कायद्याचा अभ्यास करण्याची इच्छा आहे तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे ।। LLB अभ्यासक्रमाविषयी महत्वाची माहिती जाणून घ्या या लेखातून !

शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

पाच वर्ष आणि दोन वर्ष अशा दोन वेगवेगळ्या प्रकारे करता येणारा हा कोर्स आहे. यामध्ये कोणता उपयुक्त आणि फायदेशीर आहे. हा कोर्स किती वर्षांमध्ये करता येतो. या नंतर नोकरीच्या काय संधी आहेत कोणकोणते चान्स आहेत नोकरीचे असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. अनेक विद्यार्थ्यांना याची माहिती नसते. तर यासंबंधीची सगळी माहिती इथे देत आहोत. नवीन विद्यार्थ्यांसाठी ही माहिती अतिशय उपयोगी ठरेल खाली डिटेल्स मध्ये एल एल बी या कोर्स विषयी माहिती दिली आहे.

🔘 बारावीनंतर आणि पदवी नंतर असे दोन प्रकारचे LLB Course करता येतात. दोन्ही कोर्स सेम असतात. फक्त 12 वी नंतरचा जो असतो तो पाच वर्षांचा असतो आणि डिग्री नंतर जो असतो तो तीन वर्षांचा असतो. परंतु बारावीनंतरच्या जो कोर्स असतो त्याला आताच वेगळी डिग्री असते. जसे की, समजा जर तुम्ही बारावीनंतर कोर्स करत असाल, आर्ट नंतर करत असाल तर “BA-LLB” कॉमर्स नंतर करत असाल तर “B.COM LLB” आणि सायन्स बारावी नंतर करत असाल तर “BSC LLB”.

असे कोर्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यासोबत तुम्हाला एक जॉईंट डिग्री असते आणि जेव्हा तुम्ही डिग्री नंतर LLB Course करत असता तेव्हा तुम्हाला तीन वर्षांचा फक्त एलएलबी चा कोर्स करावा लागेल. दोन्ही गोष्टी सारखेच असतात. आपली भारतीय राज्यघटना ज्या राज्यघटनेवरती चालते, जा सविधानावरती चालते, त्या सर्व संविधानाचा राज्यघटनेचा कायद्याचा सगळ्यात सविस्तर अभ्यास करणारी, सगळा अभ्यास असणारी एकमेव डिग्री आहे ती म्हणजे एल एल बी.

तुम्हाला या दोन पैकी कोणतीही एक डिग्री द्यायचे असते. एका डिग्री तुम्हाला एलएलबी करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचं गोष्ट आहे ती म्हणजे ” MHT-CET ” Exam द्यायचे असते जर तुम्ही महाराष्ट्र राज्यात LLB करायचा विचार करत असाल तर तीन वर्ष आणि पाच वर्षासाठी दोन वेगवेगळे एलएलबी असतात.

 

🔘तीन वर्षांचा एलएलबी साठी साधारणता “मार्च-एप्रिल” महिन्यात फॉर्म सुरु होतात आणि “जून” महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या रविवारी साधारणता त्याची एक्झाम होते. तर पाच वर्षांसाठी “फेब्रुवारीमध्ये ” फॉर्म चालू होतात आणि साधारणता” एप्रिल” महिन्यामध्ये त्याची एक्झाम असते.

🔘 परीक्षेचे स्वरूप

एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसते.150 que ची एक्झाम असते. आणि त्यासाठी दोन तासांचा वेळ असतो यामध्ये जास्तीत जास्त marks मिळवून चांगलं कॉलेज मिळण्याची संधी असते. सीईटी एक्झाम नंतर महत्त्वाची पात्रता आहे ती म्हणजे जर तुम्हाला तीन वर्षांचा कोर्स करायचा असेल तर तुम्ही कोणत्याही डिग्री नंतर हा कोर्स करू शकता यामध्ये वयाचे बंधन नाही.

वयाच्या कोणत्याही टप्प्यावर ती तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. म्हणजेच 60- 65 व्या वर्षी सुद्धा हे डिग्री करू शकता. त्यात कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. आणि कोणत्याही डिग्री नंतर करू शकता जसे बीए, बीएस्सी, बीकॉम ,मेडिकल ,फार्मसी अशा कोणत्याही डिग्री नंतर तुम्ही हि law ची डिग्री करू शकता. मात्र तुम्ही हा course करण्याआधी ज्या डिग्री नंतर करायला जात आहात त्या डिग्री मध्ये तुम्हाला 45 टक्के असणं आवश्यक आहे.

म्हणजेच तुम्ही बीएस्सी नंतर एलएलबी करायला जागा असाल तर तुम्हाला बीएससी मध्ये किमान 45 टक्के गुण असणे आवश्यक आहे. 45 चा त्यांचा आकडा जनरल कॅटेगरी साठी आहे इतरांसाठी यामध्ये थोडी शिथिलता आहे. परंतु तरीही तुम्ही हे लक्षात ठेवा की पंचेचाळीस मिनिमम गुण असणे आवश्यक आहे. बारावी साठी सुद्धा हाच क्रायटेरिया आहे सोबतच CET एक्झाम देणे ही आवश्यक आहे आणि वयाची काहीच मर्यादा नाही.

🔘 एलएलबी झाल्यानंतर पुढे काय?

यानंतर विषय येतो की एलएलबी झाल्यानंतर पुढे काय करायचं? तुम्हाला माहितीच आहे की एलएलबी ही कायद्याची डिग्री आहे केल्यानंतर सहजपणे साधी गोष्ट सांगायची तर वकील होता येतं. तुम्ही कोणत्याही कोर्ट मध्ये जाऊ शकता आणि तिथे तुम्ही प्रॅक्टीस करून स्वतः वकिलीचा व्यवसाय करू शकता. स्वतःचं ऑफिस ओपन करू शकता . आणि त्याचे वकिलीचा व्यवसाय करू शकतात.

त्या सोबतच काही एमपीएससी यूपीएससी मधून ही जागा असतात त्याच्या मधून तुम्ही सरकारी वकील बनू शकता. सरकारी वकील होऊन तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी कमवू शकता. त्याच्यासोबतच तुम्ही इतर एक्झाम असतात ज्या मॅजिस्ट्रेट आणि जज बनण्यासाठी असतात एक्झाम साठी थोडासा स्पेशल अभ्यास करून थोडी मेहनत घेऊन त्या सुद्धा एक्झाम तुम्ही देऊ शकता.

आणि तुम्ही जज आणि मॅजिस्ट्रेट बनू शकता त्याच्या सोबतच अजून इतर काही फिल्ड आहेत त्या म्हणजे “LLB PHD” करून प्राध्यापक बनू शकता एलएलबी चा कॉलेजमध्ये शिक्षण देऊ शकता. सोबतच तुम्ही याच्या पुढे अभ्यास करून रिसर्च करू शकता. पुस्तक लिहू शकता आणि ज्या काही कार्पोरेट शाखा आहे तिथे सुद्धा तुम्हाला काही कामाच्या संधी आहेत त्या घेऊ शकता बँकिंग सेक्टर मध्ये तुम्ही जाऊ शकता अशाप्रकारे अनेक अशा नोकरीच्या संधी आहेत, त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा