रबर तर पांढरे शुभ्र असते, मग त्यापासून बाणणारे टायर हे काळे कसे काय?

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा

प्रत्येकाला वाटतं आपली स्वतःची कार असावी. जे व्यक्ति कार घेऊ शकत नाहीत ते बाईक वर समाधानी असतात. बाईक नसेल तर सायकल आहेच. पण या सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे काळ्या रंगाचे टायर. कोणत्याही गाडीच्या टायरचा रंग काळा का असतो हा प्रश्न तुम्ही स्वतःला कधी विचारला आहे का? पहिली गोष्ट लक्षात घ्या की हे विनाकारण घडत नाही. सायकल, बाइक, ते कोट्यवधी रुपयांच्या महागड्या कार असूद्या सर्वांच्या टायरचा रंग काळा असतो. यामागे एक वैज्ञानिक कारण आहे, जे आज आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. माहिती आवडल्यास आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

ज्या रबरापासून टायर बनवले जातात ते रबर तर पांढरे शुभ्र असते हे तुम्हाला माहीतच असेल. पण हे रबर मऊ असल्यामुळे साहजिकच त्याचे आहे त्या परिस्थिति मध्ये टायर बनवता येत नाही आणि हे रबर इतके मऊ असते की ते लवकर झिजते. म्हणूनच ते ‘हार्ड’ करावे लागेल. मग त्यात एक साहित्य मिसळले जाते ज्यामुळे टायरचा रंग काळा होतो. याला कार्बन म्हणतात. कार्बनबरोबरच त्यात सल्फरही मिसळले जाते.

यामुळे मिळते मजबूती : कार्बन आणि सल्फरमुळे त्या टायरला मजबूती मिळते. त्यामुळे टायर लवकर झिजत नाहीत. त्यात काळ्या कार्बनची भर पडल्यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांचाही काळ्या टायरवर वाईट परिणाम होत नाही. एका अहवालानुसार, साधारण रबर जे 8 हजार किलोमीटर धावते, त्यात कार्बन मिसळल्यानंतर ते एक लाख किलोमीटरपर्यंत चालेल, असेही समोर आले आहे.

टायर चा रंग बदलला तर ? : जेव्हा आपण कार खरेदी करतो तेव्हा आपल्याला एका गोष्टीची उत्सुकता असते की आपण कोणत्या रंगाची कार खरेदी करावी? पांढरा शुभ्र चांगला दिसेल की लाल? पिवळा, सोनेरी, निळा, काळा असे भरपूर ऑप्शन आपल्याला मिळतात, बरोबर? पण जेव्हा आपण टायर खरेदी करतो तेव्हा असे होत नाही. ऑफलाइन असो किंवा ऑनलाइन टायर खरेदी असो, आपल्याला शंभर इतर वेगवेगळ्या गोष्टी टायर मध्ये नमूद केलेल्या दिसतात, पण एक गोष्ट ज्यासाठी आपल्याला पर्याय दिलेला नाही तो म्हणजे आपल्या टायरचा रंग. आपल्याला वेगळ्या रंगाचे टायर का मिळत नाही आणि तो नेहमी काळ्या रंगात का येतो याचा कधी विचार केला आहे? चला त्यामागचे कारण सांगतो.

लहान मुलांच्या सायकलींचे टायर वेगवेगळ्या रंगाचे असतात हे तुमच्या पाहण्यात आले असेल. जर तुम्ही त्यांना स्पर्श करून पाहाल तर तुम्हाला कळेल की ते जास्त ओझे सहन करू शकत नाहीत. एवढेच नाही तर ही सायकल कमी अंतरासाठी धावू शकते. यामागील कारण म्हणजे त्याचा टायर खूपच मऊ असतो. कंपन्यांनी वाहने आणि बाईकसाठीही असे टायर बनवायला सुरुवात केली तर तो तोट्याचा सौदा ठरेल म्हणूनच बाईक्स, कार, ट्रक, बस सर्वच गाड्यांचे टायर हे काळ्या रंगाचे असतात.

एक काळ असा होता जेव्हा काळा रंग कंटाळवाणा वाटायचा आणि तो आकर्षक वाटत नसे, परंतु काळ्या टायर्सने नक्कीच लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे आणि इतर रंगांशी जुळवून घेतल्यास ते अधिक दर्जेदार आणि विलक्षण बनतो हे दाखवून दिले आहे. शिवाय, टायर्ससाठी काळा हा आदर्श पर्याय आहे हे स्वीकारणे चुकीचे ठरणार नाही. बघा ना, गाडी पांढरी असो वा लाल काळ्या टायर्समुळे ती अधिक आकर्षक वाटते.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.