कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजनेसाठी अर्ज कसा भरायचा ? ।। घरच्या घरी भर ऑनलाईन अर्ज ।। महत्वाची माहिती जाणून घ्या या लेखातून !

शेती

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आज आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्र शासनाने कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी तसेच इतर योजनांसाठी एक नवीन पोर्टल सुरू केलेलं होत. आता या पोर्टलवर कृषी विभागाच्या ज्या काही योजना आहे. त्या योजना संदर्भांमध्ये फॉर्म भरणे सुरू झालेले आहे. आपण माहिती पाहणार आहोत की या पोर्टल वरती विविध योजनांसाठी कशा रीतीने अर्ज करायचा.

आपण आज या वेबसाईटवर ती प्रोफाइल बनवण्यापासून ऑनलाईन अर्ज प्रत्यक्षात कशा रीतीने सादर करायचा व अर्जासाठी चे पेमेंट करावं लागतं ते सुद्धा कशा रीतीने करायचे याबाबत सुद्धा माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या पोर्टल वरती विविध कृषी अनुदान घटकांसाठी जसे की पावर टिलर असेल, ट्रॅक्टर्स किंवा इतर काही असेल यासाठी ऑनलाईन अर्ज कशा रीतीने सादर करायचा याबाबत सविस्तर माहिती.

या यादीमध्ये विविध अनुदान घटकांची माहिती दिलेली आहे. तसेच या अनुदान घटकांसाठी किती अनुदान मिळते ते सुद्धा या यादीमध्ये दिलेलं आहे. ही यादी तुम्हाला डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन गुगल वरून करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुमच्या कॉम्प्युटरमध्ये अथवा तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला क्रोम ब्राउजर ओपन करायचा आहे. नंतर गुगल पेज ओपन होईल तर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचा आहे. Mahadbt.mahait.

त्यानंतर जी वेबसाईट ओपन होणार आहेत त्या वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे. त्यांनतर तुमच्या स्क्रीन वर पेज ओपन होईल. त्या पेज वर तुम्हाला “शेतकरी योजना” या ऑप्शन वर क्लिक करायचे. त्यांनतर तुमच्या स्क्रीन वर नवीन पेज ओपन होईल. तर या ठिकाणी वरती तुम्हाला “नवीन अर्जदार नोंदणी” म्हणून हा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचे नाव म्हणून ऑप्शन आहे.

Income Tax return online filing: Ensure your Form 16 is valid and here is how you can check for it - Technology News

 

तरी खालच्या रखाण्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. हे नाव टाकताना तुमच्या आधार कार्डवर जे नाव आहे तसेच तुम्ही टाकायला हवे. त्यांनतर खाली तुम्हाला वापरकर्त्याचे नाव म्हणून या ठिकाणी दिसेल म्हणजेच यूजर आयडी बनवायचा आहे. यूजर आयडी मध्ये अक्षरे व अंकांचा समावेश असावेत. असे त्यात किमान चार व कमाल 15 अक्षरे किंवा अंक असावेत. त्यानंतर पुढच्या रखांन्यामध्ये तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे.

पासवर्ड टाकत असताना पासवर्ड हा अक्षरांचा वा अंकांचा समावेश असलेला असावा. तसेच त्यात किमान 8 व कमाल 20 अक्षरे किंवा अंक असावेत. पहिल्या रखाण्यामध्ये पासवर्ड टाकून झाल्यानंतर समोर परत तुम्हाला “पासवर्ड पुन्हा टाका” म्हणून एक ऑप्शन दिसत आहे. याच्या खाली जो रखाणा आहे यामध्ये तुम्ही आधीच्या रखाण्यात टाकलेला जो पासवर्ड आहे तोच तुम्हाला या ठिकाणी परत टाकायचा आहे.

त्यानंतर त्या पेजला स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी ईमेल आयडी टाकण्यासाठी ऑप्शन दिसत आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचा ईमेल आयडी टाकू शकता. व या ईमेल आयडी ची सत्यता तपासणी साठी ओटीपी मिळवा. व त्या ईमेल आयडी वर तुम्हाला ओटीपी येईल तो तुम्ही तिथे टाकून तुम्ही ई-मेलची सत्यता तपासून शकता. तसेच खाली तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकून मोबाईल क्रमांकाची सत्यता तपासण्यासाठी ओटीपी पडताळणी करून पहा.

