पोलीस भरतीसाठी उच्चशिक्षीत मुलांचे अर्ज येण्यामागचं कारण काय?

अर्थकारण शैक्षणिक

पहाटेच गावागावात दिसणारे चित्र म्हणजे पोलीस भरतीची तयारी करणारी पोर. पहाटेपासून भरती ची प्रॅक्टिस ला लागलेली असतात. त्यातला कॉमन चित्र म्हणजे भरपूर ही नुकतीच बारावी पास झालेली कसतरी BA पास झालेली किंवा एकाच दुसरा मुलगा पर्यंत 12 वीला पोहोचलेलं असतो. पण परवा आलेली बातमी तुफान व्हायरल झालेली बातमी होती. संभाजीनगर पोलीस भरतीसाठी एकूण 5 हजार 725 अर्ज आले. हे साडे पाच हजाराहून अधिक आलेले अर्ज फक्त 39 पदांसाठी असणाऱ्या जाहिरातीसाठी होय.

म्हणजे ल येथे पोलीस भरती होण्याची शक्यता आहे ती 0.006 टक्क्यांची. सध्या सगळ्यात सरकारी नोकऱ्यांमध्ये हे चित्र दिसतं. मात्र विषय आहे भरतीला उतरलेल्या मुलांच्या शिक्षणाची. कारण यामध्ये एकूण 40 % पोरांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतलेले एक जण बी एच एम एस डॉक्टर, 15 जण एमबीए झालेले, 40 जणांचा बीबीए/बीसीए झाले आलेल्या एकूण साडेपाच हजार जण पैकी 1661 उच्चशिक्षित मुलांचे म्हणजे सुमारे दीड हजार मुलांनी पदवी घेतलेले आणि हीच बातमी तुफान व्हायरल झालेली.

मात्र हे काही फक्त पोलीस भरतीसाठी घडत नाहीये. यापूर्वीदेखील तलाठी ग्रामसेवक अशा अनेक पदांसाठी उच्चशिक्षित डॉक्टर, इंजिनिअर मुलांचे अर्ज आलेले आहेत. बऱ्याचदा या चर्चा होतात आणि थांबतात. अनेकदा वरवरची प्रतिक्रिया म्हणून शिक्षणाला आता किंमतच उरली नाही असे डायलॉग सांगून विषय थांबवला जातो. पण नेमकं काय घडते. हा ट्रेंड आत्ताच आलोय मी बसू नका वर्ग-4 पदांसाठी उच्चशिक्षित उमेदवार येत आहेत. पोलीस भरती असो ग्रामसेवक तलाठी अशा ठिकाणी उच्चशिक्षित उमेदवारांनी अर्ज करण्याचा ट्रेंड पहिले पासून आहेत. कधी कधी अशी बातमी होते आणि विषय चर्चेत येतो. पण हे सगळं नेमकं काय घडतं?

त्यातला सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे पगार आणि ग्रामीण भागातली प्रतिष्ठा होय. इंजिनियर झालेल्या मुलाला सर्व साधारण 20 ते 25 हजारांपासून पगार सुरू होतो. काही ठिकाणी जास्त असतो तर काही ठिकाणी कमी असतो. आपण बोलतोय ते सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील तालुका व जिल्हा पातळीवर पंधरा ते वीस वर्षांपासून वारलेल्या खासगी इंजिनिअरिंग कॉलेजमधून पासून होणाऱ्या मुलांबद्दल. तर इथून पास होणार यासाठी इतर नोकरीचे शक्यता खूपच कमी असते. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल मुलांसाठी नोकरीची शक्यता गेल्या काही काळात खूपच कमी झाले आहे. त्यात पगार असतो तो 10 ते 20 हजार आणि नोकरी मिळते ती पुण्या-मुंबईसारख्या महानगरात.

पुण्या-मुंबईत राहायचं असेल तर किमान 50 हजारांची नोकरी आवश्यक असते. तर गावाकडची किमान लाइफस्टाइल जगण्याची शक्यता असते. या उलट पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक झालं तर पगार याची सुरुवात पंचवीस ते तीस हजारांपासून होते. पोलीस भरती बाबतीत बोलायचं झालं तर भरती झाल्यानंतर पगार 30 हजारा असतो. 2013 9 वर्षांपूर्वी पोलीस शिपाई म्हणून भरती झाले त्यांचा आजचा पगारा 45 ते 50 हजारां आहे. प्रमोशन होऊन नोकरीच्या पूर्ण काळात शिपाई PSI पदापर्यंत मजल मारतो.

तरीही आजचा बेसिक 30 ते 35 हजार रुपये पगार इंजिनिअर झालेले 50 हजार कमावणारा मुलासोबत कम्पेअर केला तर तालुका व शहराच्या पातळीवर हा पगार पुरेसा असलेला दिसून येतो. पण उच्चशिक्षित मुलांसाठी फक्त पगार हे एकच कारण पुरेसं आहे का? तर नाही. दुसरं कारण आहे ते म्हणजे आजही असणारे सरकारी नोकऱ्यांचे महत्त्व. सरकारी नोकरी असणं म्हणजे माणूस मार्गी लागण. आजही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी कायम आहे, कारण म्हणजे सुरक्षितता होय.

ओपन मार्केटमधली स्पर्धा तिथलं स्थित्यंतर भविष्याची अनपेक्षित गोष्ट वाटते. त्यापेक्षा सर्वात जवळची वाटणारी गोष्ट असते ती म्हणजे सर्व सरकारी नोकरी म्हणजे वयाच्या रिटायरमेंट पर्यंत तुम्हाला खात्रीशीर पगार मिळणार. त्यातून भविष्याचे नियोजन करता येणार भविष्यात नोकरी जाईल, हे टेन्शन येत नाही. थोडक्यात ज्या व्यक्तीला नोकरी मिळते तू मार्गी लागतो असं म्हणण्याचा ट्रेंड कायम आहे.

तिसरं आणि महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे या पदांना असणारे प्रतिष्ठा. पोलीस तलाठी असणे व ग्रामसेवक तुलनेत वर्ग-3 व वर्ग-4 ची पद्धत मात्र तरीही या पदांना ग्रामीण भागांत प्रतिष्ठा थेट संपर्कात येणारी पद असल्याने एखाद्या सरकारी त्याप्रमाणेच गावगावात या पदांना प्रतिष्ठा आहे. जी प्रतिष्ठा डॉक्टर, इंजिनिअर झालेल्या मुलांना देखील महत्त्वाची वाटते. म्हणजे इंजिनियर होऊन पोलीस भरती झाला म्हणून घेण्यात कमीपणा वाटण्याचं काहीच कारण नाही. अगदी जवळून पाहिलं तर गेल्या 5 ते 6 वर्षात पुण्यात यूपीएससीसाठी आलेली अनेक मुलं-मुली तलाठी व ग्रामसेवक म्हणून परीक्षा देवून रुजू देखील झाले. हे देखील अशाच उच्चशिक्षित असलेल्या कॅटेगरीतली मधील मुलं आहेत, लक्षात घ्यायला हवं.

या पदांना असणारी गावगाड्यातील प्रतिष्ठा अशा पदांच्या भरती वेळी उच्चशिक्षित तरुणांना आकर्षित करून घेत असते आणि चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण आपली गंडलेली शिक्षण व्यवस्था होय. इंजिनियर झाला म्हणजे खरंच उच्चशिक्षित झाला का? डॉक्टर झाला म्हणजे करत उच्चशिक्षित झाला का? या प्रश्नाचे उत्तर खोलवर पहावं लागतं. आज अनेक कंपन्या समोरचा प्रश्न आहे तो योग्य असा वर्क फोर्स मिळत नाही. याचं कारण शिक्षण व्यवस्था अभ्यासक्रमांना दिलं जातं. एकतर अभ्यासक्रम बदललेला नाही. खासगी संस्थांमधून फी भरून लवकरात लवकर ऍडमिशन घेणे आणि तितक्याच लवकर डिग्री घेऊन मुलांना बाहेर पाठवाले जाते. अशा शिक्षण व्यवस्थेमुळे फक्त कागदावर शिक्षण असणाऱ्या मुलांची संख्या मोठी झाली.

ही मुले खासगी क्षेत्रातल्या स्पर्धेच्या जगात टिकाव धरून ठेवू शकत नाहीत. परिणामी पोलीस भरती असो की तलाठी ग्रामसेवक भरती अशा ठिकाणी उच्चशिक्षित तरुणांची फौज दिसते. फक्त अशाच मुलांचे अर्ज आले की बातमी होतात चर्चा रंगतात आणि पुन्हा विषय मागे पडतो.