प्रत्येक शेतकऱ्यासाठी दैनंदिन जीवनात लागणारी माहिती ।। तलाठी मंडळ निरीक्षक व मंडळ अधिकारी त्यांची कर्तव्ये याबद्दल अतिशय महत्वाची माहिती जाणून घ्या !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

मंडळ निरीक्षक व मंडळ अधिकारी त्यांची कर्तव्ये: 1.मंडळ निरीक्षक हा आपल्या मंडळातील तलाठ्यांना त्यांच्या सर्व कर्तव्यांचे प्रशिक्षण देण्याला जबाबदार राहील. 2.तलाठी सर्व नियमांचे व आदेशांचे पालन करीत असल्याबद्दल मंडळ निरीक्षकाने खात्री करून घ्यावी व एखादे गंभीर उल्लंघन असल्यास त्यासंबंधी प्रतिवेदन करावे. 3.सर्व तलाठी आपापला सजा मधील मुख्यालयात कायम वास्तव्य करीत असल्याचे पाहण्यास मंडळ निरीक्षक जबाबदार राहील.

एखादा तलाठी तसा राहत नसल्यास मंडळ निरीक्षकाने त्या बाबतीतील आवश्यक त्या कार्यवाहीसाठी तहसीलदाराला कळवावे. 4.जे तलाठी आपल्या कर्तव्य पालनात निष्काळजी किंवा दीर्घसूत्री आहेत अथवा जे अनारोग्य, वृद्धावस्था किंवा इतर कारणांमुळे आपल्या कर्तव्याची योग्य रीतीने पालन करण्यास अयोग्य आहेत असे मंडळ निरीक्षकाला वाटते अशा तलाठ्यांची नावे कळविण्यात यावी.

5.तालुका अभिलेख कक्षामध्ये अभिलेख करण्यासाठी अग्रेषित करणे आवश्यक असलेले आपले सर्व अभिलेख तलाठ्यांना अग्रेषित केले असल्याचे पाहण्याची दृष्टीने मंडळ निरीक्षकाने तलाठ्याच्या दप्तराची तपासणी करावी. 6.मंडळ निरीक्षकाच्या प्रत्येक भेटीची किंवा तपासणीची नोंद तलाठ्याच्या दैनंदिनित किंवा भेटनोंद पुस्तकांत त्याचप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या दैनंदिनीतही घेण्यात यावी.

7.मंडळ निरीक्षकाला तपासणी व पर्यवेक्षण याविषयी त्यांच्या मंडळातील त्याला त्यांच्याबाबतीत पूर्ण शक्ती असते. 8.सर्वसाधारणपणे मंडळ निरीक्षकानी वर्षभरात आपल्या मंडळातील प्रत्येक गावातील संपूर्ण तपासणी करावी परंतु मंडळाच्या आकारामुळे किंवा इतर कारणांमुळे संपूर्ण वार्षिक तपासणी करणे शक्य नसेल तर प्रत्येक वर्षी मंडळ निरीक्षक आपल्या मंडळातील गावांची तपासणी पुरेशा संख्येने करीत असल्याचे तसेच दोन वर्षाच्या कालावधीत प्रत्येक गावाची तपासणी पूर्ण केल्याचे पाहण्यास तहसीलदार जबाबदार आहे.

9.मंडळ निरीक्षकाने तलाठ्याला ठेवलेल्या गाव नमुन्यांची तपासणी करताना तलाठी अचूक मागणी करतो,जमीन महसूल देण्यास जबाबदार असणाऱ्या व्यक्ती कडून ती वसूल करतो, ती वसुलीचे हिशोब योग्य रीतीने व अचूक ठेवतो व सामान्य प्रशासनाला आवश्यक असलेली माहिती अचूकपणे गोळा करतो याची खात्री करून घ्यावी.

10.जमीन महसूल व जमीन महसूल म्हणून वसुली योग्य असलेले इतर रकमा गोळा करण्यावर मंडल निरीक्षकाने लक्ष ठेवावे व अनाधिकृत थकबाकी शिल्लक राहत नसल्याची खात्री करून घेण्याच्या दृष्टीने अशा रकमा गोळा करण्याच्या कामी त्याला साहाय्य करावे व वसुलीच्या रकमा नुसार योग्य रीतीने केला जात असल्याबद्दल खात्री करून घ्यावी यासाठी त्याने तोंडी तपासणी करून व खातेवही ताडून पाहून पुढच्या पावत्या ची चाचणी दाखल तपासणी करावी.

11.अ) प्रत्येक फेरफार नोंद योग्य रीतीने व अचूकपणे करण्यात येत असल्याची खात्री करून घेण्यासाठी मंडळ निरीक्षकांनी प्रत्येक फेरफार नोंद तपासून पहावी व फेरफाराची फेरफार यांच्या नोंदवहीतील अशा प्रत्येक फेरफारावर अद्याक्षरे करावी तथापि वादग्रस्त नसलेल्या नोंदी त्याने नियमानुसार प्रमाणित कराव्यात.

ब) तलाठी फेरफार यांच्या नोंदवहीत फेरफार नोंद झाल्यावर लगेच गाव नमुना 7 मध्ये पेन्सिलीने त्यासंबंधीची नोंद घेत असल्याची तसेच अशा फेरफार प्रमाणित करण्यात आल्यावर लगेच ती नोंद शाईने करीत असल्याची ही मंडळ निरीक्षकाने खात्री करून घ्यावी. क) सर्व हितसंबंधी व्यक्तींना फेरफार यांची लेखी सूचना देण्यात येत असल्याची मंडळ निरीक्षकाने खात्री करून घ्यावी त्याने तपासण्याचे काम झाल्यानंतर अशाप्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटिशीवर योग्य तो शेरा द्यावा.