या ठिकाणी तुम्हाला ईमेल आयडी नसला तरी चालेल मात्र तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकणे याठिकाणी अत्यवश्यक आहे. त्यांनतर तुम्हाला तिथे एक कॅप्तचा कोड दिसत आहे तो खाली त्या बॉक्स मधे जसाच्या तसा टाकायचं आहे. आणि नंतर “नोंदणी करा” या बटन वर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे, ‘वापर करता नोंदणी यशस्वीपणे जतन केली’ अशा प्रकारे सक्सेस चा मेसेज येईल. तर या ठिकाणी “ओके” बटन आहे यावर ती परत तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे.

तर अशा प्रकारे तुमचे युजरनेम आणि आयडी बनलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी “वापरकर्ता आयडी” म्हणून हा ऑप्शन याठिकाणी दिसत आहे या ऑप्शनवर ती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यांनतर तुमचे युजरनेम टाकायचं आहे आणि त्यानंतर खाली पासवर्ड टाकायचं आहे. त्यानंतर तिथे असलेला कॅप्तचा(captcha) कोड टाकून “लॉगिन करा” यावर ती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या बटन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर “नवीन नोंदणी” म्हणून या ठिकाणी ऑप्शन येईल.

तरी आपण शेतकरी गट/FU संस्था म्हणून नोंदणी करू इच्छिता का ? तर याठिकाणी “नाही” या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे आधार क्रमांक आहे का? तर या ठिकाणी “होय” ऑप्शन वर क्लिक करुन खाली या ठिकाणी आधार क्रमांक टाकण्यासाठी तुम्हाला जो बॉक्स दिसत आहे या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर तुमच्यासमोर ओटीपी द्वारे आधार सत्यापण करण्याचा पर्याय आहे.

तसेच बायोमेट्रिक द्वारे आधार सत्यापण करण्याचा पर्याय आहे. ज्यांचा आधार कार्डशी मोबाईल सलंग्न आहे त्यांनी खालील ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यांच्या मोबाईल क्रमांकावरती ओटीपी येईल तो ओटीपी टाकून तुम्हाला आधार सत्यापण करायचं आहे. ज्यांचं आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी संलग्न नाही, त्यांनी “बायोमेट्रिक” हा ऑप्शन निवडायचा आहे.

मात्र बायोमेट्रिक ऑप्शन निवदल्यानंतर तुम्हाला बायोमेट्रिक मशीन तुम्हाला याठिकाणी आधार सत्यापण करणेसाठी लागणार आहे. तर आता याठिकाणी आधार क्रमांक टाकून खाली बायोमेट्रिकचा जो ऑप्शन आहे त्यावरती याठिकाणी क्लिक करतो. त्यानंतर अशा प्रकारचा एक मेसेज येईल तर खाली या ठिकाणी “मी सहमत आहे” म्हणून हा जो ऑप्शन आहे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.

तुम्ही ओटीपीचा ऑप्शन निवडला तर तुमचा मोबाईल क्रमांकावरती आलेल्या ओटीपी टाकून तुम्ही तुमचा आधार सत्यापण करायचा आहे. जर तुम्ही याठिकाणी बायोमेट्रिक ऑप्शन निवडला तर, सेक्युटजेन, मयेंत्रा, नेटजेन, अशाप्रकारे ऑप्शन याठिकाणी दिसेल. तर याठिकाणी तुम्ही एक ऑप्शन आधार सत्यापण करण्यासाठी निवडू शकता. त्यांनतर “व्ह्यालीदेट ओटीपी” या ऑप्शन वर क्लिक केलेवर फिंगर प्रिंट स्कॅनर द्वारे फिंगर स्कॅन करून एसएमएस येईल व वरती आधार रजिस्ट्रेशन सक्सेसफुलचा मेसेज येईल. तर अशा प्रकारे “वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे जतन केली” अशा प्रकारचा मेसेज येईल.

