मित्रांनो जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती ज्यांची संपत्ती पाच लाख करोड पेक्षा जास्त आहे, ज्याने वयाच्या अकराव्या वर्षी शेअर मार्केटमध्ये पहिला शेअर विकत घेतला होता, ज्यांनी लहानपणीच ठरवले होते की एक दिवस मी खूप श्रीमंत होणार आणि त्यांनी तसे त्यांच्या मित्रांमध्ये जाहीर सुद्धा केले होते की मी जर वयाच्या तिसाव्या वर्षी अब्जाधीश झालो नाही तर मी आत्महत्या करेन,
जे वयाच्या सोळाव्या वर्षी आपल्या शिक्षकांपेक्षा देखील जास्त कमवत होते आणि एवढे श्रीमंत असून देखील सुद्धा आपल्या सुरुवातीच्या 3 बीएचके फ्लॅट मध्ये राहणारे म्हणजे वॉरन बफेट. यांचे पैशाबद्दल चे पाच नियम आपण जाणून घेणार आहोत, जे आपण जाणून घेणार आहोत यामध्ये आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देखील मिळतील.
पहिला नियम फक्त एका उत्पन्नावर अवलंबून राहू नका, उत्पन्नाचे अनेक मार्ग निर्माण करा. मित्रांनो आपण असा विचार करतो की इथे धड एक उत्पन्नाचा मार्ग मिळत नाही आणि अनेक मार्ग निर्माण कशे करायचे याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्याला लहानपणीकोणी सांगतच नाही,आपल्याला असे सांगितले जाते की नीट शाळा शिक, शिक्षण पूर्ण कर आणि नोकरीला लाग.
त्यामुळे आपल्या डोक्यात दुसरे उत्पन्न निर्माण करण्याचा विचार येत नाही. वॉरन बफेट यांच्या berkshire कंपनीच्या अंतर्गत साठ कंपन्या आहेत, त्यामुळे एका कंपनीचा तोटा जरी झाला तरी बाकीच्या कंपन्या त्याला सांभाळून घेतात. आपण जेव्हा उत्पन्नाचे अनेक पर्याय शोधण्याचा प्रयत्न सुरू करू तेव्हा अनेक मार्ग दिसायला लागतील. तेव्हा जर तुम्ही म्हणाल की ते शक्यच नाही तर त्याला कुणीच काही करू शकत नाही.
कारण मनाने तुम्ही हरलात. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा मला अजून पैसे कमवण्यासाठी काय काय करता येईल आणि खात्रीशीर रित्या आता करत असलेल्या कामाव्यतिरिक्त इतर दोन तीन पर्याय तरी तुम्हाला नक्की सुचतील. करून बघा. आणि हाच विचार आतापासूनच आपल्या मुलांवर बिंबवायला सुरुवात करा की मोठे होऊन त्यांना फक्त नोकरीच नाही करायची तर उत्पन्नाचे अनेक पर्याय निर्माण करायचे आहेत.
दुसरा प्रश्न पाहण्याआधी त्यासंदर्भात असलेला प्रश्न म्हणजे खर्च कसा करावा? याबद्दल सांगताना वॉरेन बफेट म्हणतात, तुम्ही जर अशा गोष्टींवर खर्च करत असाल ज्याची तुम्हाला गरज नाही तर लवकरच तुम्हाला गरज असलेल्या गोष्टी विकाव्या लागतील. मित्रांनो हा एक जबरदस्त नियम आहे.
हा नियम वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की आतापर्यंत आपण किती अनावश्यक गोष्टींवर खर्च केला आहे. नियम वाचल्यावर तुमचे नक्कीच डोळे उघडतील. आपण अशा बऱ्याच लोकांना बघतो ज्यांचा पगार असतो वीस ते पंचवीस हजार रुपये परंतु त्यांच्या हातात आपल्याला 60 ते 70 हजारांचा आयफोन दिसेल, घरात सगळ्या टॉप ब्रँड वस्तू मिळतील.
तुम्ही जर त्यांना विचारले की तुम्ही कसे मॅनेज करता तर ते तुम्हाला सांगतील की इएमआय आहे ना, म्हणजेच कर्ज काढून त्या विकत घेतल्या. आपण असे पण बरेच लोक बघितले असतील कि ते ऐपत नसताना देखील लग्नामध्ये दहा-पंधरा लाख खर्च करतात आणि मग आयुष्यभर त्याचा हप्ता भरत राहतात.
आता तुम्हीच विचार करा की जर उद्या यांच्या घरावर संकट आल म्हणजेच कोणीआजारी पडल किंवा कुणाची नोकरी गेली तर हे लोक काय करतील, तेव्हा निश्चितच ज्या गरजेच्या वस्तू आहेत, त्या विकाव्या लागतील जसे की दागिने, घर इत्यादी. त्यामुळे कुठेही खर्च करताना नीट विचार करा की मला खरंच त्याची गरज आहे का खरंच गरज असेल तेव्हाच विकत घ्या.
तिसऱ्या नियमांसाठी असलेला प्रश्न आहे, पैशाची बचत कशी करायची? वॉरेन बफेट म्हणतात, पैसे बचतीचे दोन प्रकार आहेत, एक आहे गरीब लोकांची पद्धत आणि दुसरी आहे श्रीमंत लोकांची पद्धत. गरीब लोकांची पद्धत अशी असते की त्यांच्याकडे जेव्हा पैसे येतात तेव्हा आधी ते खर्च करतात.
आणि मग जे काही उरलेले पैसे असतात त्याची ते बचत करतात तर इकडे श्रीमंत लोक आलेल्या पैशाची आधी बचत करतात ते आधी ठरवतात की एवढे पैसे हे बचतीसाठी ठेवले पाहिजेत आणि मग बाकीच्या पैशातून ते आपला खर्च भागवतात म्हणजेच श्रीमंत लोकांकडे जेव्हा पैसे येतात तेव्हा ते ठरवतात की इतक्या पैशांची बचत करायची.
आणि मग उरलेले पैसे ते खर्च करतात. याउलट गरीब लोक हे आलेल्या पैशांमध्ये खर्च अधिक करतात, अनावश्यक वस्तू विकत घेतात आणि मग राहिलेल्या थोड्याफार पैशाची बचत करतात. हा खूप छोटा नियम आहे पण हा नियम तुम्हाला दीर्घकाळासाठी फायदा देऊ शकतो.
त्यानंतर चौथा नियम सांगताना वॉरेन बफेट सांगतात की रिक्स कशी घ्यायची? मित्रांनो आपण बऱ्याच लोकांकडून ऐकले आहे की रीस्क घेणे म्हणजे सगळे पणाला लावणे, जसे की एलोन मस्क मी घर वगैरे सगळं विकून कंपनी काढण्याची रिक्स घेतली होती. आपल्या सर्वांचा असाच समज असतो.
वॉरेन बफेट म्हणतात, जर तुम्हाला पहायचे असेल की नदी किती खोल आहे तर दोन्ही पाय नदीमध्ये टाकू नका, एक पाय बाहेर ठेवा आणि एक पाय आत टाका आणि तपासून पहा की नदी किती खोल आहे. याचा अर्थ काय तर रिस्क घेणे म्हणजे तुम्ही जे काही प्रयत्न कराल जे काही गुंतवाल त्याचा तुम्हाला चांगला परतावा मिळाला पाहिजे.
त्या रिस्क ने तुम्हाला संपवता कामा नये. उदाहरणार्थ समजा तुम्हाला एखादा व्यवसाय चालू करायचा आहे तर असा विचार करा की जर हा व्यवसाय पूर्णतः तोट्यात गेला आणि डुबला तर मी आत्ता जसा जगतो आहे, तसाच जगू शकतो का? माझी बायको, माझी मुले,त्यांचे शिक्षण, आजारपण मी व्यवस्थितपणे करू शकतो का? व्यवसाय डुबल्या नंतर मी निराशेत तर जाणार नाही ना?
या प्रश्नांची उत्तरे जर सकारात्मक असतील तर रिस्क घ्यायला हरकत नाही. म्हणजे तुमच्याकडे जर पाच लाखाची बचत असेल तर तुम्ही एक किंवा दोन लाखाची रिस्क घेऊ शकता म्हणजे व्यवसाय तोट्यात गेला तरी उरलेले तीन लाख रुपये तुम्हाला वाचवतील.
पाचवा प्रश्न असा आहे कि वस्तू कधी विकत घ्याव्या? वॉरेन बफेट म्हणतात, वस्तू विकत घेताना सुट मागायला कधीच लाजु नका किंवा नेहमी मोठ्या सेलची वाट बघा कारण जेव्हा कधी सेल लागतो आणि खूप चांगल्या चांगल्या वस्तू या स्वस्त दरात मिळतात तेव्हा तुमचा खूप फायदा होऊ शकतो आणि बरीच श्रीमंत लोक या युक्तीचा फायदा करतात.
मित्रांनो श्रीमंत लोक जर सूट मागायला लाजत नसतील तर आपण कशाला जायला पाहिजे. वॉरेन बफेट यांनी सांगितलेल्या या नियमांमुळे तुमच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील. त्यांनी सांगितलेले नियम आत्मसात करा आणि तुम्ही लवकरच श्रीमंत व्हाल.
वरील माहिती www.youtube.com/c/ShahanPan या चॅनल वरून संकलीत व शंब्दांकित केलेली आहे
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
nice Thoughts