जोवर आपण लक्षात घेत नाही तोवर आपल्याला काय करता येईल आणि काय करता येणार नाही, या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळू शकत नाही. सहाजिकच जी स्टे ऑर्डर आपल्या किंवा आपल्या मालमत्तेचे संदर्भात करण्यात आलेली आहे.

त्याचा आपण सर्वप्रथम वाचन केले पाहिजे आणि जर आपल्याला जर त्याच आकलन होत नसेल तर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तींच्या मदतीने, त्या स्टे ऑर्डरनुसार नक्की कशाला स्टे आहे किंवा कशाला मनाई करण्यात आली आहे हे समजून घेतलं पाहिजे. कारण स्टे ऑर्डर मध्ये जे नमूद केलेलं असतं तेवढ्यापुरताच तो मनाईहुकूम किंवा स्टे ऑर्डर असतो.

समजा एखाद्या बांधकामाच्या विक्रीकरता मनाई करण्यात आली असेल, तर आपल्याला त्याची विक्री करता येणार नाही. मात्र त्याची दुरुस्ती करणे याला काहीही अडचण नाही. पण बरेचदा काय होतं की एखाद्या प्रकरणांमध्ये स्टे चा अर्ज चाळण्याच्या आधी स्टेटसकोप म्हणणे जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा आदेश येतो.

आता जेव्हा स्टेटसकोप किंवा जैसे थे चा आदेश होतो, तेव्हा त्या मालमत्ते संदर्भात कोणताही बदल आपल्याला करता येत नाही. मात्र जर परिस्थिती अशी असेल की एखाद बांधकाम जर धोकादायक झालेलं आहे किंवा धोकादायक होण्याची संभावना आहे. आणि त्याच्यावर जर स्टेटसकोप ऑर्डर असेल तर आप त्या परिस्थितीच्या आधारे न्यायालयाकडे किमान त्या बांधकामाच्या दुरुस्ती करता परवानगी मागू शकतो.

आणि जर आपण आपल म्हणणं गुणवत्ते वर सिद्ध केलं तर स्टेटसकोप किंवा स्टे ऑर्डर असताना सुद्धा त्याबंधकामाच्या डागडुजी किंवा दुरुस्ती करता परवानगी आपल्याला मिळू शकते. मात्र त्याच्या करता आपल्याला ज्या न्यायालयाने स्टे दिलेला आहे, त्या न्यायालयामध्ये सविस्तर अर्ज करणे आणि तो अर्ज मंजूर करून घेवून परवानगी घेणं अत्यंत गरजेच आहे.

चौथा प्रश्न मृत्युपत्र नोटरी करून चालतं का? उत्तर: आता मृत्युपत्र हा तसा खूप मोठा विषय आहे. आता मृत्युपत्र नोटरीचा जर आपण विचार केला, तर नोंदणी कायद्यानुसार मृत्युपत्राची नोंदणी करणे हे बंधनकारक नाही. म्हणजे आपल्याला जर मृत्युपत्र करायचा असेल तर त्यातल्या बाकी सगळ्या कायदेशीर तरतुदींचे आपण पूर्तता केली की पुरेसं होतं.

सहाजिकच बाकी सगळ्या कायदेशीर तरतुदींचे, उदाहरणार्थ मेडिकल सर्टिफिकेट, विटनेस, या सगळ्याची जर आपण पूर्तता करत असेल तर ते मृत्यू पत्र नुस्त लिहून ठेवण किंवा मृत्युपत्र नोटरी करून घेणं यामध्ये काहीही अडचण नाही. समजा त्या मृत्युपत्राच्या अंमलबजावणीच्या वेळी वाद निर्माण झाला, तर तो वाद अंतिमतः : न्यायालयात जाणार आहे.

एखादे मृत्युपत्र नोंदणीकृत आहे, नोंदणीकृत नाही, नोटरी आहे किंवा नोटरी नाही याचा वाद न्यायालयात जाण्यावर काहीही फरक पडणार नाही. म्हणूनच आपण मृत्युपत्र नोटरी करायचं किंवा नाही करायचं, नोंदणीकृत करायचं किंवा नाही करायचं, याचा निर्णय प्रत्येक व्यक्ती आपापल्या एकंदर परिस्थितीच्या अनुषंगाने घेऊ शकते. आणि त्या प्रकारे कृत्य करू शकते. ही माहिती नक्कीच आपल्या उपयोगाची असेल.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.