त्यानंतर तुम्हाला परत या ठिकाणी “वापरकर्ता आयडी” ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही बनवलेले यूजर आयडी, पासवर्ड टाकून खाली दिसणारा हा कॅप्तचा त्याच्या पुढच्या खालील बॉक्समध्ये टाकून तुम्हाला परत लॉगीन करायचं आहे. लॉगीन केल्यानंतर तुमच्यासमोर अशाप्रकारे एक मेसेज येईल, “आपले प्रोफाईल अपूर्ण आहे कृपया घटक लागू करण्यासाठी आपले प्रोफाईल तपशील पूर्ण करा” तरी या “ओके” या बटणावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी “इथे क्‍लिक करा” म्हणून हा ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.

याठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला वैयक्तिक माहिती विचारलेली तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर तुम्हाला दिलेल्या रखाण्यामध्ये तुमच नाव, वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव, आणि आडनाव टाकायचं आहे. त्यांनतर या खालच्या रखान्यांमध्ये तुमच्याकडे जर पॅन क्रमांक असेल तर तो पॅन कार्ड क्रमांक तुम्हाला खालील रकान्यात टाकायचा आहे. जर पॅन कार्ड क्रमांक नसेल तर या ठिकाणी टाकला नाही तरीही चालते. त्यानंतर खाली ठिकाणी “जात वर्गवारी” म्हणून ऑप्शन आहे. या ठिकाणी क्लिक करून तुमची जी कास्ट कॅटेगरी असेल. तर याठिकाणी तुमची जी कॅटेगरी आहे तो ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे.

त्यानंतर खाली वैयक्तिक अपंगत्व तपशील म्हणून ऑप्शन आहे. तुम्ही अपंगत्व असाल तर त्या ठिकाणी होय किंवा नाही असा ऑप्शन आहे तो निवडायचा आहे. त्यांनतर तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती याठिकाणी भरायची आहे. तुमच बँक खात जर एक जनधन खात किंवा युवक खात किंवा त्यातून पैसे काढण्याची किंवा ठेवण्याची मर्यादा असेल तर “हो” या ऑप्शन वरती क्लिक करायच आहे.

यापैकी नसेल तर “नाही” या ऑप्शन वर क्लिक करायच आहे. व खाली बँक खाते क्रमांक व आयएफसी कोड टाकायचा आहे. त्यांनतर खाली जो चेक बॉक्स दिसत आहे यावर ती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला “जतन करा” म्हणून हा जो ऑप्शन दिसत आहे हे ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर वैयक्तिक माहिती यशस्वीरीत्या जतन केल्याचा अशाप्रकारे मेसेज तुमच्या समोर येईल. तरी याठिकाणी “ओके” या बटनवर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा पत्ता संपूर्ण या ठिकाणी टाकायचा आहे. या पहिल्या रकान्यात तुम्हाला तुमचं संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं राज्य तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर पुढच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला तुमचं जिल्हा निवडायचे आहे. त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे. त्यांनतर तुमचं गाव या ठिकाणी निवडायचे आहे. त्यानंतर तुमच्या गावचा पिन कोड असेल तो पिनकोड तुम्हाला याठिकाणी टाकायचा आहे.

त्यानंतर पत्रव्यवहाराचा पत्ता व कायमस्वरूपी पत्ता एकच असेल तर “होय” या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नसेल तर “नाही” या ऑप्शन वर क्लिक करायच आहे व खाली पत्रव्यवहाराचा जो पत्ता आहे तो टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी “जतन करा” म्हणून ऑप्शन आहे यावरती परत तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पत्ता माहिती यशस्वीरीत्या जतन केली अशा प्रकारचा हा मेसेज येतो व ओके या बटन वर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर या ठिकाणी शेत जमिनीचा तपशील तुम्हाला टाकायचा आहे. तुमच्याकडे जर कधी एकापेक्षा अधिक गावांमध्ये जमीन असेल तर या ठिकाणी “हो” या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. नसेल तर “नाही” ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची शेत जमीन ज्या राज्यांमध्ये आहे ते राज्य तुम्हाला निवडायचं आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये शेतजमीन आहे तो जिल्हा निवडायचा आहे. ज्या तालुक्यांमध्ये शेतजमीन आहे तो तालुका निवडायचा आहे.

