नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आपले NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज नक्की लाईक करा.
पहिला प्रश्न – 1990 साली केलेल्या खरेदीखताची सातबारावर नोंद करता येईल का? उत्तर : सगळ्यात पहिला आपण दोन गोष्टी लक्षात घेतले पाहीजे कि, जेव्हा एखाद्या मालमत्तेचं खरेदिखत हे कायद्याने अस्तित्वात येत त्याच क्षणी त्या मालमत्तेचे हस्तांतरण हे विकणाऱ्या करुन खरेदी करण्याकडे होत असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हस्तांतरणाची किंवा या कराराची महसूल अभिलेखात मध्ये नोंद करणं हे आवश्यक असलं तरी सुद्धा केवळ त्याची नोंद केली नाही या एका कारणाने त्या खरेदी खतावर किंवा ज्या खरेदीखताने संपादित केलेल्या हक्कांवर कोणताही विपरीत परिणाम अजिबात होत नाही.
मात्र काही वेळेला काय होतं की, जेव्हा खरेदीखत त्यानंतर महसूल अभिलेखात मध्ये आवश्यक ते बदल केले जात नाही. सातबारा वरती आपलं नाव लावण्यात येत नाही. तेव्हा जुन्या जमीन मालकांनी जर त्याचच नाव सातबारावर असल्याचा गैरफायदा घेतला आणि त्या जमिनीचे एकामागून एक असे जर व्यवहार केले तर, त्या व्यवहारांना आव्हान देणं, हे सगळं रद्द करून घेणं आणि पुन्हा आपलं नाव सातबारावर लावण या करता आपल्याला एक प्रदीर्घ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
समजा त्या सातबारा मध्ये आपल्या खरेदीखतानंतर काहीही बदल झालेला नसेल तर, आपलं नाव सातबारावर येण्यात कोणतीही अडचण येणार नाही. कारण आपण हक्क संपादन केल्या पासून ठराविक मुदतीत ते तलाठ्याला कळवलं पाहिजे. अशी जर तरतुद महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये असली तरी अमुक एका कालावधीनंतर ते कळवता येणारच नाही किंवा कळवलं तर त्याची नोंद करता येणारच नाही. अशी कोणतीही तरतूद नाहीये. केवळ सातबारा बदलायला किंवा तलाठ्याला वर्दि द्यायला उशीर झाला म्हणून आपल कोणतंही नुकसान होऊ शकत नाही.
त्यात एकच धोका असतो तो म्हणजे मागे सांगितल्याप्रमाणे जर त्या जमिनीचे एकामागून एक व्यवहार करार आणि हस्तांतरण झाली असतील त्या नवीन लोकांची सातबारावर नाव आले असतील तर आपल्याला त्या सगळ्या नोंदणीकृत करारांना आणि संबंधित फेरफार नोंदींना आव्हान देऊन त्या रद्द करून घ्यावं लागतं. आणि यांच्याकरता आपल्याला दिवाणी न्यायालय आणि महसुली न्यायालय या दोन्ही ठिकाणी दावे आणि अपिल करायला लागतं. ज्यामध्ये आपला बर्यापैकी वेळ पैसा आणि मेहनत खर्च होत असते म्हणून जुन्या खरेदी खताच्या आधारे नाव लावून किती सोप किंवा किती कठीण आहे हे आपल्या खरेदी खता नंतर त्या जमिनीमध्ये आणि ज्या जमिनीच्या महसूल अभिलेखात मध्ये काय काय बदल झालेले आहेत किंवा नाही? याच्यावर अवलंबून आहे.
प्रश्न – बक्षीस पत्र आणि गृह कर्ज. आता जेव्हा एखादी मालमत्ता एखाद्या व्यक्तीला बक्षिस पत्राने मिळते, तेव्हा ही मालमत्ता ही त्यांनी स्वकष्टार्जित मालमत्ता ठरते. त्याला ती मालमत्ता मिळण्याकरता कोणताही व्यवहार करायला लागलेला नसल्यामुळे बक्षीस पत्रातल्या लाभार्थ्यांनी कर्ज वगैरे काढायचा प्रश्नच येत नाही. पण समजा त्या व्यक्तीला ती मालमत्ता पुढे जर विकायची असेल आणि खरेदीदाराला त्या व्यवहार करता कर्ज घ्यायचं असेल तर असं कर्ज मिळू शकतं का? तर निश्चितपणे मिळू शकतो . कोणत्याही व्यवहार करता कर्ज हे दोन मुख्य गोष्टींवर अवलंबून असतात. १. एक म्हणजे त्या मालमत्तेची कायदेशीर स्थिती आणि २. दुसरे म्हणजे कर्ज मागणाऱ्यांची आर्थिक स्थिती.
