नवरा बायकोचे नाते कसे असावे? वाचा सविस्तर

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आता आपण पती-पत्नीच्या पवित्र नात्यावर बोलणार आहोत.
ही माहिती प्रत्येक पती-पत्नीला नक्की आवडेल. आनंद, जबाबदारी, खबरदारी, संयम आणि सौख्याचे लेणं, सामाजिक जान, कौटुंबिक जबाबदारी, भविष्याचा वेध, निखळ आनंदी जीवन जगण्याला नवी दिशा, मोठेपण, जाणतेपण, अंगामध्ये भरून घेणे या सर्वांचा एकत्रित मेळ म्हणजे लग्न होई. माणसाच्या आयुष्यात अनेक क्षण येतात आणि जातात. परंतु लग्न असा क्षण आहे त्यामुळे अर्धांगिनी च्या रूपाने व्यक्तीला पूर्णत्व येतं. पती-पत्नीचं नातं म्हणजे विश्वास समर्पण एकमेकां प्रती आदर भाव असतो. काय असते कि एकाने आग तर एकाने कधी पाणी व्हाव लागत. एकानं पसरावं तर दुसऱ्याने सावरावं असं नातं म्हणजे नवरा बायकोचा. गरीब असो की श्रीमंत, तरुण असो की उतारवय प्रत्येकाला एकमेकांशिवाय पाऊल टाकणे कठीण असते. पती-पत्नीच्या नात्यात चे धागे घट्ट राहण्यासाठी दोघांकडूनही काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.

◼️ पहिली गोष्ट म्हणजे “अहंकार” अर्थातच आपण त्याला इगो म्हणतो. नवरा बायकोच्या नात्यांमध्ये भांडणाला सगळ्यात जास्त जर कारणीभूत काही असेल तर ते म्हणजे पुरुषी अहंकार. नवऱ्याचे नवरे पण त्या शिवाय अजून पूर्णच होत नाही. समाजातूनही अनेक वेळा पत्ती म्हणजे पायातील चप्पल असते, डोक्यावर घेत नसतात असे ऐकवले जातात. पण खरं म्हणजे ती म्हणजे आयुष्याचा साथीदार म्हणजे सुखदुःखाची वाटेकरी पत्नीला एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून स्वीकारल्यास आयुष्य आनंदी राहील. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना त्यांचा मान मिळणे आणि आत्मसन्मान दिला गेला तर प्रत्येक कुटुंब आनंदी असेल. नवीन लग्न झालेल्या पती-पत्नीचे तर अजूनच वेगळी असतात. पत्नीच्या लाड पुरवतो तर बायकोचा बैल घेण्याचा टपका लागू शकतो तर पत्नीला दूर होतो तर पत्नी आपल्यासाठी सोबत आलेली असते. कुटुंब आणि कर्तव्य सोबतच एकमेकांना समजून घेणे फारच महत्त्वाचे असते.

◼️पती-पत्नीच्या नात्यातील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे “अपेक्षा”
एकमेकांकडून अपेक्षा असणारच. किंबहुना त्या असाव्यात. परंतु नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवे असणारे माणसं गमावण्याची वेळ येते हे आपण नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येक नवरा-बायको ने आपण स्वतःला एकमेकां प्रती समाधानी ठेवायला हव. मला तुम्ही दागिने केले का नाही? मला फोनच केला का नाही? तुला माझी काळजीच नाही, इथपासून सुरू होणाऱ्या अपेक्षांचा पाडा एकमेकांना वीट येईपर्यंत वाढलेला असतो. स्वतःची परिस्थिती, वेळ, काळ याचे भान नात्यात नेहमी दोघांनी ठेवायला हवा.

