तुमच्या रोजच्या जीवनातील आरोग्यविषयीच्या १० अशा सवयी ज्या तुम्ही आजच बदलल्या नाही तर भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील !

लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आपल्या रोजच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचे परिणाम आपल्याला माहीत असतात पण तरीही आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. लक्षात ठेवा आता या चुकांकडे केलेले दुर्लक्ष तुम्हाला पुढे त्रासदायक ठरेल म्हणतात ना एक छोट छिद्र ही जहाजाला बुडवू शकत. त्यामुळे वेळीच काही सवयी बदला ज्यामुळे तुम्हाला म्हातारपणी त्रास होण्याची शक्यता आहे. तर चला तर मग जाणून घेऊया रोजच्या आयुष्यात आपण करत असलेल्या चुका आणि हेल्थ फॅक्टस ज्याबाबत आपण काळजी घेतली पाहिजे.

१.उभ्याने पाणी पिणे टाळा : उभ्या उभ्या पाणी पिणाऱ्याच्या गुडघ्यातील दुखणे जगातील कोणताच डॉक्टर बर करू शकत नाही म्हणूनच नेहमी तसं सांगितले जाते की पाणी बसून प्यावं.

२.फास्ट फॅन किंवा ए.सी खाली झोपू नाका : तुम्हाला माहीत आहे का फॅन फास्ट करून किंवा ए.सी जवळ झोपल्याने लवकर वजन वाढते. त्यामुळे शक्य असेल तितक प्राकृतिक वातावरण आणि ऋतुमानानुसार तुम्ही स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

३.वारंवार पेनकिलर घेणं टाळा : जेव्हा तुमचा एखादा अवयव दुखत असतो तेव्हा ७०% दुखण्यात जर तुम्ही एक ग्लास गरम पाण्यासोबत पेनकिलर घेतली तर ती जास्त वेगाने परिणाम करते पण प्रत्येक वेळी छोट्या-मोठ्या दुखण्यावर पेन किलर घेणं योग्य नाही त्यामुळे शक्यतो पेन किलर टाळा कारण पुढे जाऊन यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो.

४.नारळाचं पाणी फक्त सकाळी प्या : सरबत आणि नारळ पाणी जर तुम्ही सकाळी 11 वाजन्याआधी प्यायलात तर अमृत आहे. पण त्यानंतर प्यायलात तर मात्र तितकंसं परिणामकारक नाही. नारळाचं पाणी हे सकाळीच पिणं हे शरीरासाठी जास्त चांगलं असतं.

५.जेवणासाठी अल्युमिनियमच्या भांड्याचा वापर टाळा : अल्युमिनियम च्या भांड्याचा वापर कमीत कमी करावा. कारण याच भांड्याचा वापर इंग्रजांनी देशभक्त भारतीय कैद्यांना रोगी बनवण्यासाठी सुरू केला होता जर तुम्ही या भांड्याच नीट निरीक्षण केलं तर तुमचं खाणं झाल्यावर त्या भांड्याचा रंग काहीसा बदलतो कारण ॲल्युमिनियम खाद्यपदार्थावर रिऍक्शन करतात खास करून ऍसिडीक पदार्थ उदाहरणार्थ. टोमॅटो यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

६.अन्न व्यवस्थित चावूनच खा : नेहमी जेवताना प्रत्येक घास बत्तीस वेळा चावून खावा ही गोष्ट तुम्ही अनेकदा ऐकली असेलच. पण ती गोष्ट आपण हसण्यावारी नेतो. खरतर या गोष्टीचा खरंच आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. आयुर्वेदानुसार आपल्या तोंडात जेवढे दात आहे तेवढ्या वेळा आपण अन्न चाऊन खाल्लंच पाहिजे.

७.भारतीय शौचालयाचा वापर करा : इंग्लिश टाईपच्या टॉयलेट सीटवर बसून शौच केल्याने पोट पूर्णतः साफ होत नाही, आणि पोटातील घाण तशीच राहते. यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा सोबत मेटाबोलिजम कमी होणं आणि इतर आजारही होऊ शकतात. त्यामुळे भारतीय पद्धतीच्या शौचालयाचा वापर केल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी जास्त चांगला आहे.

८.रात्री वेळेवर झोपा : आपण नेहमीच रात्री उशिरापर्यंत जागतो आणि दुसर्‍या दिवशी सकाळी झोप पुर्ण झाली नाही असे म्हणतो.तुमचं काही महत्त्वाचं काम नसल्यास उगाच उशीरा पर्यंत जागणे टाळा. रात्री उशिरा पर्यंत टी. व्ही पाहणं म्हणजे रात्री झोप न येणं. झोपेचीही कमतरता धूम्रपाना इतकीच धोकादायक आहे.

९.नाश्ता करणं आवश्यक : धावपळीच्या आयुष्यात लोक नेहमीच नाश्ता करणे टाळतात. पण लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही सकाळचा नाष्टा टाळता तेव्हा तुम्हाला दिवसभर सुस्ती जाणवते सोबतच तुमचं वजनही वाढतं. ॲनिमिया, कॅल्शियमची कमतरता, केस गळती, गॅस्ट्रिक, डायबिटीज इ. प्रॉब्लेमस ची कारणे ही असू शकतात.

१०.शिंक थांबवू नका : शिंक आली की अनेकदा आपण ते थांबवण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला माहित आहे का ते तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. शिंक थांबल्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. एवढंच नाही तर तुमच्या शरीरातील रक्त धमनी ही फुटू शकते. त्यामुळे कधीही शंका आल्यास ती थांबवायचा प्रयत्न करू नका. तुम्ही जर या सवयी फॉलो केल्या तर तुमच्या आरोग्याला भविष्यात या सवयी पासून होणारा धोका टाळता येऊ शकतो.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.