जन्माला आल्यापासून मानवी जीवनात केले जातात हे 16 संस्कार, तुम्हाला माहिती आहेत का?
नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
माणूस जन्माला आल्यापासून त्याच्या मागे नाव, आडनाव अशा विविध उपाधी जोडल्या जातात. जन्माला येण्यापासून ते मृत्यूपर्यंत हिंदू धर्मात विविध व्यक्ती विविध विधी आणि संस्काराशी जोडला जातो. प्रत्येक धर्माशी या संस्कारांबाबत स्वत:ची अशी खास धारणा आहे.
पुर्वीच्या काळी जीवन जगण्याचा नवा मार्ग म्हणून संस्काराकडे पाहिलं जातं. सनातन धर्मामध्ये मानवी जीवनावर जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार केले जातात. महर्षी व्यासांनी मानवी जीवनावर केल्या जाण्या-या या संस्कारांबाबत विषद केलं आहे.
मानवी मुल्यांवर आधारलेले संस्कार त्याला माणूस म्हणून सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवतात तर 16 संस्कार हे आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरतात. जाणून घेऊया कोणकोणते 16 संस्कार असतात हे…
गर्भादान – उत्तम संततीच्या निर्मितीसाठी पुरुषाला स्त्रीला योग्य विधी करुन प्रजननासाठी तयार केला जाणार संस्कार म्हणजे गर्भादान.
पुंसवन – गर्भाधारणा झाल्यानंतर गर्भातील संतान सुदृढ होण्यासाठी केला जाणारा संस्कार.
अनवलोभन – गर्भधारणेच्या तिस-या महिन्यात हा संस्कार केला जातो. होणारी संतती उत्तम निपजावी यासाठी हा संस्कार केला जातो त्याला अनवलोभन म्हणतात.
सींमत्तोन्नयन – सातव्या महिन्यात केल्या जाणा-या संस्काराला सीमत्तोन्नयन म्हणतात. थोडक्यात डोहाळेजेवण.
जातीकर्म – नाळ काढण्यापुर्वी बाळाच्या पित्याने सचैल स्नान करावं असा संकेत या संस्कारात दिला गेला आहे.
नामकरण- बाळाला जगात आल्यावर नाव देण्याचा संस्कार यामध्ये केला जातो.
सुर्यावलोकन – बाळाची सुर्यप्रकाशाशी आणि बाहेरच्या जगाशी ओळख करुन देण्याचा संस्कार यात केला जातो.
अन्नप्राशन – बाळाला पहिल्यांदाच मातेच्या दुधाशिवाय अन्न खाऊ घातलं जातं.
कर्णछेदन – बाळाचे कान टोचण्याचे संस्कार यामध्ये येतात.
चुडाकर्म- जावळ किंवा मुंडन करण्याचा संस्कार यात येतो.
विद्यारंभ – पहिलं अक्षर गिरवण्याचा संस्कार
उपनयन- बाळाच्या विद्यार्थीदशेची सुरुवात होताना केला जाणारा संस्कार.
केशान्त- विद्यार्थीदशेला मागे सारुन गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यासाठी सिद्ध होणं.
समावर्तन – सोडमुंज. विवाहापुर्वी हा संस्कार केला जातो.
विवाह- मानवी जीवनाला नवं वळण देणारा संस्कार
अंत्येष्टी – मृत्यूनंतर केले जाणारे संस्कार यात येतात.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.