ज्या गावांमध्ये शेतजमीन आहे ते गाव या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर तुमचा 8a खाते क्रमांक जो आहे तो खाते क्रमांक तुम्हाला या रखाण्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर कृषी जमीन क्षेत्र हेक्टर आणि आर मध्ये तुम्हाला याठिकाणी टाकायचा आहे. पहिल्या रकान्यात तुम्हाला हेक्टर टाकायचा आहे. आणि वरती आर असेल तर दुसऱ्या रकान्यात तुम्हाला आर टाकायचं आहे. त्यांनतर खाली तुम्हाला 7/12 उताऱ्याचा तपशिल टाकायचं आहे.

त्यांनतर तुमचा जो सर्वेक्षण क्रमांक असेल म्हणजेच गट क्रमांक असेल तो तुम्हाला गट क्रमांक या रकाण्यामध्ये टाकायचं आहे. त्यांनतर या गट क्रमांक मध्ये वैयक्तिक मालकीची जी जमीन असेल ती हेक्टर आणि आर मध्ये या दोन बॉक्स मध्ये तुम्हाला टाकायची आहे. त्यांनतर संयुक्त मालकीचीजी शेती असेल ती हेक्टर आणि आर मध्ये या दोन बॉक्स मध्ये टाकायची आहे. त्यांनतर सामूहिक मालकीची जमीन ही हेक्टर आणि आर मध्ये त्याखालील बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचं आहे.

त्यांनतर आपल्या मालकीचे एकूण क्षेत्र हेक्टर आणि आर मध्ये टाकायचं आहे. त्यानंतर सिंचनाखालील क्षेत्र म्हणजे बागायती जमीन असेल तर जे क्षेत्र आहे ते हेक्टर आणि आर मध्ये याठिकाणी टाकायचा आहे. कोरडवाहू क्षेत्र असेल तर ते या बॉक्समध्ये टाकायचे आहे. त्यानंतर खाली याठिकाणी “जमिनीचा तपशील जतन करा” म्हणून ऑप्शन आहे या वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक मेसेज बॉक्स येईल तर “ओके” या बटणावर क्लिक करायचा आहे. त्यांनतर जमिनीची माहिती यशस्वीरीत्या जतन केली असा मेसेज तुमच्या समोर येईल.

एकाच गावांमध्ये जर कधी तुमचा आणखी एक गट क्रमांक मध्ये शेती असेल आणि ती माहिती भरायची असेल तर त्याच गावात “सर्वेक्षण क्रमांक जोडा” म्हणून ऑप्शन आहे यावर क्लिक करुन आपण जी माहिती भरली त्याच पद्धतीने माहिती भरायची आहे. आणखी एखादा गट क्रमांक नसेल तर या ठिकाणी “पुढे जा” म्हणून हा ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायच आहे. त्यांनतर पिकांचा तपशील तुम्हाला याठिकाणी भरायचा आहे. सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून गट क्रमांक निवडायचा आहे. गट क्रमांक निवडल्यानंतर हंगाम या ठिकाणी निवडायचा आहे. तर आपण या ठिकाणी जे हंगाम सुरू आहे ते तुम्ही निवडा.

त्यांनतर पीक प्रकार तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. तुम्ही जे पीक लावले असेल त्या संदर्भातला एक प्रकारे तुम्ही निवडायचा आहे. त्यानंतर जे पीक तुम्ही शेतामध्ये लावलेला आहे ते निवडून “पिकांचा तपशील सबमिट करा” या बटण वर क्लिक करायच आहे. त्यानंतर त्याच गावात पिकाची माहिती आणखीन जोडायचे असेल तर दुसऱ्या गट क्रमांकात तर या ठिकाणी क्लिक करून परत दुसरा गट क्रमांक तुम्हाला निवडायचा आहे. परत तुम्हाला याचीदेखील क्लिक करून हंगाम निवडायचा आहे, त्यानंतर पिकाचा प्रकार परत या ठिकाणी निवडायचा आहे. आणि त्यानंतर पिकाची निवड या ठिकाणी या लिस्ट मधून तुम्हाला करायची आहे.

