लग्नाच्या सीझनमध्ये खास दिसायचं आहे ? वापरा या स्टायलिंग ट्रिक्स
मानवी आयुष्यात केल्या जाणा-या सोळाव्या संस्कारांपैकी एक म्हणजे विवाह किंवा लग्न. आयुष्य बदलवणा-या या संस्काराचं स्वरुप दिवसेंदिवस बदलत आहे. सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे. दिवसेंदिवस बदलणारा हा विधी आता अनेक नवीन व्हर्जन्ससह समोर येताना दिसतो.
लग्नाच्या या इव्हेंटमध्ये अधिकाधिक सुंदर, ग्लॅमरस दिसण्यासाठी प्रत्येकजण तयार होत असतो. विशेषत: वर-वधु त्यांच्या या खास दिवसासाठी मेहनत घेतातच. पण या दोघांचा मित्रपरिवार ही सजण्यात धजण्यात अजिबात मागे नसतो. तुम्हीही तुमच्या मैत्रिणीच्या लग्नात खास दिसण्यासाठी या टिप्स जरुर वापरा-
पेस्टल कलर्स - सध्या कोणत्याही लग्नात सगळ्यात जोरात असलेला ट्रेंड् म्हणजे पेस्टल कलर्सचा. फ्लोरल पेस्टल्स हे सध्याचं हिट कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे लेहंगा असो वा चोली किंवा किंवा लाँग कुर्ता. फ्लोरल पेस्टल असायलाच हवा.
लेहंग्याला पर्याय – लेहंगा हा प्रत्येक लग्नात कॉमन असणारा पेहराव. मैत्रिणीच्या लग्नात खास आणि उठून दिसायचं असेल तर लेहंग्याला सुट्टी द्या. सध्या पलाझो आणि क्रॉप टॉप किंवा कुर्ता शरारा हा सध्या ट्रेंडमध्ये आहे. याशिवाय सिगरेट पॅंट्स, धोती पॅंट्स हे ऑप्शनही तुम्ही निवडू शकता.
हटके प्रिंट निवडा- सध्या प्रिंटसोबत एक्सपेरिमेंट करणं खुप ट्रेंडी झालं आहे. बोल्ड प्रिंटही अलीकडे विविध अॅक्सेसरीजसोबत बिनधास्त वापरले जातात. त्यामुळे काही नवं ट्राय करण्यासाठी उत्सुक असाल तर अजिबात मागे हटू नका.
शर्टस are in– सध्या काही हटके लूक्स ट्राय करणार असाल तर शर्ट बिनधास्त घाला. सिल्क शर्ट तुम्ही पलाझो किंवा स्कर्टसोबत कॅरी करु शकता. यासोबतच हेवी ज्वेलरीही आवर्जून कॅरी करा. ब्रोकेड स्कर्टस सध्या इन आहेत.
हेवी आउटफिट टाळा – खरं तर लग्नाच्या सीझनसाठी आपण प्रत्येकजण काहीसा हेवी मेक अप आणि लूकला पसंती देत असतो. पण सध्या मिनिमिलिस्टीक ट्रेंड आहे. त्यामुळे हेवी मेक अप किंवा ज्वेलरी टाळून न्युड मेक अपही ट्राय करु शकता.
ब्लाउजचे प्रकार – सध्या स्लीव्हजमध्ये अनेक वेगवेगळे प्रकार समोर येताना दिसत आहेत. उत्तम ब्लाऊज तुमच्या आउटफिटला चार चांद लावू शकतो. स्कर्टस, पलाजो, साडी यावर हे ब्लाऊज खास दिसतील यात शंका नाही.
कलर को-ऑर्डिनेशन- तुम्ही ब्राईड्समेड असाल तर ब्राईडच्या लूकसोबत किंवा तिच्या लेहंग्यासोबत कलर को-ऑर्डिनेशन करुन खास दिसू शकता.