श्रीमंत होण्याची ७ सूत्रे ।। आपल्या मानसिकतेचा आपल्या आर्थिक परिस्थितीवर कसा परिणाम होतो हे जाणून घ्या या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

रिकाम पाकीट आणि पैसे नसलेलं अकाउंट कुणालाही आवडत नाही. त्याउलट भरलेलं पाकीट आणि मोठमोठे आकडे असलेले अकाउंट हे आनंद देऊन जातं. आपल्याकडे पैसा असणं हीच एक मोठी सुखद भावना असते आणि तो पैसा आपल्याला समाजामध्ये मान-सन्मान मिळवून देतोच पण आपला आत्मविश्वास वाढतो.

याउलट तिजोरीमध्ये आणि अकाउंट मध्ये असलेल्या दुष्काळ आपले मनाची चलबिचल वाढवते, रात्रीची झोप मोडून टाकते आणि मोठमोठाले निर्णय घेण्यासाठी आपलं मन लवकर मानत नाही.पैशाची चणचण किंवा पैशाची कमी याचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी घेतलेला असतो. त्यामुळे हे रिकाम पाकीट आणि पैसे नसलेले अकाउंट या पासून स्वतःची कशी सुटका करून घ्यावी या विषयावर आज आपण इथे माहिती घेणार आहोत.

श्रीमंत कसं होता येईल आणि आपल्यापैकी सगळ्यांना श्रीमंत व्हायला आवडेल, आणि आवडतं. श्रीमंत होण्याची सूत्र आज आपण बघणार आहोत. काही सूत्रे आहेत जी आपल्याला लक्षात ठेवली लागतील. सात सूत्रांचा उल्लेख इथे केलेल्या आहे आणि ते जर तुम्ही फॉलो केले तर आपण नक्कीच आपली आर्थिक परिस्थिती बदलू शकता याबद्दल खात्री आहे.

मानसिकता : सर्वप्रथम आपल्याला आपला आपली मानसिकता बदलायची आहे. लहानपणापासून आपले पैशाबद्दल चे काही विश्वास आहे की पैसा कमवणे अवघड आहे, पैसा जर आला तर तो माणूस दुरावतो, पैशामुळे लोक आपल्या पासून दूर जातात किंवा पैसा आपल्याला चांगल्या मार्गाने कमवता येत नाही आणि जितक्या लवकर आपण पैसे कमवतो एवढा तो लवकर निघून जातो,

आणि हे जे विचार आहे तेच आपल्याला पैसा कमावण्यासाठी प्रतिबंध करत असतात. म्हणून ते आपले विचार आहेत ते बदलणं खूप महत्त्वाचा आहे. आपली मानसिकता बदलणे खूप महत्वाचा आहे जितकं तुम्ही पैशाबद्दल प्रेम व्यक्त करायला लागाल, तुम्ही पैशाबद्दल आकर्षण दाखवायला लागलं तेवढाच फास्ट तुमच्याकडे पैसा यायला लागतो.

एखादी व्यक्ती जर श्रीमंत झाली असेल तर त्या व्यक्तीबद्दल रिस्पेक्ट दाखवायला सुरुवात करा, त्या व्यक्तीच्या कष्टाबद्दल कौतुक करायला सुरुवात करा. त्यांनी कमावलेला पैसा बद्दल आदर व्यक्त करायला सुरुवात करा. तर त्या पैशाला ही जाणीव होईल की या व्यक्तीला सुद्धा श्रीमंती आवडते. या व्यक्तीला सुद्धा पैसा आवडतो मी त्याच्याकडे गेलो पाहिजे आणि म्हणून तुमचा माईंड सेट हा मनीमाईंड सेट करा. पैशाबद्दलच आकर्षण निर्माण करा.

स्वतःमध्ये विश्वास निर्माण करा : दुसरी गोष्ट आपल्याला करायची आहे ती तुम्ही म्हणत असाल की मे गरीब आहे, माझ्याकडे पैसा नाहीये, माझ्याकडे पैशांची कमी आहे, मी कर्जबाजारी आहे या जागेवर ती तुम्ही म्हणायला सुरुवात करायची आहे, की मी श्रीमंत आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे माझ्याकडे पाण्यासारखा पैसा येत आहे.

गरजेपेक्षा जास्त पैसे माझ्याकडे आहेत. जेव्हा तुम्ही असं म्हणायला लागल तुम्हाला एक वेगळाच मग विश्वास स्वतःमध्ये डेव्हलप झालेला दिसेल. खऱ्या अर्थाने तुमच्याकडे पैसा येण्यास सुरुवात होईल, कारण तुम्ही त्या पैशाच्या वेव्हलेन्थ बरोबर गुंग झालेले आहात म्हणून तो तुमच्याकडे आकर्षित होईल, तेव्हा तुमच्या घरात पैसा यायला लागेल. तुम्ही जर म्हणत राहिले आम्ही गरीब आहे, कर्जबाजारी आहे, माझ्यावर खूप कर्ज आहे, तीच फ्रिक्वेन्सी युनिव्हर्सल मध्ये मॅच होते, प्रकारच्या गोष्टी घडतात किंवा आकर्षित करायला लागतात.

इथे मात्र तुम्हाला एकदम उलट्या पद्धतीने विचार करायचा आहे. जे विचार आहेत ते या युनिव्हर्स मध्ये सोडायचे आहेत. लोक काय म्हणता त्याच्याकडे विचार करायचा नाही त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. म्हणायला सुरुवात करा मी हे करू शकतो, मी श्रीमंत होऊ शकतो, मी करोडपती होऊ शकतो, अब्जाधीश होऊ शकतो. मी त्याच्यासाठी जन्म घेतलेला आहे. खूप श्रीमंत होण्यासाठी जन्म घेतलेला आहे, गरीबी मध्ये खितपत पडण्यासाठी मी जन्म घेतलेला नाही, मी श्रीमंत होणार आहे. हे जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास दाखवाल युनिव्हर्स तुमच्या पाठीशी उभे राहते.

खर्च आणि कमाई याचा हिशोब ठेवा : तिसरी जी गोष्ट आहे ती तुम्हाला करायची आहे, ती फक्त अंदाज घ्या की तुमच्याकडे किती पैसे आहेत, आपण किती पैसे कमवत आहोत, आणि आपण किती पैसा खर्च करत आहोत असा एक अंदाज घ्या, की माझ्याकडे दोन रुपये येतात किती तीन रुपये खर्च करतो का दीड रुपये खर्च करतो,

तर मी तीन रुपये खर्च करत असेल,तर मी एक रुपया जास्त का खर्च करतो? याचा विचार करून खूप महत्त्वाचा आहे. मग त्यामध्ये तुम्ही आवश्यक खर्च, अनावश्यक खर्च, टाळता येणारे खर्च, असे एक सेप्रेशन करा, तुम्ही ते लिहा, अनावश्यक खर्च टाळण्यासारखे आहेत का? हे तुम्ही जर बघितलं, अंदाजपत्रक तयार केलं,तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही खूप सारा पैसा वाचवू शकता.

आपल्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल आदर बाळगा : चौथी जी गोष्ट तुम्हाला करायची आहे, ती आहे ग्राटीटूड. भले आज तुमच्याकडे फक्त पाचशे रुपये आहेत, त्याच्याबद्दल आदर बाळगा की माझ्याकडे पाचशे रुपयाची नोट आहे. त्या पैशांना सुद्धा भावना असतात, तुमच्या त्या भावना पैशांपर्यंत पोचतात. ज्यावेळेस त्या पाचशे रुपयाच्या नोटेबद्दल, मनातील सद्भावना व्यक्त करता तेव्हा ते पाचशे रुपये पाच हजार पर्यंत जाऊन पोचतात.

मग तुम्ही त्या पाच हजार रुपयांत बद्दल आदर करा, त्याचे परत पन्नास हजार रुपये कधी होतील हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. तुमच्याकडे असलेलं घर छोट आहे की मोठं आहे यापेक्षा माझ्याकडे घर आहे ही सुद्धा आभार प्रदर्शन करा. तुमच्याकडे असलेली गाडी, तुमच्याकडे असलेलं ऑफिस, तुमच्याकडे असलेले कपडे, तुमचं कपाट, फर्निचर, जे जे तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे असलेला फोन, तुमच्याकडे असलेला लॅपटॉप, प्रत्येकबद्दल आपण कृतज्ञता बाळगली पाहिजे. तुमच्या आयुष्यामध्ये सुखद बदल होतात हे अनुभव घ्या.

ध्येय लिहून ठेवा : पाचवी जी गोष्ट आहे, जी आपल्याला लक्षात घायची आहे ती म्हणजे, बी स्पेसिफिक.तुम्हाला किती पैसा हवा आहे, याबद्दल विशेष असणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला लागणार आहे, तुमच्या स्वप्नातला आयुष्य कसं असणार आहे ते तुम्हाला लिहायचा आहे, की मला माझ्या आयुष्यात एवढं मोठ घर हवं आहे, किंवा मला या प्रकाराची गाडी घ्यायची आहे,

सगळ्या गोष्टीत बारीक सारीक लिहून ठेवा, त्याची किंमत ठराव आणि ती किंमत लिहून ठेवा. आणि जेव्हा ते तुम्ही लिहाल तेव्हा लक्षात येईल की तुम्ही ज्या गोष्टीला एवढं घाबरत होता तेवढं काही ते अवघड नाही. कारण तुमची चे छोटे-छोटे विश्लेषण विशेष आहे, अशा प्रकारचा मोबाईल, अशा प्रकारची गाडी अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही मिळवु शकता.

त्याच्यासाठी तुम्हाला थोडे प्रयत्न करावे लागतील. आणि त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन वापरायची आहे. तुमच्या स्वप्नातले जे आयुष्य आहे तुम्ही आत्ता जगत आहात असं तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. भविष्यात मी असं करेल, भविष्यात मी असा बंगला बांधेन, आणि कार चालवेल, त्यापेक्षा मी आत्ता मी कष्ट करत आहे.

आता वर्तमानात माझ्यासोबत हे घडत आहे, हे जेव्हा तुम्ही फील करायला लागाल, आणि तसेच तुम्ही व्हिज्युअलायझ करता.आणि तुम्ही जगत रहाल. तुम्ही जर असेच विश लिस्ट करत असाल आणि तेच तुम्ही युनिव्हर्स मध्ये पाठवत असाल, युनिव्हर्स एवढी प्रामाणिक आहे की आणि तुम्ही जे मागाल ते तुम्हाला देत असते.

ऍक्शन घ्या : त्यानंतर आपल्याला करायचं आहे ॲक्शन प्लॅन, ॲक्शन प्लॅन तुमच्या भविष्यासाठी खूप उपयोगाचा असतो, कागदावर नुसतं लिहिलं तरी काही घडणार नाही, त्यासोबत तुम्हाला ऍक्शन करावी लागेल ते लिहिन महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही तुमचं बजेटिंग करत आहात त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की स्वप्नातलं आयुष्य तुमच्यासाठी किती पैसे लागणार आहेत,

मला दहा वर्षात किती पैसे लागणार आहेत, वीस वर्षात किती लागतील, एक महिना ला किती कमवायचे आहेत, एका वर्षात किती कमवायचे आहेत, एक आठवड्याला किती कमवायचे आहेत, आता मला एक दिवसाला किती पैसे कमवायचे आहेत, किती पैसे कमावणे आवश्यक आहे. येतो आकडा खूप मोठा दिसतो, पण जेव्हा तुम्ही तो दिवसावर येतो तो खूप छोटा झालेला दिसतो आणि तेवढे पैसे कमावणं आपल्यासाठी सोपं झालेलं असत.

पैसे कमविण्यासाठी १ पेक्षा अधिक मार्ग अवलंबा : जी गोष्ट आहे त्यात तुम्ही सेव्ह मोर करणार आहात, दुसरी जी आहे एर्न मोर करणार आहात, त्याच्यासोबत अजून एक व्यवसाय करू शकता, त्या मेन व्यवसायासोबत तुम्ही साइड बिझनेस काय करू शकता, आपल्याकडे मराठी लोक शेती करतात, नोकरी असेल तर शेती करतात, एसआयपी, म्युचल फंड, इन्व्हेस्टमेंटचे काही प्लॅन असतील ते ट्राय करू शकता,

तर अर्न मोरमध्ये आपण काय काय करू शकतो हा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्हाला करायचं आहे या युनिव्हर्स सोबत प्रामाणिक रहा. कारण युनिव्हर्स तुम्हाला नेहमी हेल्प करत असते ज्या प्रकारचे विचार रेडिएट करता त्या विचारांना मिळत्याजुळत्या कृती तुमच्या आयुष्यात घडतात.

तुम्ही जर चांगला विचार केला तर तुमच्या विचारांना मॅच होईल अशी फ्रिक्वेन्सी मॅच होईल अशा गोष्टी तुमच्याकडे पाठवत असते. नेहमी चांगला विचार करा आणि तसाच आयुष्य तुमच्याकडे आकर्षित करत असता, पण जर तुम्ही वाईट विचार करत असाल तर तसाच आयुष्य तुमच्याकडे आकर्षित करत आहात. युनिव्हर्स ने तुम्हाला जे काही दिले त्यासाठी तुम्ही युनिव्हर्स ला थँक्यू म्हणा. तुम्ही तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करा.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.