पिकाची निवड केल्यानंतर खाली “पिकाचा समावेश करा” म्हणून हा ऑप्शन आहे यावर ती क्लिक करायचं आहे. त्यांनतर “पुढे जा” म्हणून जे बटण आहे यावरती क्लिक करायच आहे. त्यांनतर पिकाची माहिती यशस्वीरीत्या जोडल्याचा मेसेज येईल तर याठिकाणी “ओके” बटण वर क्लिक करायच आहे. त्यांनतर कृषी विभागा अंतर्गत येणाऱ्या योजनेचा अर्ज करणेसाठी तिथे “अर्ज करा” असा ऑप्शन तुम्हाला दिसेल या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायच आहे. त्यांनतर तुमच्यापुढे एक पेज ओपन होईल. त्यांनतर कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत समोर तुम्हाला “बाबी निवडा” म्हणून हा ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायच आहे.

क्लिक केल्यानंतर तुम्हाला मुख्य घटक निवडायचा आहे. त्यांनतर आता आपण उदाहरण म्हणून तिथे “कृषीयंत्र अवजारे खरेदीसाठी अर्थसाह्य” हा ऑप्शन निवडला तर त्यांनतर तपशील मध्ये याठिकाणी तुम्हाला विविध घटक दिसतील. तर आपण पॉवर टिलर हा घटक निवडूयात. त्यानंतर एचपी श्रेणीमध्ये आपण 8bhp व त्यापेक्षा जास्त हा ऑप्शन निवडूयात. याठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की मुख्य घटक आणि तपशील जो तुम्ही निवडता त्या अनुषंगाने तुम्हाला खालील माहिती विचारण्यात येते तर त्या अनुषंगाने तुम्हाला निवड करायची आहे.

त्यानंतर तिथे असलेल्या चेक बॉक्स वर क्लिक करायचं आहे. आणि जतन करा ह्या बटण वर याठिकाणी क्लिक करायच आहे. त्यानंतर तुमच्या स्क्रीन वर एक एसएमएस बॉक्स येईल. कृषी यांत्रिककरना अंतर्गत आणखी घटक तुम्हाला निवडायचे असतील तर खाली “येस” या बटण वर क्लिक करा. नसेल जोडायच तर “नाही” या बटण वर क्लिक करायच आहे. त्यांनतर अगोदर आपण जशी माहिती भरलेली आहे तशीच माहिती आता आपण भरायची आहे, व नवीन घटक हा ॲड करू शकता. त्यांनतर हे पेज स्क्रोल केलेनंतर तुम्ही जे घटक ॲड केलेले आहे त्या घटका संदर्भात माहिती तुम्हाला याठिकाणी दिसून येईल.

त्यांनतर तुम्हाला “मेनू वर जा” म्हणून जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायच आहे. त्यांनतर तुमच्यासमोर एक स्लाईड ओपन होईल. तर त्याठिकाणी “अर्ज सादर करा” म्हणून ऑप्शन आहे यावर तुम्हाला क्लिक करायच आहे, व ओके बटण वर क्लिक करायच आहे. जेवढ्या घटकासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे तेवढे संपूर्ण घटक निवडून झाल्यानंतर अर्ज सादर करा या बटण वर तुम्हाला क्लिक करायच आहे. एक घटक निवडून अर्ज सादर करा अशाप्रकारे करायच नाही. त्यांनतर “ओके” या बटण वर क्लिक करायच आहे. त्यांनतर “पहा” म्हणून ऑप्शन आहे यावर क्लिक करायच आहे.

त्यांनतर तुम्ही जो अर्ज सादर केला आहे तो याठिकाणी क्लिक करून तुम्ही पाहू शकता. त्यांनतर तुम्हाला प्राधान्य क्रम निवडायचा आहे. जेवढ्या घटकासाठी तुम्ही अर्ज केलेला असेल त्या घटकांपैकी प्राधान्य तुम्हाला कोणत्या घटकला द्यायचं आहे त्याप्रमाणे क्रम लावायचा आहे. जर तुम्ही एकच अर्ज केला असेल तर एकच क्रम दिसेल त्यामुळे तिथे “एक” या क्रमांकावर क्लिक करायच आहे. त्यांनतर तिथे असलेल्या “चेक बॉक्स” वरती क्लिक करून खाली “अर्ज सादर करा” या ऑप्शन वरती क्लिक करायच आहे. त्यांनतर तुम्हाला पेमेंट करण्या संदर्भात याचीही विचारणा होईल.

