आत्महत्येस प्रवृत केल्यावर किती शिक्षा होते?

लोकप्रिय कायदा

नमस्कार मित्रांनो. आपण आपल्या  वेबसाइट आणि फेसबुक पेज वर दररोज नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपल्या वाचकांसाठी घेऊन येतो. ही माहिती साध्या, सोप्या आणि समजेल अश्या भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज देखील आपणासाठी आम्ही एका खास विषयावर उपयुक्त माहिती घेऊन आलो आहेत, त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असेल, तर त्या व्यक्तीविरुद्ध कलम 306 नुसार गुन्हा दाखल होवू शकतो. समजा त्या व्यक्तीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे पुराव्यासह सिद्ध झाले असेल तर त्या व्यक्तीला कलम 306 नुसार 10 वर्षांपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकते किंवा दंड ही लागु शकतो किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

परंतु पती-पत्नीमध्ये भांडण झाले असेल तर आणि त्या नंतर पत्नीने आत्महत्या केली असेल तर या वर सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण पुढील प्रमाणे.. एका प्रकरणात पती-पत्नीचे भांडण झाले. त्यानंतर दोघांनीही विष घेतले. यात पत्नीचा मृत्यू झाला; पण पती बचावला.

पत्नीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून 306 भा.द.वी (आत्महत्येस प्रवृत्त केले) चा गुन्हा पतीविरुद्ध दाखल झाला. न्यायालयाने पतीला 7 वर्षे सक्तमजुरी आणि 2500 रु. दंडाची शिक्षा दिली. मद्रास उच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली. तसेच त्या नंतर पती या शिक्षेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. दोघांचे लग्न 25 वर्षांपूर्वी झाले आहे.

या प्रकरणात आत्महत्येच्या दिवशी झालेल्या भांडणाव्यतिरिक्त आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा कोणताही पुरावा पतीविरुद्ध नाही. उलट पतीनेदेखील आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यात 113 अ. भारतीय पुरावा कायद्याप्रमाणे पतीविरुद्ध त्याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गृहीत धरता येणार नाही, असे मत व्यक्त करत शिक्षा रद्द केली.

कलम 114 अ भारतीय पुरावा कायद्याप्रमाणे विवाहित महिलेने लग्नानंतर 7 वर्षांच्या आत आत्महत्या केली असेल, तर तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले होते. हे गृहित धरण्यात येणार नाही. नुसते भांडण झाले व त्यानंतर आत्महत्या केली, याचा अर्थ भांडणाऱ्याने आत्महत्येस प्रवृत्त केले होते व तो 306 भा.द.वी प्रमाणे अपराधी ठरतो अस नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. 

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.