ड) मंडळ निरीक्षक हा जेव्हा मंडळ अधिकारी असेल तेव्हा त्याने सर्व फेरफार नोंदी प्रमाणित करण्यात व सर्व वादग्रस्त प्रकरणे व वारसा प्रकरणे निकालात काढावेत. 12.मंडल निरीक्षकाने जमिनीच्या सर्व तुकड्यांची फेरफार यांच्या नोंदी योग्यरितीने नोंद घेण्यात आली असल्याची तसेच संबंधित व्यक्तींना विहीत नमुन्यातील नोटिसा देण्यात आल्या असल्याची खात्री करून घ्यावी.

13.संबंधित कुळवहिवाट कायदा व मुंबई अखंड प्रतिबंध व धारण जमिनीचे एकत्रीकरण अधिनियम यामधील उपबंध यांचे उल्लंघन करून केलेल्या व्यवहारांची फेरफार नोंदवहीत योग्य रीतीने नोंद करून आवश्यक त्या पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक ती प्रत तहसीलदार यांना सादर करण्यात येत असल्याची मंडळ निरीक्षकाने खात्री करून घ्यावी.

14.मंडळ निरीक्षक गावात आल्याबरोबर भोगवटा खालील व बिन भोगवटा खालील भूमापन क्रमांक पद्धतशीरपणे तपासणीसाठी निवडेल. यामुळे प्रत्येक वर्षी पिकांच्या विविध जाती व पाच वर्षांमध्ये आळीपाळीने प्रत्येक क्षेत्र तपासणी खाली येईल हे तपासणीचे काम पार पाडीत असताना मंडळ निरीक्षकाने खालील गोष्टींची खात्री करून घ्यावी.

1.भोगवटदार व कुळे यांची नावे प्रत्यक्ष कब्जाशी जुळणारी आहेत. 2.उपविभागाच्या हिशोब योग्यरितीने ठेवलेला आहे. 3.एकच गाळा घरे बांधण्यात प्रतिबंध करण्याबाबतचा नियमांचे योग्य रीतीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. 4.भूप्रदान पट्टे व अकृषिक परवानगी यासंबंधीच्या शर्तीचे योग्य रीतीने पालन करण्यात येत आहे. 5.अतिक्रमणे व अनधिकृत वापर यांचा तपास लावण्यात आला आहे व त्यासंबंधी प्रतिवेदन पाठविण्यात आले आहे.

15.मंडल निरीक्षकाने विहित नमुन्यात दैनंदिनी ठेवावी व ती दर महिन्याला तहसीलदाराला सादर करावी. तहसीलदाराने स्वतः च्या शेऱ्यासाहित जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख यांच्यामार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवावी. उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्वतःच्या शेऱ्यात ती निरीक्षकाला परत पाठवावी.

ब)शेऱ्यासह दैनंदिनी परत मिळाल्यावर मंडळ निरीक्षक आणि तहसीलदार जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख व उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या शेऱ्याची आपल्या दैनंदिनीच्या कार्यालय प्रतीत नक्कल करून घ्यावी व नंतर शेऱ्यासह मिळालेल्या दैनंदिनी अभिलेखा साठी तहसिलदाराकडे पाठवावे. क)कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने निरीक्षणासाठी भेट दिली असता मंडळ निरीक्षकाने आपल्या दैनंदिन याची कार्यालय प्रत यांच्या अवलोकनार्थ दाखल करावी.

16.आवक-जावक पत्रव्यवहारासाठी मंडळ निरीक्षकाने विहित नमुन्यातील एकच नोंदवही ठेवावी व 1 ऑगस्ट रोजी तालुक्याच्या ठिकाणी व ती तालुक्याचे ठिकाणी त्या नोंदवही च्या पुस्तकांवर शिक्का मारून क्रमांक टाकावेत. 17.मंडळ निरीक्षकाने अनुसूची असलेली एक परिपत्रक फाईल ठेवावे.

18.मंडळ निरीक्षकाने आपल्या प्रभावाखाली सर्व शासकीय मालमत्तेचे नोंदवही ठेवावी व ती तपासणीसाठी व सहीसाठी कोणत्याही निरीक्षक अधिकाऱ्यांना सादर करावे. 19.मंडल निरीक्षकाने त्याला हाताळावे लागतील अशा रकमांचा हिशेब ठेवण्यासाठी विविध नमुन्यातील एक रोग पुस्तक ठेवावे.

20.मंडल निरीक्षकाने विहित नमुन्यातील पोस्टाच्या सरकारी तिकिटांची नोंदवही ठेवावी. 21.मंडल निरीक्षकाने आपल्या मंडळाच्या मुख्यालयात राहावे. 22.मंडल निरीक्षकाने सर्व अधिनियम नियम व स्थायी आदेशाद्वारे त्यांच्याकडे सोपवलेली सर्व कर्तव्य व कार्य पार पाडावीत.

आपली कर्तव्य पार पाडीत असताना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या सर्व आदेशाचे पालन करावे. तर अशा प्रकारे आपण आज मंडळ निरीक्षक व मंडळ अधिकारी त्यांची कर्तव्ये याबद्दल अतिशय महत्वाची माहिती जाणून घेतली. माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.