जर आपण मालमत्तेचा कायदेशीरपणा आपल्या व्यवहाराचा कायदेशीरपणा सिद्ध केला आणि आपण अपेक्षित जे कर्ज आहे ते मिळवण्याकरता आर्थिक निकषांवर जर पात्र असेल तर केवळ ति मालमत्ता विकणाऱ्याला बक्षीस पत्राने मिळालेली आहे म्हणून आपल्याला कर्ज नाकारण्याचं किंवा न मिळण्याचं कारण नाही. बक्षीस पत्राने मिळालेली मालमत्ता आपण त्या लाभार्थीकडून विकत निश्चितपणे घेऊ शकतो आणि त्याच्या करता सगळ्या निकषांची ची पूर्तता जर होत असेल तर, आपल्याला कर्जसुद्धा निश्चितपणे मिळू शकतो.
पुढचा प्रश्न – रद्द झालेल्या खरेदीखताची पुन्हा नोंदणी करता येईल का? उत्तर : आता सगळ्यात पहिले एक लक्षात घेतले पाहीजे कि, जेव्हा एखादं खरेदीखत होतं आणि त्या नंतर न्यायालयाच्या हूकुमानुसार ते रद्द होतो, तेव्हा हे खरेदीखत कायदेशीरदृष्ट्या संपुष्टात आलेला असतो. त्याच खरेदीखताची पुन्हा नोंदणी करता येणे हे जवळपास अशक्य आहे. मात्र समजा त्या खरेदीखतातील व्यक्तींना पुन्हा नव्याने व्यवहार करायचा असेल आणि त्याला कोणत्याही न्यायालयाच्या आदेशाची मग तो अंतरिम असो किंवा अंतिम असो बाधा येत नसेल तर त्यांना नव्याने खरेदी खत निश्चितपणे करता येईल.
किंवा ज्या खरेदीखताच्या अनुषंगाने दावा झाला असेल आणि त्या दाव्यामध्ये तडजोड होऊन जुन खरेदी खत रद्द करून नवीन खरेदी खत करायचं मान्य करण्यात आला असेल तर अशा परिस्थितीत सुद्धा नव्याने खरेदी खत निश्चितपणे करता येईल. मात्र जे खरेदीखत एकदा एखाद्या सक्षम न्यायालयाच्या आदेशाने निवृत्त झालेला आहे, त्याची पुन्हा नव्याने नोंदणी करता येणार नाही. आता त्या आदेशाला अपिलात जर आव्हान दिलं गेलं आणि अपिला मध्ये मूळ आदेश फिरवण्यात आला तर त्या खरेदी खताची मुळ नोंदणी कायम राहू शकेल. मात्र रद्द झालेल्या खरेदी खताची पुन्हा नोंदणी होण हे जवळपास अशक्य आहे.
पुढचा प्रश्न – नोंदणी करता साक्षीदार का लागतात? उत्तर : जेव्हा आपण कोणत्याही कराराची नोंदणी करायला जातो तेव्हा त्यामध्ये सामील पक्षकारांना बरोबरच 2 साक्षीदार आवश्यक असतात. या साक्षीदाराला संदर्भात विशिष्ट कायदेशीर तरतूद आहे आणि ती का करण्यात आलेली आहे? याची माहिती बघु. 1.सर्वप्रथम साक्षीदार कोण असू शकतं? : तर कोणत्याही कायद्याने सज्ञान व्यक्ती या साक्षीदार म्हणून हजर होऊन तिथे सामील होऊ शकतो. त्याच्या पक्षकारांच्या ओळखीच्या असल्या पाहिजे, नात्याच्या असल्या पाहिजेत असे कोणतेही बंधन कायद्याने घालण्यात आलेले नाही.
प्रश्न – साक्षीदारांची गरज काय असते? : साक्षीदारांची मुख्य गरज जेव्हा एखाद्या करारा संदर्भाने वाद होतो तेव्हा आपल्याला लक्षात येते. जेव्हा कोणत्याही करारावरून वाद होतो आणि तो वाद नंतर न्यायालयात पोचतो तेव्हा तो वादामधील करार किंवा त्यातील मजकूर हा सिद्ध करण्याकरता त्या करारामध्ये सामील साक्षीदारांची साक्ष उपयोगी पडू शकते. कारण जेव्हा दोन व्यक्ती वाद करतात, करारातील सामील व्यक्ति वाद करतात तेव्हा त्यांच्या साक्षी पेक्षा त्या करारामध्ये जे त्रयस्त आहेत, ते साक्षीदार आहेत त्यांची साक्ष किंवा त्यांचा पुरावा निश्चितपणे जास्त ग्राह्य धरला जाऊ शकतो.
म्हणून शक्यतोवर कोणत्याही कराराला साक्षीदार या त्रयस्थ व्यक्ती असतील असा पण बघाव. अगदी नात्यातल्या असल्या तरी त्याला कायद्याने काही बंधनं नाही. आणि जर कराराचा कोणताही वाद उद्भवला नाही, तर त्या साक्षीदारांचा अपेक्षित उपयोग करायची वेळच येणार नाही. पण जर दुर्दैवाने वाद उदधभवला, तर मात्र त्या वादाच्या निराकरण करता, दिवाणी न्यायालय मध्ये किंवा फौजदारी न्यायालय मध्ये या साक्षी दारांची साक्ष उपयोगी आणि महत्त्वाची ठरू शकते.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.