◼️तिसरी गोष्ट म्हणजे “खरं ते माझं, अन माझं ते खरं” अनेकदा मी म्हणतो तेच खरे आहे, म्हणून वादाला सुरुवात होते. ती स्वतःची चूक असेल तर ते प्रामाणिकपणे कबूल करा. नेहमी आपण बरोबरच आहोत किंवा असतो हे ठरवण्या आधी नेहमी दोघांनी आत्मपरीक्षण करावे. जे जे खरं आहे ते स्वीकारले तर नवरा-बायकोच्या नात्यात भांडण होणारच नाही. अनेक वेळा नातेवाईकांच्या हस्तक्षेपामुळे नवरा-बायको विकोपाला जातील एवढे भांडणे होतात. अशा वेळी दोघांनी स्वतःच्या सद्विवेक बुद्धीचा वापर करून हे ठरवावं की खरंच हा विषय आपसात भांडण्याचा आहे का? खरच आपण चुकतो आहोत की चूक भासते? आपल्याला काही गैरसमज तर नसेल ना ? नेमकी समस्या काय? या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून निर्णय घ्यावा. लक्षात ठेवावा की इतरांमुळे होणारे भांडण विकोपाला गेल्यास शेवटी कोणीच नसतात आणि उसवलेले वस्त्र पुन्हा पूर्ववत होतच नसते.

Happy Couple - Photos | Facebook

◼️चौथी गोष्ट अशी आहे की, “साशंक असणं”.
नवरा-बायकोच्या नात्यातील सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असेल तर ती आहे विश्वास. विश्वास आणि श्वास हे जवळपास सारखेच शब्द. जगण्यासाठी श्वास तर पती-पत्नीच्या नात्याचा श्वास म्हणजे विश्वास. जगातील आनंदी आणि जन्मभर सोबत असणाऱ्या नवरा बायको त विश्वास नावाची गोष्ट प्रकर्षाने जाणवते. पती-पत्नीने एकमेकां प्रती प्रामाणिक असाव. नात्याचा कधी विश्वासघात होता कामा नये. कारण नात्याची डौलदार इमारत विश्वासावर उभी असते. परंतु अनेक वेळा फक्त आणि फक्त शंका घेतल्याने हजारो संसार उध्वस्त झालेले आहे. संशय पिशाच्च आपल्या मानगुटीवर एकदा स्वार झाले तर मात्र ते आपला जीव घेतल्याशिवाय खाली उतरणार नाहीत त्यामुळे मनातील बोला, व्यक्त करा आणि मन मोकळं करा. मनातील शंकेला कुठल्याही मार्गाने वाट मोकळी करून द्या. कारण नसणाऱ्या गोष्टीमुळे तुमचा संसार आणि मुलं-बाळं कुटुंब नाहकच त्रस्त होऊ शकतात.

◼️ पाचवी गोष्ट आहे “एकमेकांना जपा”. पती-पत्नीच्या सुदृढ नात्यासाठी एकमेकांना जपायला हव. एकमेकांना प्रेम दिल्याशिवाय नात्यांच्या रोपट्याचे विस्तीर्ण झाड होणार नाही. एकमेकांची तब्येत , मन ,रुदय ,उदय आणि काळजी या गोष्टीला जपायला हव. एकमेकां प्रती काळजी नसेल तर नात्यात एक प्रकारची पोकळी निर्माण होण्यास सुरुवात होते. आणि पुढे भांडणाचे स्वरुप येते. आपल्या माणसाला आपणच जपायला हवे आणि आयुष्याचा जोडीदार किंवा अर्धांगिनी ती किंवा तो त्याला किंवा तिला जपणे आपले कर्तव्यच असते. नंतरची गोष्ट आहे, आयुष्यभराची पवित्र नाती सात जन्म तर माहीत नाहीत निदान हा जन्म मिळाला या जन्मात हे पवित्र नाते जपण्यासाठी नवरा बायकोने एकमेकात थोडे बदल घडवून आणावे. आयुष्य खूप लहान आहे. एवढ्या आयुष्यात भरभरून जगण्यासाठी नवरा बायकोचे नाते सुदृढ असणे आवश्यक आहे व पत्नीचं महत्त्व एखाद्या वृद्ध व्यक्तीला विचारा. त्याची पत्नी त्याला म्हातारपणात एकटी सोडून गेली. तरुणपणी आणि म्हातारपणी देखील बायकोचा महत्त्व अनन्यसाधारण आहे. ती मैत्रीण तर तो मित्र आहे, ती सखी तर तो सखा आहे , तो सहचारी तर तो सह चरणी आहे, ती सुखदुःखाची वाटेकरी तर तो कुटुंबाचा आधारवड असतो. नवरा-बायकोच्या नात्याला हृदयातून जपण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा