‘स्वतःची किंमत वाढवा व भरपूर पैसे कमवा..!’ स्वतःची किंमत वाढवायची म्हणजे नक्की काय करायचं ? कशी वाढवायची ? याबद्दलची महत्वाची माहिती जाणून घ्या या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आर्थिक साक्षरते कडून आर्थिक स्वातंत्र्यकडे घेवून जाणारी आपली ही एक चळवळ. आज आपण “स्वतःची किंमत वाढवा व भरपूर पैसे कमवा” ह्याचा नक्की काय अर्थ हे पाहुयात. आता स्वतःची किंमत वाढवायाचे म्हणजे नक्की काय करायचे? कसे वाढवायचे? हे आज आपण पाहुयात.

आपल्याला अर्थशास्त्रात एक नियम माहिती आहे तो म्हणजे, मागणी आणि पुरवठ्याचा : जिथं मागणी जास्त असते त्याठिकाणी किंमत जास्त असते. ज्याठिकाणी मागणी कमी होते त्या ठिकाणी किंमतही कमी होते. म्हणजे मागणी आणि पुरवठ्याचे समीकरण आपण समजून घेतलं तर मागणी आणि पुरवठा हा किमतिशी कसा निगडित हे आपल्याला कळेल. म्हणजे जर मार्केटमध्ये कांद्याचे उत्पादन खूप जास्त झालं तर त्याची किंमत लगेच पडते त्याची किंमत कमी होते. पण तेच जर कांद्याचे मार्केट मध्ये शोर्टेज असेल तर त्याची किंमत वाढते.

तर थोडक्यात आपण जर एखादे करिअर निवडत असो तर आपण अस करिअर निवडायला पाहिजे ज्याला मागणी जास्त आहे. नाकी ज्याचा पुरवठा जास्त आहे. म्हणजे साधारणपणे सगळे लोक जे काही करतात आपण त्याच क्षेत्रामध्ये जाणार असेल तर आपली किंमत कमी असणार. मग अशी कोणकोणती क्षेत्रे आहेत ते जर समजून घेतल तर जे काही क्षेत्र आहेत त्याचा सर्वसामान्य ग्रामीण भागात त्याचा विचार केला जातो.

जसं की D.ed ला खूप मुल प्रवेश घ्यायची तर झालं काय तर त्याच महत्व एकदमच कमी झालं. पण आता अशी कोणती क्षेत्र आहेत की ज्यात खूप मोठा स्कोप आहे किंवा डिमांड आहे. आज आर्टिफिशयल इंटेलेंजेन्स खूप जास्त गरज आहे. मशीन लर्निग ची गरज आहे. डिजिटल मार्केटिंग, ही अशी वेगवेगळे शास्त्र आहे या क्षेत्राचा आपण विचार केला पाहिजे. या क्षेत्रात आपण यश संपादन केलं, कौशल्य संपादन केलं, तर मागणी आणि पुरवठ्याचा नियमानुसार आपली किंमत सहज वाढू शकते. हा झाला पहिला सिद्धांत.

दुसरा विषय की तुम्ही किती मोठा प्रॉब्लेम सोडावता त्यानुसार तुमच यश आणि तुमची किंमत अवलंबून असतात : हे छोटासा उदाहरण पाहूया, एक कंपनी असते आणि त्या कंपनी मध्ये खूप जड असे मशनरी पंधरा ते वीस फूट खड्डा मध्ये ठेवायचे असते. ते ठेवत असताना वेगवेगळ्या कंपन्यांना बोलावलं गेलं आणि त्या ठिकाणी बोलवल्या नंतर त्यांनी आपली कोट दिले.

या कोट मध्ये सगळ्यात कमी कोट होता, म्हणजे बाकीच्यांचे 40 ते 50 लाख रुपये. आणि एकाच कंपनीने कोट केला तो आकडा होता 15 लाख रुपये. ज्या कंपनीने ऑर्डर दिली होती ती कंपनी आश्चर्यचकित झाली की एवढ्या कमी पैशात हे लोक काम कसे करतात? हे काम तर खूप मोठे आहे. कमी बजेट चे टेंडर असले मुळे त्यांना ते टेंडर देण्यात आले.

आणि ते लोक आले काम करायला त्यांनतर त्यांनी त्यांची डिमांड ठेवली की आम्हाला इथे बर्फाच्या लाद्या हव्यात. मग त्यांनी काय केलं तर ज्या खड्यात ती मशीन ठेवायची होती त्या खड्यात बर्फ ठेवला आणि त्यावर ही मशीन ठेवली. जसजसं वेळ होत होता तस तसा तो बर्फ वितळायला सुरुवात झाली. आणि मशीन हळू हळू खाली गेली.

एवढा मोठा प्रोब्लेम एका टेक्निकच्या वापराने त्या कंपनी ने सोडवला. आणि त्यांनी खूप चांगले पैसे कमावले. सांगण्याच तात्पर्य काय तर आपल्याकडे प्रॉब्लेम सोलविंग या ॲप्रोच मध्ये आपण गेलं पाहिजे. जसं की आपण कोणत्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रातले आपण किती मोठा प्रॉब्लेम सोडवू शकतो हे महत्वाचे असते. ह्यावरून आपली किंमत निश्चित आहे.

तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आपण आपले स्किल अपग्रेड करायला पाहिजे : आपण ज्या ठिकाणी काम करतोय. आपण कोणत्या पोझिशन वर काम करतोय तर तिथे काय अपग्रेडेशन पाहिजे याची माहिती आपल्याला पाहिजे आणि ते आपण केलं पाहिजे. उदाहरणार्थ अकाउंटिंग स्किल असू शकतात. दोन व्यक्ती मध्ये काहीतरी स्किल असतील तर ते आपण आत्मसात केले पाहिजे.

की पुढे जाऊन माझे कुठे तरी प्रमोशन होणार आहे. मला एक सिनियर असेल तर त्या मध्ये नेमके कोणते स्किल आहे की ज्यामुळे त्याला माझ्या पेक्षा जास्त पगार मिळतो. तर आपण ते स्किल अवलंबन्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं की लीडरशिप किंवा अन्य इतर गोष्टी असतील. पूर्वीचा काळ होता की त्या ठिकाणी प्रमोशन घेण्यासाठी एज सिनिऱ्यारीटी लेव्हल होती.

तर आज एज सिनिऱ्यारीटी हा विषय नाहीये. आजच्या काळामध्ये तुमच्याकडे किती स्किल आहे आणि तुम्ही किती ॲक्टिव आहेत ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळं जितक्या फास्ट तुम्ही हे स्किल अवगत कराल तितक्या वेगाने तुम्ही प्रगती करू शकता. आणि सातत्याने अपग्रेड राहील पाहिजे की जेणेकरून आपण आपली किंमत वाढवू शकतो.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.