एखाद्या गोष्टी बद्दल माहिती शोधायची झाली की, आपण पटकन गुगल करतो आणि बहुतेक वेळा आपल्याला एका जागी भरपूर माहिती मिळते ती जागा म्हणजे विकिपीडिया. एखादी व्यक्ती, घटना किंवा दिवसांबद्दलचा इतिहास वाचण्यासाठी अनेक जण विकिपीडियाचा वापर करतात, पण सध्या एका कोर्ट केसमुळे भारतात विकिपीडिया चर्चेत आले आहे. या ANI वृत्तसंस्थेने विकिपीडियावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. तर चला तर जाणून घेऊया, यांच्यात नेमकं भांडण काय आहे? जगातल्या वेगवेगळ्या विषयांबद्दल विकिपीडियावर माहिती कोण लिहितं? आणि त्यांचं काम चालतं कसं? समजून घेऊया…
ANI ही वृत्तसंस्था चुकीच्या बातम्या देत असल्याचं तसंच ते केंद्र सरकारचा प्रपोगंडा चालवत असल्याचं विकिपीडियावरच्या एका पेजवर ANI संदर्भात लिहिलं होतं. मग ANI ने यावर आक्षेप घेतला आणि विकिपीडिया चालवणाऱ्या विकिमीडिया कंपनी विरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला. ऑगस्ट महिन्यात हा खटला दाखल केल्यानंतर कोर्टाने विकिमीडिया फाउंडेशन ला सांगितलं होतं की त्यांनी चालवणाऱ्यांची नाव जाहीर करावी यानंतर विकिपीडियावरच्या आणखीन एका पानावर या खटल्याबाबत लिहिलं गेलं होतं की, कोर्टाच्या नाव जाहीर करण्याच्या आदेशावर टीका केली होती.
ऑक्टोबर महिन्यात कोर्टाने यावर नाराजी व्यक्त केली आणि 36 तासात डिलीट करण्याचे आदेश दिले. 21 ऑक्टोबरला विकिपीडिया कोर्टाच्या आदेशामुळे इंग्रजी विकिपीडियावरचा एखादा संपूर्ण पेज हटवण्यात येण्याची बहुदा ही पहिलीच घटना असावी. 2001 सालापासून जगभरात विकिपीडियाला एक मोफत ओपन सोर्स म्हणून ओळखले जातात याला ऑनलाइन विश्वकोश असे म्हणू शकता.
विकिमीडिया फाउंडेशन ही नफा तत्वावर चालणारी संस्था विकिपीडिया चालवते. सध्याच्या घडीला या वेबसाईटवर 6 कोटींपेक्षा जास्त लेख आहेत आणि दर महिन्याला त्यांना एक हजार पेक्षा जास्त पेज व्हिज मिळतात.
◆ यावर कोणी माहिती देऊ शकता का?
तर याचा उत्तर आहे हो. विकिपीडियामध्ये एखादी नवीन एन्ट्री करण्याची किंवा आधीपासून असलेल्या पानावरच्या माहितीत बदल करण्याची सगळ्यांना परवानगी आहे. सध्याच्या घडीला विकिपीडियावर सुमारे 3 लाख लोक स्वतःहून लिहितात आणि त्यावरच्या मजकुराची सत्यता सुध्दा तपासून पाहतात. हे काम कोणी करू शकतो आणि त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात असं वेबसाईट सांगते. लोक स्वइच्छाने हे काम करतात त्यामुळे त्यासाठी त्यांना मोबदला देण्यात येत नसल्याचं विकिमीडिया फाउंडेशन म्हंटले आहे. हे त्यांची ओळख गुप्त ठेवली शकतात.
पेजवर काय लिहिला जातो, यावर आपले नियंत्रण नसल्याचा विकिमीडिया फाउंडेशनच म्हणणे आहे. पण याचा अर्थ हे पूर्णतः अनिर्बंध आहे, असे नाही. वेबसाइटवर काय छापले जाऊ शकत? याबद्दल अनेक धोरणं आणि मार्गदर्शक सूचना आहेत, म्हणजे आजवर कोठेही छापून आलेली नवीन माहिती विकिपीडियावर घेता येत नाही. एखाद्या विश्वासार्ह ठिकाणी छापून आलेली माहिती विकिपीडियावर लिहिता येते. छापून आलेला हा मजकूर यातल्या तपशिलांची आणि संदर्भाची पडताळणी संपादक, ॲडमिन, कम्प्युटर बॉट्सद्वारे केली जाते.
या लेखाचे संपादन, एडिटर एखादा लेख व त्यातला काही भाग वगळून शकतात. हा लेख किंवा त्याच्या संपादन या बद्दल वाद झाला तर बोलून किंवा त्यांची बाजू मांडत चर्चा करतात आणि परस्पर सहमतीनं तर हा लेख प्रकाशित केला जातो. इथे मिळणाऱ्या माहितीचा वापर प्राथमिक स्रोत म्हणून केला जाऊ नये आता खुद्द विकिपीडिया सांगतो.
त्यावर असलेल्या लेखांमध्ये चुका असू शकतात! विकिपीडियावरच्या प्रत्येक लेखाच्या खाली त्याच्याशी संबंधित संदर्भांची यादी असते आणि त्या आधारित लेख लिहिण्यात आलेले असतात. तुम्ही या यादीतल्या पाहून माहिती पडताळून पाहू शकता. जर एखाद्या लेखात वारंवार बदल करण्यात येत असतील किंवा त्यावरुन वाद होत असेल तर मग त्याचं विकिपीडियावरील एडिट करण्यावर काही काळासाठी निबंध येवू शकते.
◆ विकिपीडिया कमाई कशी करते?
विकिपीडिया उघडलं की, लगेच देणगी देण्यासाठी आवाहन तुम्हाला दिसत, या मधूनच विकिपीडियाचा खर्च चालतो. 2022-23 व्या वर्षी विकिमीडिया फाउंडेशनला 18 कोटी डॉलर पेक्षा जास्त मूल्याच्या देणग्या मिळाल्या होत्या. भारतीय रुपयात याचा मूल्य साधारण 1513 कोटी होतं. विकिपीडिया आपण जाहिराती वापरत नाहीत आणि युजर डेटा वापरून पैसे कमवत नाही असंही ते सांगतात.
याचबरोबर, पक्षपातीपणा केल्याचा आरोपही विकिपीडियावर लावण्यात आलेत. विकिपीडियावर एक टीका करण्यात येते की, लेख लिहिणारे पुरुष आहेत त्यामुळे येणारे बहुतेक लेख पुरुष बद्दल आहेत.
याचबरोबर, अनेक कारणाने किमान 13 देशांमध्ये आदेशान्वये विकिपीडियावर वेगवेगळ्या प्रकारे निर्बंध घालण्यात आले आहे. चीन, म्यानमार आणि उत्तर कोरियामध्ये विकिपीडियावर पूर्ण बंद आहे, तर रशिया आणि इराणने विकिपीडियावर काही लेखावर बंदी घालण्यात आली आहे.
विकिपीडिया वरच्या काही लेखांमुळे देशातल्या मुस्लिमांचे भावनांना धक्का लागला असं म्हणत 2023 पाकिस्तानने विकिपीडियावर 3 दिवस बंदी घातली होती आणि त्यानंतर आता हा भारतातला वाद…