तर या ठिकाणी “नेट पेमेंट” ऑप्शन आहे यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर याठिकाणी वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड, आयएमपीएस, युपीआय अशी विविध पेमेंट करण्या संदर्भामध्ये तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसून येतील. तर त्यामधील तुम्हाला जो ऑप्शन सोईस्कर वाटत असेल तो तुम्ही याठिकाणी निवडू शकता. त्यांनतर तुम्ही जो कोणता ऑप्शन निवडला असेल त्यांनतर “प्रोसीड” या बटण वर क्लिक करा.

त्यांनतर पेमेंट करण्या संदर्भात याठिकाणी पेज ओपन होईल. तर याठिकाणी तुम्हाला पुन्हा ऑप्शन विचारण्यात येईल. तर bhimUPl हा ऑप्शन निवडून bhimUPl चा नंबर टाकून “पे” या ऑप्शन वर क्लिक करायच आहे. पेमेंट केल्यानंतर तुमच पेज पुन्हा लॉगआऊट होईल. तर पुन्हा तुम्हाला अगोदर ज्याप्रकारे लॉगिन केलत त्याप्रकारे पुन्हा लॉगिन करायच आहे. त्यांनतर तुमच्यासमोर एक स्लाईड ओपन होईल. तर आपण जो अर्ज केलेला आहे तो अर्ज पाहण्यासाठी याठिकाणी “मी अर्ज केलेल्या बाबी” हा जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करायच आहे.

त्यांनतर याठिकाणी “स्थिती” मध्ये तुम्हाला पेमेंट केले असताना पेंडिग दाखवत असेल तर हा प्रॉब्लेम फक्त काहिंनाचा येवू शकतो. कदाचित काही जणांना हा प्रॉब्लेम याठिकाणी येणार नाही. तर पेमेंट करून देखील पेंडिग दाखवत असेल तर काय करायचे? तर याठिकाणी समोर क्रिया मध्ये खाली “मेक पेमेंट” म्हणून तुम्हाला ऑप्शन दिसेल. या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायच आहे. त्यांनतर स्क्रोल केलेवर “पेमेंट” हा ऑप्शन आहे यावर क्लिक करायच आहे.

तर तुम्हाला एक एसएमएस दिसून येईल. तर त्यात माहिती दिलेली आहे की, (payment has alredy Made using application id) म्हणजे जो अर्ज सादर केलेला आहे की त्या अर्जासाठी तुम्ही आधीच पेमेंट केलेलं आहे. त्यांनतर खाली दिले असेल की, (kindly click on “continue” butuon to update payment details.) म्हणजेच पेमेंट डीटेल्स अपडेट करण्यासाठी खाली जे तुम्हाला “continue” बटण वर क्लिक करा.

त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक स्लाईड ओपन होईल. तुम्ही जे पेमेंट केले आहे त्याची पावती तुम्हाला याठिकाणी दिसून येईल. तसेच खाली याठिकाणी “प्रिंट रीसिप्ट” म्हणून जो ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायच आहे व रीसिप्टची प्रिंट घ्यायची आहे. त्यांनतर पुन्हा “मी अर्ज केलेल्या बाबी” या ऑप्शन वर क्लिक करायच आहे. त्यांनतर “छाननी अंतर्गत अर्ज” यावर क्लिक करा. तर याठिकाणी आपण जो अर्ज सादर केलेला आहे तो अर्ज आपल्याला या ठिकाणी दिसेल.

त्याठिकाणी क्लिक करून जो अर्ज केलेला आहे तो अर्ज तुम्ही पाहू शकता. त्यांनतर “डाऊनलोड पोच पावती” या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो अर्ज केला आहे त्याची तुम्हाला पोच पावती मिळेल. त्यांनतर मुद्रण पावती यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे पेमेंट केले आहे त्या पेमेंटची रीसिप्ट तुम्हाला मिळेल. त्यांनतर “अर्ज पहा” वर क्लिक केल्यानंतर आपण जो अर्ज सादर केलेला आहे त्या अर्जामध्ये जी माहिती नमूद केलेली आहे ती माहिती सविस्तर तुम्हाला याठिकाणी दिसून येईल. तर अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या mahadbt/mahait या पोर्टल वरती तुम्ही कृषी यांत्रिकीकरन घटका अंतर्गत तसेच विविध योजनांसाठी तुम्ही अर्ज करू शकता.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.